ⓘ वाकेड. हे गाव मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा बस स्थानकापासून ८ किमीवर राजापूरकडे कुवे गावानंतर स्थित आहे. येथील हवामान उन्हाळ्यात उष्ण, हिवाळ्यात थंड तर ..

                                     

ⓘ वाकेड

हे गाव मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा बस स्थानकापासून ८ किमीवर राजापूरकडे कुवे गावानंतर स्थित आहे. येथील हवामान उन्हाळ्यात उष्ण, हिवाळ्यात थंड तर पावसाळ्यात समशीतोष्ण असते. पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस पडतो परंतु डोंगराळ भाग असल्यामुळे कुठेही पाणी साचून राहत नाही.भातशेती, नागली शेती ह्या मुख्य व्यवसायासोबत हापूस आंबा, रातांबा, काजू, फणस ह्यांचे येथे मुबलक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कुक्कुटपालन, बकरी पालन, दुग्ध व्यवसाय हे जोडधंदे सुद्धा केले जातात.

                                     

1. लोकजीवन

मुख्यतः वाणी, कुणबी समाजातील लोक येथे पूर्वीपासून स्थायिक आहेत. येथील वाणी समाजातील लोकांची फार काळापासून मुंबई, रत्नागिरी,लांजा येथे किराणा सामानाची दुकाने आहेत. शेट्ये आडनाव असलेले लोक हे मूळचे वाकेडचे म्हणून ओळखले जातात. हे मेहनती, कष्टाळू,तसेच व्यवहारी म्हणून प्रसिद्ध आहेत.

                                     

2. हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                     

3. नागरी सुविधा

लांजा बस स्थानकातून राजापूर, पाचळ, ओणी, झर्ये कडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस वाटूळ तिठ्यावर थांबतात. येथे पाणी पुरवठा विहीर, झरे, पर्हे मधून होतो. जवळची बाजारपेठ लांजा आहे.