ⓘ यशवंतगड. हा किल्ला राजापूर तालुlक्यातील नाटे साखरी नाटे या गावाजवळ आहे. हे गाव रत्नागिरीपासून ५१ किलोमीटरवर व राजापूरपासून ३० किमी अंतरावर आहे. रत्नागिरी जिल्ह् ..

                                     

ⓘ यशवंतगड

हा किल्ला राजापूर तालुlक्यातील नाटे साखरी नाटे या गावाजवळ आहे. हे गाव रत्नागिरीपासून ५१ किलोमीटरवर व राजापूरपासून ३० किमी अंतरावर आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. मुसाकाजी या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी यशवंतगड बांधण्यात आला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजी सेनेतील कर्नल इमलॉक याने किल्ला जिंकला.

                                     

1. हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.