ⓘ लखमपूर. वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे कोणसाई मार्गाने गेल्यावर रोहिणी नर्सरीनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ११ ..

                                     

ⓘ लखमपूर

वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे कोणसाई मार्गाने गेल्यावर रोहिणी नर्सरीनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ११ किमी अंतरावर आहे.

                                     

1. हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                     

2. लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२४ कुटुंबे राहतात. एकूण ५६९ लोकसंख्येपैकी ३११ पुरुष तर २५८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६५.९८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७१.८० आहे तर स्त्री साक्षरता ५९.०१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ८१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.२४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

                                     

3. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्शासुद्धा वाड्यावरुन उपलब्ध असतात.

                                     

4. जवळपासची गावे

आलमाण, शिळ, कोणसाई, जामघर, नेहरोळी, खुपारी, चिंचघर, विजयगड, डोंगस्ते, बिळवळी, बुधावळी ही जवळपासची गावे आहेत.जामघर ग्रामपंचायतीमध्ये जामघर आणि लखमपूर ही गावे येतात.