ⓘ रामबाग. माकूणसार गावातील काही लोक शेती बागायती करण्यासाठी हंगामात आपल्या शेतात तात्पुरते निवारे बांधून शेती बागायती व्यवसाय करीत.कालांतराने तात्पुरते निवारे काय ..

                                     

ⓘ रामबाग

माकूणसार गावातील काही लोक शेती बागायती करण्यासाठी हंगामात आपल्या शेतात तात्पुरते निवारे बांधून शेती बागायती व्यवसाय करीत.कालांतराने तात्पुरते निवारे कायम वसतिस्थाने होऊन तिथे सिमेंट कॉन्क्रीटची घरे बांधली गेली. ह्यातील काही पद्मनाभ पंथी सज्जनांनी लक्ष्मण म्हात्रे ह्यांच्या पुढाकाराने रामाचे देऊळ बांधले आणि ते येथे कायमचे रहिवासी झाले.ह्या राममंदिराला सन २०१९ ला ५२ वर्षे १९६७ पूर्ण झाली आहेत. आजूबाजूला वस्ती वाढून माकूणसार गावापासून अलग असे रामबाग गाव तयार झाले.

                                     

1. भुगोल

रामबाग पासून सफाळे रेल्वे स्थानक २ किमीवर आहे.रामबाग सफाळे रस्त्यावर डावीकडे नवीन वळणवाडी गाव वसलेले आहे. रामबाग सफाळे रस्त्यावर उजवीकडे काही अन्य गावे आहेत. रामबाग माकूणसार रस्त्यावर डावीकडे विराथन बुद्रुक, चटाळे गावात जाण्यासाठी कच्च्या सडका आहेत.

                                     

2. नागरी सुविधा

ग्रामपंचायतीने सार्वजनिक वीजबत्ती,पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारेबांधणी,सार्वजनिक स्वच्छता, प्राथमिक आरोग्य,प्राथमिक शिक्षण व्यवस्था उपलब्ध केलेली आहे.सफाळे रेल्वे स्थानकावरुन रामबागला येण्यासाठी एसटी बसेसची सोय आहे.रिक्षानेसुध्दा येथे येता येते. सफाळे स्थानकावरुन पश्चिमेला माकूणसार, आगरवाडी,चटाळे, उसरणी, एडवण, मथाणे,केळवे, पालघर ठिकाणी जाणाऱ्या सर्व बसेस रामबागला थांबतात.शिधावाटप केंद्र माकुणसार येथे आहे.