ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 52

भारतातील हंगाम

भारतात साधारणत: चार प्रकारचे ऋतू पाहिले जातात. या हंगामात, देशात तापमानात भरीव बदल घडतात. भारतात अनुभवलेले विविध प्रकारचे हंगाम खालीलप्रमाणे आहेतः १)हिवाळाः सर्वसाधारणपणे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचा कालावधी हा हिवाळ्याच्या सुरूवातीस मानला ...

शब्द सिध्दी

शब्द सिध्दी शब्दसिद्धी व त्याचे प्रकार: शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. शब्दांचे खालील प्रकार पडतात: 1. तत्सम शब्द जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना तत्सम शब ...

ध्रुव तारा

ध्रुव तारा, इंग्रजीत Pole Star, Polaris; Lodestar; North Star; Northern Star; Guiding Staर हा उत्तर गोलार्धात आकाशात उत्तरेकडे दिसणारा तारा आहे. Little Bear किंवा Ursa minor या नावाने ओळकल्या जाणाऱ्या तारकापुंजातील हा सर्वात टोकाचा तारा असल्याने ...

जपानमधील किल्ल्यांची यादी

ही जपानमधील किल्ल्यांची अपूर्ण यादी आहे. जे किल्ले ऐतिहासिक आहेत, त्यांच्यावरच लक्ष केंद्रित केलेले आहे. जपानमधील चार किल्ले ही राष्ट्रीय संपत्त्ती मानलेली आहे.

ललित सोनोने

JJwiki108.208 १३:१८, ४ मार्च २०२१ ललित सोनोने यांचा जन्म अमरावती जिल्ह्या नजीक च्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी येथे ११-१०-१९३८ ला झाला. आजोबांच्या काळापासूनच त्यांच्या घरात निरामय असे धार्मिक वातावरण होते म्हणून वडीलांना भजनाचा छंद होता. ते ...

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा

शिवाजी महाराजांचा पोवाडा - शाहिर: महात्मा ज्योतिबा फुले चौक १ कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ध्रु०॥ लंगोटयांस देई जानवीं पोषींदा कूणब्याचा । काल तो असे यवनांचा ॥ शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा । असे तो डौल जहागिरीचा ॥ प ...

जो जीता वही सिकंदर

जो जीता वही सिकंदर हा १९९२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाची कथा डेहराडून येथील काही कॉलेजकुमारांच्या चढाओढीवर आधारित आहे. जो जीता वही सिकंदरला तिकिट खिडकीवर चांगले यश मिळाले. ह्या चित्र ...

नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाज

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात, पैनगंगेच्या परिसरात निसर्गरम्य अशा घनदाट जंगलात आणि गिरीकुहरातून आदिवासींची वस्ती पहायला मिळते. आदिवासी जमातीपैकी गोंड, आंध, पारधी, फासेपारधी,भिल्ल, कोलाम, कोमा, थोटी यांचे तांडे आणि खेडी मोठ्या प्रमाणात आढळतात ...

बुद्ध गाथा

भगवान बुद्धांच्या पवित्र मुखातून वेगवेगळ्या प्रसंगी सुखदायी गाथा,ज्या लहान परंतु अत्यंत गहन मनात खोल पर्यंत रुजणाऱ्या आहेत या काही गाथा ऐकून अनेक भिकू अरहंत पदाला पोहचले अशी अफाट शक्ती या गाथान मध्ये आहे. अश्या पवित्र गाथा त्रिपिटक या ग्रंथात हजा ...

अनुवंशशास्त्र

अनुवंशशास्त्र वंश सातत्याचा अभ्यास करणारी एक स्वतंत्र विज्ञानशाखा आहे. या शाखेचा विकास अठराव्या शतकानंतर झाला. चार्ल्‌स डार्विनयांच्या नैसर्गिक निवडीचे तत्त्व या संकल्पनेचे स्पष्टीकरण देण्याच्या प्रयत्नात अनुवंशशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र यांचा ...

प्राचीन कालमापन

६० प्रतिपल = १ विपल ६० विपल = १ पल ६० पल = १ घटी २४ मिनिटे = १ घटी २½ पल = १ मिनिट ½ विपल = १ सेकंद २½ घटी = १ घंटा ६० घटी = २४ घंटा ६० प्रति-विकला = १ विकला ६० विकला = १ कला ६० कला = १ अंश ३० अंश = १ राशि १२ राशि = १ भचक्र

गुळवेल

गुळवेल किंवा गुडूची हृदयाच्या आकाराची पाने म्हणून कॉर्डिफोलिया हे नाव पडले. भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी गुळवेल ही एक वेल आहे. हिला अमृतवेल म्हणतात. या वनस्पतीचे सत्त्व औषध म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्त्व असे ना ...

संवादिनि

संवादिनि संवादिनि हे नाव भारतीय वाद्याचे आहे असे वाटते, पण ते तसे नाही. हार्मोनियम या मूळ पाश्चात्य वाद्याचे ते भारतीय नाव आहे. १७७० इ.स.च्या आसपास आँर्गन या रीङवाल्या वाद्यामध्ये काही नवे प्रयोग होण्यास सुरुवात झाली. मुळात तीन स्वरांचा मेळ जो पा ...

वारकरी शिक्षण संस्था

महाराष्ट्रामध्ये अनेक वारकरी शिक्षणसंस्था आहेत. विष्णुबुवा जोग यांनी आळंदी येथे स्थापन केलेली संस्था ही पहिली वारकरी शिक्षण संस्था. ही संस्था त्यांनी इ.स. १९१७ साली स्थापन केली. ती आज जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या नावाने ओळखली जाते. अन्य काह ...

गुलाबबाई संगमनेरकर

गुलाबबाई संगमनेरकर या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी कलावंत व नृत्यचंद्रिका असुन् त्या बैठकीच्या लावणीची अदाकारी साठी प्रसिद्ध आहेत. गुलाबबाईंना त्यांच्या आईने राधाबाई बुधगावकर आणि नंतर छबु नगरकर, सुगंधा सिन्नरकर यांच्याकडे लावणीचे धडे गिरवायला ...

प्राचीन भारताची रूपरेषा

खाली प्राचीन भारताच्या रूपरेषेसंदर्भात थोडक्यात माहिती दिली आहे: प्राचीन भारत - पूर्व एेतिहासिक काळापासून, मध्यवर्ती भारताच्या सुरुवातीपर्यंतचा भारत. हा काळ साधारणपणे, गुप्त साम्राजाच्या अंतापर्यंत समजला जातो.

तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा (कविता)

तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा ही कवी अरुण काळे लिखित नंतर आलेले लोक काव्यसंग्रहातील कविता आहे. तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा कविता एकोणिसशे नव्वद नंतरच्या जागतिकीकरणामुळे बदलत्या अर्थकारण व समाज संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करते; सांस्कृतिक आणि राजकीय क्ष ...

श्रीरंग संगोराम

प्रा. डॉ. श्रीरंग संगोराम हे महाराष्ट्रातील एक संगीतसमीक्षक व लेखक होते. ते पुणे विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. ते लोकसत्ता दैनिकाचे साहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांचे वडील होत. मुकुंद संगोराम यांचा मुलगा आणि प्रा. डॉ. श्र ...

स्टार वॉर्स भाग ४: अ न्यू होप

स्टार वॉर्स नंतर दिलेले नाव: स्टार वॉर्स भाग ४: अ न्यू होप हा एक १९७७ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. जॉर्ज लुकासने लेखन व दिग्दर्शक केलेला हा चित्रपट स्टार वॉर्स चित्रपट शृंखलेमधील पहिला चित्रपट होता. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला.

गर्भावस्था

नऊ आठवड्यापासून शिशाचा जन्म होईपर्यंत ची अवस्था म्हणजे गर्भावस्था होय. भ्रूणावस्थेत जे अवयव तयार झालेले असतात त्यानंतर ची वाढ व विकास या अवस्थेत होतो. तिसऱ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ९ सेमी व वजन ३०ग्राम होते. चेहरा, डोळे, कान, स्नायू यां ...

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठी च्या पहिल्या पर्वाचे प्रसारण कलर्स मराठी वाहिनीवर १५ एप्रिल २०१८ रोजी सुरु झाले होते. अभिनेते महेश मांजरेकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. मेघा धाडे हिने पहिल्या पर्वाची विजेती होण्याचा मान पटकावला. २६ मे २०१९ रोजी बिग बॉस ...

फोंडूशास्त्री करंडे

रामचंद्र वामन तथा फोंडूशास्त्री करंडे हे एक गोमंतकीय विद्वान होते. आपल्या रामचंद्र नावात दोन र आहेत म्हणून त्यांनी द्विरेफ हे टोपणनाव धारण केले. द्विरेफ म्हणजे भुंगा असल्याने, फोंडूशास्त्रींनी वर्तमानपत्रातून गुंजारव या सदराखाली चार दशके लेखन केल ...

साबीर शेख

साबीर शेख, १५ मार्च, १९४५; मृत्यू: कल्याण, १५ ऑक्टोबर, २०१४) हे ठाणे शहरातील शिवसेनेचे एक नेते आणि माजी कामगार मंत्री होते. साबीर शेख यांचे वडील खाटिक आणि त्याचवेळी प्रवचनकार होते. साबीरभाईंचे शालेय शिक्षण नारायणगावातील शाळेत झाले. त्यानंतर ते अं ...

चारोळी

हेसुद्धा पाहा: चारोळी निःसंदिग्धीकरण चारोळी चार + ओळी इंग्रजी: Owls म्हणजे चार ओळीची कविता होय. आणि या चारोळीच्या संग्रहाला कडव्यांना चारोळ्या चार + ओळ्या म्हटले जाते.

लक्ष्मीनारायण (कविता)

लक्ष्मीनारायण ही वा. रा. कांतांची एका दैवतकथेवर आधारलेली कविता आहे. जन्मजन्मांतरीही टिकून राहणाऱ्या अमर प्रीतीचे रूप या कवितेतून व्यक्त झाले आहे. एका खेड्यात लिंब आणि पिंपळ एकमेकात उगवलेले होते. हे दृश्य पाहून लोकमानसात एका दैवतकथेने जन्म घेतला. ...

मुक्तछंद

हा एक विश्वकोशीय गद्य माहिती लेख आहे. तो जगातल्या सर्व मुक्तछंदाचा धांडोळा घेणारा संदर्भासहीत असावयास हवा.या लेखात स्वतःच्या कविता/स्वतःची मते लिहू नका. इतरांच्या कवितांचे अत्यावश्यक संदर्भा पुरते संदर्भा सहीत अवतरण तेवढे द्यावे कस पिकवु शेतात मो ...

माझं गाव माझं शिवार

माझं गाव माझं शिखर हे पुस्तक संतोष गाढवे यांनी लिहलेले असून याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. ज्या मातीत खेळलो, बागडलो, मोठे झालो, शाळा शिकलो त्या माझ्या गावाच्या मातीबद्दल लिहलेले आहे.

ज्ञानेश्वर कोळी

ज्ञानेश्वर कोळी हे मराठी साहित्यातील नामवंत कवी आहेत. आभाळ पेलताना हा त्यांचा गाजलेला कविता संग्रह आहे. शेतकरी मजुराची वेदना हा त्यांच्या कवितेचा गाभा आहे. सांगली जिल्ह्यतील अंकलखोप हे त्यांच गाव आहे. गेली चाळीस वर्षे त्यांनी राज्यभर कविसंमेलनातू ...

ना.के. बेहरे

नारायण केशव बेहरे हे विदर्भातील कवी, कादंबरीकार व इतिहासकार होते. ते अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांचे सन अठराशे सत्तावन्न या ग्रंथलेखनाचे काम सहा वर्षे चालू होते. शेवटी तो ग्रंथ १९२७ साली प्रकाशित झाला. त्यानंतर अकरा वर्षांनी त्याची ...

आनंदी आनंद गडे

आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले इक ...

शहाजी कांबळे

शहाजी अंकुश कांबळे हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत, त्यांचे मूळ गाव पुळूज आहे. त्यांनी मास कम्युनिकेशन या विषयात सोलापूर विद्यापीठातून पदवी घेतली आहे. शहाजी कांबळे यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट सातंत्र्य या चित्रपटाला इंटरनॅशनल फिल्म फ ...

वसंत वाहोकार

वसंत बाबुजी वाहोकार हे एक मराठी कथालेखक, सदरलेखक आणि कवी आहेत. ते मुळचे अकोला जिल्ह्यातील व्याळा गावचे शेतकरी. नागपूरला शिक्षणासाठी आले आणि तेथेच स्थिरावले. त्यांच्या पत्नी मेघना वसंत वाहोकार याही लेखिका व कवी आहेत. अंकुर साहित्य संमेलनाच्या त्या ...

अरविंद भुजबळ

अरविंद भुजबळ हे मराठी साहित्यातील नामवंत कवी होते. पिंपरी महानगर पालिकेत काम करीत होते. युवा कवी म्हणून १९९० च्या दशकात त्यांनी साहित्य चळवळीत खूप उपक्रम राबविले. बाणेर येथे ते राहात होते. होकाराचा शब्द मला दे नकोत आणा भाका गं या पठ्याची जगात नाह ...

विश्राम गुप्ते

विश्राम गुप्ते हे एक मराठी लेखक आणि अनुवादक आहेत. ते मुळचे नागपूरचे असून गेल्या २० वर्षांपासून ते गोवा येथे स्थायिक झाले आहेत. म्हापसा येथील बांदेकर कॉलेजमधील शिक्षकाची नोकरी सोडून ते चार वर्षांसाठी सौदी अरेबियात गेले होते. तेथील वास्तव्यामुळे सम ...

जुल्फी शेख

डाॅ जुल्फी शेख पूर्व विदर्भातील गोंदियाजवळच्या एका गावात मुस्लिम कुटुंबात जन्मल्या आणि ‘हब्बी-रब्बी जल्लला.’ असे म्हणत वाढलेल्या डॉ. जुल्फी शेख यांना ज्ञानेश्वरांच्या अध्यात्म विद्येचा वेध घ्यावासा वाटला. झपाटल्यागत त्यांनी ज्ञानेश्वरीची पारायणे ...

शंकर सारडा

शंकर सारडा हे साहित्यिक आणि समीक्षक होते. दीर्घकाळ साहित्याच्या, समीक्षेच्या क्षेत्रांत घालवल्यावर व पत्रकारिता केल्यावरही त्यांचा स्नेहशील या शब्दाने गौरव होत असे. असे भाग्य फारच थोड्या लोकांना लाभते. सन १९६८च्या सुमारास सारडा हे साधनाचे अतिथी स ...

राम जाधव

राम जाधव ऊर्फ मामा हे २०११ साली रत्नागिरी येथे झालेल्या ९१व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना हौशी रंगभूमीचे भीष्माचार्य म्हणत. मामांचे हौशी रंगभूमीसाठी मोठे योगदान आहे. मामांनी अकोल्यात १९६० साली स्थापन केलेल्या रसिकाश्रय संस् ...

मॉन (वास्तुशास्त्र)

धर्मनिरपेक्ष इमारतींच्या प्रवेशद्वारांप्रमाणेच, बहुतेक मंदिर आणि तीर्थक्षेत्र दरवाजे पूर्णपणे मर्यादेचे प्रतीकात्मक घटक आहेत, कारण ते पूर्णपणे बंद केले जाऊ शकत नाहीत आणि केवळ सांसारिक आणि पवित्र यांच्यातील संक्रमण चिन्हांकित करतात. बर्‍याच घटनांम ...

देवनागरीतील वर्ण

देवनागरीतील वर्णाचे प्रकार आणि उदाहरणे:- प्लुत स्वर: जे स्वर उच्चारायला दोनहून अधिक मात्रा लागतात असे स्वर - अऽ, आऽ, ईऽ, ऊऽ, ॠऽ, ॡऽ, अनुनासिके/नासिक्य व्यंजने: ङ, ञ, ञ़, ण, न, म. ञमङणनानां नासिका च । ईषद्विवृत्त/उ़ष्म वर्ण/संघर्षी वर्ण/नेमस्पृष्ट ...

लघुसद्धांतकौमुदी मधील स्वरसंधींचा अल्प परिचय

अच् संधि दोन भिन्न शब्द एकत्र जोडण्याला संधि करणे असे म्हणतात. दोन शब्दांची संधि करताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकमेकांत मिसळून त्या दोहोंव्यतिरिक्त एक नवीन वर्ण तयार होतो, त्यास संधि असे म्हणतात. असा या संधि मु ...

सरू आजीच्या म्हणी

दूरचित्रवाणीवर गाजत असलेल्या देवमाणूस या मालिकेत रुक्मिणी सुतार या सरू आजींचे काम करतात. त्यांच्या तोंडी सतत काही नावीन्यपूर्ण म्हणी असतात. अश्या काही म्हणींची ही यादी.: - आपलीच मोरी अणि धुवायची चोरी वेळ ना वखत अन् गाढव चाललंय भुकत चावडीवर बोलायच ...

पाटोदा(बु)

पाटोदा,ता.जळकोट पाटोदाबु हे गाव लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात येत असून,हे गाव जळकोट तालुक्याहुन 2km अंतरावर आहे.पाटोदा या गावाची ऐकून लोकसंख्या 4000 पर्यंत आहे. गावात जाण्यासाठी सुसज्ज रस्ता आहे.रस्त्याच्या दोन्ही कडेने विशेष अशी झाडे आहेत.पा ...

देवांच्या पत्नी

देवांचा राजा असलेल्या इंद्राची पत्नी - इंद्राचा विवाह असुरराज पुलोमाच्या कन्येशी झाला होता. या लग्नानंतर तिला इंद्राणी म्हणू लागले. गणपती: ऋद्धी आणि सिद्धी चंद्राची पत्नी रोहिणी. सूर्याची पत्नी उषा. गौतम बुद्धाची पत्नी यशोधरा. विष्णूचा अवतार असले ...

सोपान

संत सोपानदेवांची जीवनकथा विठ्ठलपंत व रुक्मिणी यांच्या संत निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर यांच्यानंतरचे आणि संत मुक्ताबाई या बहिणीच्या अगोदरचे अपत्य म्हणजे संत सोपानदेव होत. आई वडिलांनी देहत्याग केला त्यावेळी ही भावंडे लहान होती. सोपानदेवांचे वय तर ...

पांगरी

पांगरी हे गाव महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यात तसेच नांदेड तालुक्यात येते पांगरी हे गाव तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र 361वर आहे विष्णूपुरीपासून दक्षिणेस 2 किमी अंतरावर आहे पांगरी या गावचे पोस्ट विष्णूपुरी आहे पिंनकोड 431606 महाराष्ट ...

कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार नावाचा पुरस्कार गैरमराठी भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिकांना देण्यात येतो. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आवरण

आवरण ही डॉ. एस एल भैरप्पा यांनी लिहिलेली कन्नड कादंबरी फेब्रुवारी २००७ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीची मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, तामिळ, इंग्रजी, मल्याळी अशा विविध भाषेत भाषांतरे केली गेली. आवरण च्या चार वर्षांत ३४ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्य ...

शोकात्मिका

शोकात्मिका हा माणसाच्या जिवनात दुःख आहे हे दाखविणारा नाट्यप्रकार आहे. नाटकातील प्रमुख पात्राचा शोकात्म अंत किंवा विनाश घडवून आणणाऱ्या गंभीर आणि महत्त्वपूर्ण कृतीचे चित्रण करणारी नाट्यात्म कृती म्हणजे शोकात्मिका असे विवेचन ऍरिस्टॉटल या तत्त्वज्ञान ...

ललित प्रभाकर

ललित प्रभाकर हा एक मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटक यांतील अभिनेता आहे. आदित्य देसाई हा लोकप्रिय मालिका जुळून येती रेशीमगाठी आणि मुख्य अभिनेता चि. व चि.सौ.कां. या त्याच्या पदार्पण चित्रपटातातील प्रमुख भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.

मराठी नाटकातील दुहेरी भूमिका

एकाच मराठी नाटकात दुहेरी किंवा एकाहून अधिक भूमिका करणारे बरेच नट आहेत. अशा काही नाटकांची आणि त्यातील अनेकविध भूमिका करणार्‍या अभिनेत्याचे नाव खालील यादीत दिले आहे.