ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 46

लेखांकन (वाणिज्य)

लेखांकन ही पुस्तपालनात नोंदवल्या गेलेल्या माहितीचे वर्गीकरण, सादरीकरण आणि सारांशीकरण करण्याची क्रिया होय. पुस्तपालन जिथे संपते तिथे लेखांकन चालू होते.

लेखापरीक्षण

लेखापरीक्षण ही व्यवसायाचा हिशोब लेखापुस्तकामध्ये द्विनोंदी पद्धतीने योग्य प्रकारे लिहिला गेला आहे की नाही याची फेरतपासणी करण्याची प्रक्रिया होय. लेखापरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याला लेखा परीक्षक म्हटले जाते. लेखापरीक्षक हा व्यवसायाचा पगारी नोकर किंवा ...

संपत्ती (वाणिज्य)

व्यवसाय किंवा व्यक्ती कडे असणाऱ्या रोख रकमेला अथवा रोख रकमेमध्ये रुपांतरीत करता येणाऱ्या मौल्यवान गुंतवणुकीला तसेच उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या भांडवली गोष्टीना संपत्ती असे वाणिज्यिक भाषेत संबोधले जाते.

बचत खाते

बचत खाते ही बॅंका आणि इतर वित्तसंस्थांची सर्वात लोकप्रिय सेवा आहे. विशिष्ट अपवाद वगळता कोणीही व्यक्ती किंवा व्यवसाय आपले पैसे बॅंकेला देते. हे पैसे बॅंक तिसऱ्या व्यक्तीस कर्ज म्हणून वापरावयास देते व त्यासाठी व्याज आकारते. या व्याजातील पैशातून बॅं ...

चौथाई व सरदेशमुखी

चौथाई व सरदेशमुखी या एखाद्या साम्राज्याच्या उत्पन्नांच्या बाबींपैकी दोन महत्त्वाच्या बाबी होत्या. चौथाई एकंदर एकचतुर्थांश व सरदेशमुखी ही पूर्ण उत्पन्नाच्या एकदशांश भाग एवढी असे. मराठा साम्राज्यात या दोन्ही वसूल्या मराठी राज्याबाहेर पण राज्याच्या ...

आय.एफ.एस.सी. कोड

आय.एफ.एस.सी. कोड तथा भारतीय आर्थिक प्रणाली संकेतांक हा दोन बॅंकांमधील पैशाच्या देवाणघेवाणीत वापरला जाणारा संकेतांक आहे. बॅंकेचा एखादा खातेदार दुसऱ्या बॅंकेतील खातेदाराला पैसे पाठवू इच्छितो तेव्हा कुठल्या बॅंकेतील खातेदाराला पैसे पाठवायचे हे ओळखण् ...

एन.ई.एफ.टी.

एन.ई.एफ.टी. तथा राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक वित्तीय प्रदान हे भारतातील बॅंकेची सुविधा आहे. याद्वारे भारतातील बॅंक ग्राहक कुठल्याही बॅंकेतून कुठल्याही बॅंकेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे पाठवी शकतात.

तारण

वाणिज्य परिभाषेत तारण ठेवणे म्हणजे कर्ज घेण्यासाठी एखादी मालमत्ता कर्जदाराकडे देण्याची तयारी ठेवणे होय. तारण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा कर्जदाराकडेच असतो. जर कर्जाची परतफेड करता आली नाही तर धनको या तारण ठेवलेल्या मालमत्तेला ताब्यात घेऊन विकू शकतो ...

थेट विक्री प्रतिनिधी

१) बॅंकेच्या सेवा तसेच विविध उत्पादनाची जाहिरात करणे. २) नवीन ग्राहकांचे आपल्या ग्राहकास ओळखा इंग्लिश: KYC कागदपत्र गोळा करून बॅंकेला देणे. ३) ग्राहकाच्या खरेपणाची खात्री करून घेणे. ४) ग्राहकाचे कर्ज प्रकरण मंजूर होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे धारिण ...

पतपत्र

पतपत्र ही आयातदाराच्या बॅंकेने, आयातदाराने वस्तू आयात केल्यावर निर्यातदारास व्यवहाराची रक्कम प्रदान केली जाईल याची दिलेली लेखी हमी होय. पतपत्र ही आयात निर्यातीच्या व्यापारात आवश्यक असणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. पतपत्रास इंग्लिशमध्ये लेटर ऑफ क् ...

पतमानांकन

पतमानांकन हे ठरावीक निकषांवर ग्राहकाची पत जोखून त्यांचे एका मोजपट्टीवर केलेले मूल्यांकन होय. पतमानांकनाची प्रक्रिया प्रत्येक धनको वेगवेगळ्या प्रकारे करतात. पतमानांकन उच्च असेल तर अशा ग्राहकास कमी दराने कर्ज मिळते. जर पतमानांकन कमी असेल तर कर्ज ना ...

रोखपाल

व्यवसायाच्या ठिकाणी रोख रक्कम हाताळणाऱ्या व्यक्तीस रोखपाल असे म्हणतात. रोख रकमेचे आदान प्रदान करणे, रोख खात्याची नोंद ठेवणे, दिवसा अखेरीस जमा झालेली रोख रक्कम त्याब्यात घेऊन ती सुरक्षितपणे ठेवणे ही रोखपालाची कामे आहेत.

लिलाव

लिलाव ही एखादी वस्तू अथवा मालमत्ता याची विक्री आधी जाहीर करून जास्तीत जास्त किंमत देणाऱ्या खरेदीदाराला विकण्याची प्रक्रिया होय. लिलाव करताना खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो १) मालमत्ता किंवा वस्तू विकण्याची जाहीर सूचना देऊन संभाव्य खरेदीदारास आवाहन ...

व्यापार गट

जेव्हा राष्ट्र त्यांचे आर्थिक संबंध विशेष करारमार्फत जपतात तेव्हा व्यापारी गट निर्माण होतात. हे करार सामान्यत: व्यापारातील अडथळे कमी करणे अथवा काढून टाकणे यांवर केंद्रित असतात.सर्वत्र आढळणारे व्यापारी अडथळे म्हणजे जकात आणि कोटा.

सत्यापन

सत्यापन ही एखाद्या कागदपत्राची प्रत किंवा नक्कल ही त्याच्या मूळ प्रतीप्रमाणेच आहे याची दिलेली साक्ष आणि घेतलेली जबाबदारी होय. एखाद्या व्यक्तीची सही सुद्धा सत्यापित केली जाते. म्हणजे सत्यापन करणारा माणूस हे स्वतःच्या जबाबदारीवर सांगतो कि सदर सही, ...

सिबिल

क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही पतमानांकन करणारी संस्था आहे. हिची स्थापना रिझर्व्ह बँकेच्या सिद्दिकी समितीच्या शिफारशीनुसार २००० साली करण्यात आली. भारतीय नागरिकांच्या तसेच कंपन्यांच्या पत निर्धारणासंबंधी माहिती गोळा करणे तसेच पतमानांक ...

घनमूळ

घनमूळ ही घनाच्या विरुद्ध गणितीय प्रक्रिया होय. x या संख्येचे घनमूळ म्हणजे अशी संख्या जिच्या स्वतःबरोबरील गुणाकाराला पुन्हा त्याच संख्येने गुणले असता उत्तर x येते. उदा. ६४ या संख्येचे घनमूळ ४ आहे; कारण ४ × ४ × ४ = ६४. Sudarahan ware

द्विमान पद्धत

या पद्धतीत सर्व संख्या ० आणि १ या अंकांचा वापर करून लिहल्या जातात. त्यामूळे, १ हा या पद्धतीतील सर्वात मोठा अंक आहे. उदाहरणार्थ, दशमान पद्धतीतील १० व ३ हे द्विमान पद्धतीत १०१० व ११ असे लिहतात. संगणक शास्त्रात, संगणकाला समजेल अशा भाषेत संदेश देण्या ...

पंचमान पद्धत

या पद्धतीत सर्व संख्या ०, १,२,३ आणि ४ या अंकांचा वापर करून लिहल्या जातात. त्यामुळे, ४ हा या पद्धतीतील सर्वांत मोठा अंक आहे. उदाहरणार्थ, दशमान पद्धतीतील १० व ३ हे द्विमान पद्धतीत २० व ३ असे लिहतात. दशमान पद्धतीत संख्येच्या प्रत्येक अंकाच्या स्थाना ...

म.सा.वि.

महत्तम सामाईक विभाजक. दोन किवा दोना पेक्षा अधिक संख्यांचा म.सा.वि ती मोठ्यात मोठी संख्या आहे, जी दिलल्या प्रत्यक संख्येला पूर्ण विभाजित करते २४, ४८, ३६ चा म. सा. वि. १२ आहे.

मूळ संख्या

ज्या संख्येला फक्त १ व ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. उदा. १, ३, ५, ७, ११, १३, १७, १९. यांसारख्या संख्या. जगाला माहीत असलेली सर्वांत मोठी मूळ संख्या २ २४,३१,१२,६०९ - १ ही आहे. ह्या संख्येत १,२९,७८,१८९ इतके अंक आहेत.

लघुतम साधारण विभाज्य

२२ आणि ४ चा ल.सा.वी. ४४ आहे. कारण ४४ ला २२ ने भाग जातो, तसेच ४ ने ही भाग जातो. २२ ने भाग जाणारी संख्या २२ च्या पटीतली संख्या असायला हवी, २२ ला ४ ने भाग जात नाही, पण ४४ ला ४ ने भाग जातो. म्हणून ४४ हा ४ आणि २२ चा लघुतम साधारण विभाज्य आहे. १५ आणि २० ...

वर्गमूळ

वर्गमूळ ही वर्गक्रियेच्याविरुद्ध असलेली गणितीय प्रक्रिया होय. ज्या संख्येचा स्वतःशीच गुणाकार केला असता उत्तर क्ष येते, ती संख्या क्ष चे वर्गमूळ होय. उदा. ४ गुणिले ४ बरोबर १६. म्हणून ४ ही संख्या १६ चे वर्गमूळ आहे. वर्गमूल हे धन आणि त्याचवेळी ऋणही ...

संख्या

संख्या मोजणीसाठी वापरले जाणारे गणितीय एकक आहे. प्राचीन काळातील भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक म्हटले आहे. हेच अंक म्हणजे एक ते नऊ आणि शून्य सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. शून्य ही भारताची जगाल ...

संख्यालेखन

संख्यालेखन ही संख्येचे विविध प्रकारे लेखन करण्याच्या पद्धती होय. गणित विषयाची सुरुवात संख्या मोजण्यापासून होते. १,२,३,४ याप्रमाणे संख्या मोजल्या, तरी त्या लिहिण्याचे काम अनेक संस्कृतींच्या मध्ये वेगवेगळे झालेले दिसते. उदाहरणार्थ रोमन पध्दतीत I हे ...

सत्‌ संख्या

सर्व धन, ऋण आणि शून्य संख्या म्हणजे सत्‌ संख्या किंवा वास्तविक संख्या होत. . -५, -४, -३, -२, -१, ०, १, २, ३, ४, ५.२.७, π, ५⅔, ७ ३.

कलनातल्या विषयांची यादी

द्विपाद प्रमेय त्रिज्यी भेदिका संच सिद्धांत घटकार अंतर्गोलीय फल स्पर्शिका रेषीय फल उतार गणित निश्चित फरक प्राथमिक बीजगणित मुक्त चले आणि बंधित चले फल आणि फलाचा आलेख

भैदनासाठी न्यूटनचा दर्शक

भैदनासाठी न्यूटनचा दर्शक, किंवा टिंब दर्शक, ह्या पद्धतीत फलाच्या काळ भैदिज दाखविण्यासाठी फलावर टिंब दाखवितात. न्यूटन ह्याला फ्लक्सियॉन म्हणे. आयझॅक न्यूटनची दर्शक पद्धती मुख्यत: यांत्रिकीमध्ये वापरली जाते. ते पुढीलप्रमाणे दाखविले जाते: x ˙ = d x ...

भैदिक कलन

भैदिक कलन, किंवा विकलन ही राशींमधील बदलांचा अभ्यास करणारी कलनाची उपशाखा आहे. कलनाच्या अभिजात दोन उपशाखांमधील ही एक उपशाखा असून संकलन ही दुसरी प्रमुख उपशाखा आहे. एखाद्या गणिती फलाच्या विकलजाचा व त्याच्या उपयोजनांचा अभ्यास भैदिक कलनात प्रामुख्याने ...

संकलन

जोड कलन, किंवा संकलन ही गणित राशींमधील सूक्ष्म संबंधांवरून स्थूल संबंध काढणारी व त्याचा अभ्यास करणारी कलनाची उपशाखा आहे. कलनाच्या दोन अभिजात उपशाखांमधील ही एक उपशाखा असून भैदिक कलन ही दुसरी प्रमुख उपशाखा आहे. समजा, f हे x या वास्तव चलावर अवलंबून ...

कोज्या

गणितानुसार कोज्या हे कोनाचे फल असते. काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाची कोज्या म्हणजे कोनालगतची बाजू व त्रिकोणाचा कर्ण यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते. कोज्या = कोनालगतची बाजू /त्रिकोणाचा कर्ण

ज्या

गणितानुसार जिवा हे कोनाचे फल असते. काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाची ज्या म्हणजे कोनासमोरची बाजू व त्रिकोणाचा कर्ण यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते.

स्पर्श (त्रिकोणमितीय फल)

गणितानुसार स्पर्श हे कोनाचे फल असते. काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाचा स्पर्श म्हणजे कोनासमोरची बाजू किंवा लंब व कोनालगतची बाजू यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते.

बहुपदी

बहुपदीची व्याख्या देण्याकरिता "रिंग" लागते. जर "र" ही रिंग असेल तर र मधील सहगुणक असणारी एकचलीय बहुपदी म्हणजे, नैसर्गिक संख्यांच्या संचावरून र मधे जाणारे व एका विवक्षित सान्त संख्येनंतर र मधील ० ही किंमत घेणारे फलन असते. म्हणजेच p: नै → र आणि एका ...

बीजगणिताचे मुलभूत प्रमेय

बीजगणिताचे मूलभूत प्रमेय कार्ल फ्रिडरीश गाऊसने सिद्ध केले. केवळ बीजगणितच नाही, तर इतरही अनेक शाखांमधील हा एक मुलभूत सिद्धांत मानला जातो. हा सिद्धांत असे सांगतो की प्रत्येक कॉम्प्लेक्स बहुपदीस निदान एकतरी उकल असतेच. हा महत्त्वाचा सिद्धांत आहे कारण ...

समीकरण

समीकरण म्हणजे दोन पदावल्यांमध्ये समानता सूचित करणारे गणिती विधान असते. समीकरणामध्ये दोन पदावल्यांमध्ये = हे चिन्ह वापरून समानता दर्शवली जाते. उदाहरणार्थ, x + 3 = 5 {\displaystyle x+3=5\,} 9 − y = 7. {\displaystyle 9-y=7.\,}

काटकोन त्रिकोण

या प्रकारच्या त्रिकोणात एक काटकोन असतो. काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. कर्णाची लांबी उरलेल्या दोन बाजूंमधील प्रत्येक बाजूपेक्षा जास्त असते. इतर दोन बाजू पाया आणि उंची दर्शवतात, त्यामुळे त्यांची लांबी माहीत असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता य ...

कोन

एकमेकांना छेदले जाणारे दोन किरण जेथे जोडल्या जातात त्या जागी होणाऱ्या आकृतीस कोन असे म्हणतात. कोन हा अंशात किंवा रेडियन मध्ये मोजला जातो. तो धन किंवा ऋण असू शकतो. विभिन्न प्रतलात असलेल्या दोन रेषा किरण एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाहीत. अशा वेळी एका ...

क्षेत्र सदिश

क्षेत्र सदिश किंवा क्षेत्रफळ सिदिश ही क्षेत्रफळ या संकल्पनेचे गणिती अमूर्तीकरण आहे. एरवी जरी आपण क्षेत्रफळास अदिश राशी समजत असलो, तरीही भूमितीमधे त्यास सदिश मानणे उपयुक्त ठरते. या कारणास्तव क्षेत्रफळ "सदिशचा" अभ्यास केला जातो. समजा a → {\displays ...

चौरस

प्रतलीय भूमितीमध्ये चारही बाजू समान लांबीच्या आणि चारही कोन एकरूप असणाऱया चौकोनाला चौरस असे म्हणतात. यामुळे चौरसाचा प्रत्येक कोन ९० अंशांचा असतो. प्रत्येक चौरस समांतर भूज चौकोन, समभूज चौकोन असतो. सर्व बाजू समान असल्यामूळे फक्त एक बाजू माहीत असल्य ...

त्रिकोण

एका सरळ रेषेत नसलेले तीन बिंदु सरळ रेषांनी जोडून तयार झालेल्या आकृतीस त्रिकोण म्हणतात. या रेषांना त्रिकोणाच्या बाजू म्हणतात. त्रिकोणाच्या आकृतीतील सर्वात खालच्या बाजूला त्रिकोणाचा पाया म्हणतात. सर्वात वरच्या कोनबिंदूला शिरोबिंदू. शिरोबिंदूपासून प ...

त्रिज्या

वर्तुळाचा मध्य बिंदू आणि त्या वर्तुळाच्या परिघावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस त्रिज्या म्हणतात. वर्तुळात असंख्य त्रिज्या काढता येतात, आणि सर्वांची लांबी सारखीच असते. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या माही ...

त्रिमितीय अवकाश

त्रिमितीय अवकाश ही अशी गणिती संकल्पना आहे ज्यात एखाद्या वस्तूची अवकाशातील जागा सांगण्यासाठी भूमितीतल्या तीन अक्षाची गरज लागते. त्रिमिती म्हणजेच तीन दिशा होय,त्यामुळे हे तीन अक्ष अवकाशातील जागा ठरवण्यासाठी मदत करतात.

परवलय

गणितात परवलय किंवा अन्वस्त ही एका सपाट पृष्ठभागावर काढता येण्यासारखी विशिष्ट वक्राकृती आहे. त्याची नाभि focus व शिरोबिंदू vertex यांच्या आधारे पॅराबोलाच्या आकृतीची निश्चिती होते. नाभि व दर्शिका दोहोंपासून समान अंतरावार असलेल्या बिदूंचा समूह म्हणज ...

परिमिती

a = मोठी त्रिज्या; b = छोटी त्रिज्या. Approximation 1: This approximation is within about 5% of the true value, so long as `a is not more than 3 times longer than ``b in other words, the ellipse is not too "squashed": ellipse perimeter approx = 2 ...

पायथागोरसचा सिद्धान्त

पायथागोरसचा सिद्धान्त हा भूमितीतील एक अत्युपयुक्त सिद्धांत आहे. काटकोन त्रिकोणास हा सिद्धांत लागू होतो. या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरेजेइतका असतो. याचा वापर करून क ...

पूरककोन

ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज १८० अंश असते त्या कोनांना एकमेकांचे पूरक कोन म्हणतात. जर पूरक कोन संलग्न असतील अग्रबिंदू आणि एक भुजा दोन्ही सामाईक तर त्यांच्या उर्वरित भुजा सरळरेषेत असतात.

लंबवर्तुळ

भूमितीमध्ये लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला प्रतलाने छेदले असता तयार होणारे एक बद्ध, प्रतलीय वृत्त होय. या वृत्ताच्या दोन नाभिबिंदूंपासून वृत्तावरील सर्व बिंदूंच्या अंतराची बेरीज ही समान असते.

वर्तुळ

वर्तुळ भूमितीनुसार एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. वर्तुळ म्हणजे प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे. त्याच्यावरील प्रत्येक बिंदू एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरा ...

समद्विभुज त्रिकोण

त्रिकोणाच्या तीन बाजूंपैकी दोन बाजूंची लांबी सारखीच असेल तर त्या‍ त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. समान बाजूंसमोरील कोन समान असतात, म्हणजेच या त्रिकोणातले दोन कोन सारख्या मापाचे असतात, आणि तिसरा वेगळ्या मापाचा.