ⓘ नृत्य - नृत्य, कूचिपूडि नृत्य, तारपा नृत्य, आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस, गेर नृत्य, चाम नृत्य, मणिपुरी नृत्य, घुमर नृत्य, कथक, स्पर्धात्मक नृत्य, छाऊ नृत्य, गरबा ..

नृत्य

नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. नृत्यातून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. २९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, लिखाण यांप्रमाणेच नृत्य, हा छंद केवळ एक आवड म्हणून जोपासता व्यावसायिक क्षेत्र म्हणू ...

कूचिपूडि नृत्य

कूचिपूडि ही आंध्र प्रदेश मधील नृत्यशैली आहे.हिला अट्ट भागवतम असेही म्हटले जाते. आंध्र प्रदेशातील या नृत्यशैलीचा विकास कृष्णदेव आर्य यांच्या काळात इ.स. १५१० ते १५३० या काळात झाला.इ.स. पूर्व दुसर्‍या शतकापूर्वी या कलेचा उगम झाला असून आंध्र प्रदेशातील भागवतार ब्राह्मणांकडून हे नृत्य सांभाळले गेले. वैष्णव भक्तीने ओतप्रोत भरलेला हा नृत्यप्रकार आहे. सहाव्या शतकातील भक्तिसंप्रदायाची चळवळ पुढे नेण्यात या कलाप्रकाराचे विशेष योगदान आहे. कूचिपूडि या गावात रामायणातील कथा या गीत,नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून सादर करणारे नट समूह आहेत.त्यांना कुशीलव असे म्हणतात. यामध्ये अधिकतर पुरूष पात्रांचा सहभाग असत ...

तारपा नृत्य

वारली आदिवासी जनजातीचे हे पारंपरिक नृत्य आहे.तारपा हे गारुड्याच्या पुंगीसारखे असणारे वाद्य वाजविणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो त्यावेळी या नृत्याची लयही बदलते असे या नृत्याचे स्वरूप आहे. दादरा आणि नगरहवेली प्रांतातील वारली आदिवासींमध्ये हे नृत्य विशेष प्रचलित आहे.

आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस

दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जावा असे आंतरराष्ट्रीय नाट्यसंस्था ने ठरवले. ही संस्था युनेस्कोची भागीदार असलेली स्वतंत्र संस्था आहे. तिच्या आदेशावरून इ.स. १९८२ सालापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवशी, जगप्रसिद्ध आणि त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट नृत्य कलावंला जागतिक संदेश देण्यासाठी आमंत्रित केले जाते. नृत्य कलेला आणि नृत्य कलावंताला जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि अधिकाधिक प्रसार व्हावा आणि तिला राजाश्रय मिळावा हा उद्देश, आं ...

गेर नृत्य

गेर नृत्य हा सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरात, महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमाभागात राहणाऱ्या आदिवासी पावरा समाजात प्रचलित असलेला नृत्यप्रकार आहे. गेर होळीच्या निमित्ताने केले जाते.

चाम नृत्य

चेहऱ्याला मुखवटे लावून आणि रंगीबेरंगी चित्रविचित्र पोशाख घालून केले जाणारे हे नृत्य तिबेटमधील बौद्ध धर्मातील उत्सवांचे महत्त्वाचे अंग आहे. या बौद्ध धार्मिक नृत्याचे तीन महत्त्वाचे भाग आहेत. या नृत्यातून नैतिक उपदेश केला जातो. १. हरीण आणि शिकारी यांचे नृत्य २. राजपुत्र आणि राजकन्या यांचे नृत्य ३. मृत आत्म्यांना दूर पाठवून एखादे स्थान पवित्र करण्यासाठीचे नृत्य

मणिपुरी नृत्य

कृष्णभक्ती हा या नृत्यप्रकाराचा मुख्य गाभा आहे. मणिपुरी शैलीचा उगम प्रामुख्याने पूजाविधी या स्वरूपात झाला. मणिपुरमध्ये वैष्णव पंथाच्या प्रसारासोबत या नृत्यास उत्तेजन मिळाले. पंधरावे ते अठरावे शतक हा मणिपुरी नृत्याच्या विकासाचा काळ मानला जातो. हे नृत्य शब्दाधारित असते.

घुमर नृत्य

घुमर हे राजस्थानातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. घुमणे या शब्दाचा अर्थ चकरा मारणे, गिरक्या घेणे असा होतो. यावरून अनेक गिरक्या घेत सादर केल्या जाणाऱ्या या नृत्यप्रकाराला घुमर असे नाव पडले आहे. भिल्ल या जमातीमध्ये सरस्वतीच्या उपासनेसाठी हे नृत्य करण्याचा प्रघात होता. पुढे संपूर्ण राजस्थान राज्यात हे नृत्य केले जाऊ लागले. सर्वच उत्सव प्रसंगी हे नृत्य केले जात असले तरीही नवरात्री व गणगौर प्रसंगी हे नृत्य विशेषत्त्वाने केले जाते. हे पारंपारिक नृत्य केवळ स्त्रिया सादर करतात.

कथक

कथक किंवा कथ्थक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे. कथ्थक हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकार असून भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्त्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे. शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत, तोडे, नायक नायिका भेद, तत्कार, घुंगुरांचा आवाज, तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो. या गोष्टीमुळे लोकरंजनही होते.

स्पर्धात्मक नृत्य

स्पर्धात्मक नृत्य हा एक लोकप्रिय आणि व्यापक खेळ आहे. ज्यामध्ये प्रतिस्पर्धी अनेक स्वीकृत नृत्य शैली जसे- ॲक्रो, बॅलेट, समकालीन, जाझ, हिप-हॉप, गायन, आधुनिक, वाद्य नाटक, आणि टॅप-सम न्यायाधीश हे इतर क्रियाकलापांच्या विरूद्ध आहे. प्रतिस्पर्धी नृत्य, उद्योगात मुख्यत्वे स्पर्धा निर्मिती कंपन्या असतात. त्यांच्या वार्षिक, देशभरातील स्टॉपवर प्रादेशिक स्पर्धा आयोजित करतात. या प्रादेशिक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या नृत्यांगना अंदाजे चार ते अठरा वर्षवयोगटातील विद्यार्थी असतात. प्रगत नृत्यांगनांची निवड समूहा, युगल, त्रिकूट किंवा गट नृत्य करण्यासाठी केली जाऊ शकते. हि स्पर्धा सामान्यतः जानेवारीमध्ये सुरू ह ...

छाऊ नृत्य

छाऊ म्हणजे मुखवटा. मुखवटा घालून हे नृत्य केले जाते. यामध्ये नृृत्याची एक साखळी असून वसंतोत्सवात हे नृत्य केले जाते. अर्धनारीनटेश्वर ही या नृत्याची देवता असल्याने तीन दिवस तिचे पूजन करून या नृृत्याला प्रारंभ केला जातो. सुपीकपणा व सर्जन यांचे प्रतीक म्हणून या देवतेकडे पाहिले जाते. हे नृत्य तीन रात्री चालते.याच्या साथीला नगारा,मृदंग,बासरी इ.वाद्ये असतात.यात साध्या नृत्याबरोबर पौराणिक व रामायण महाभारतातील प्रसंगावर आधारलेली नृत्यही असतात. या नृत्यात गती,उत्प्लवन भ्रमरी व पदन्यास यांना महत्त्व असते.

जयमाला प्रकाश इनामदार

जयमाला प्रकाश इनामदार या मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी नाटकांतून व चित्रपटांतून अभिनय, नृत्य, आणि नृत्य-दिग्दर्शनदेखील केले आहे.

कर्नाटक ताल पद्धती

कोणत्याही समान क्रियांच्या साखळीतील वेळेचे समान अंतर म्हणजे लय. या लयीच्या माध्यमातून गायन, वादन, नर्तन क्रियेतील कालमापन करण्याच्या प्रमाणित क्रियेला ताल असे म्हणतात. ताल म्हणजे लययुक्त सांगीतिक चक्र. ‘ताल:काल क्रियमानम’ अशी तालाची व्याख्या केली जाते. तालचे विशिष्ट विभाग असतात आणि तो विशिष्ट क्रियांनी दाखवला जातो. तालाच्या दोन पद्धती भारतामध्ये प्रचलित आहेत. कर्नाटक ताल पद्धती हिंदुस्थानी ताल पद्धती या दोन्ही पद्धतीतील तालांची नावे आणि त्यांच्या मात्रासंख्या वेगवेगळ्या असल्या तरीही मूळ संकल्पना आणि व्याख्या एकच आहेत. दोन्हीकडे ताल हस्तक्रियांनी दाखवला जातो. हिंदुस्थानी पद्धतीत हव्या त्या ...

केचक नृत्य

केचक नृत्य हे आग्नेय आशियातील, इंडोनेशिया देशातील प्रसिद्ध नृत्य आणि सांगीतिक नाट्य आहे. बालीमधील हिंदू नृत्य प्रकार म्हणून केचक नृत्य-नाट्य ओळखले जाते. यालाच "तारी केचक" असेही म्हणतात. मंकी डान्स किंवा वानर नृत्य अशीही या नृत्याची ओळख आहे.

कोरटकर, सुहासिनी रामराव

सुहासिनी कोरटकर या भेंडीबाजार घराण्याच्या एक प्रतिभासंपन्न गायिका व संगीत रचनाकार होत्या. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय सुशिक्षित अभिरूचीसंपन्न कुटुंबात झाला. वडील रामराव हवाईदलात तंत्रज्ञ होते. त्यांच्या नोकरीतील बदलीमुळे कुटुंबाची अनेक ठिकाणी भ्रमंती झाली. अखेर त्यांनी पुणे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुहासिनीताईंचे सुरुवातीचे शिक्षण बंगलोर, मुंबई व पुणे येथे झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र विषयातून पदवी घेतली १९६१. पुढे काही वर्षांनी त्यांनी ‘संगीताचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर प्रबंध सादर करून ‘संगीताचार्य’ ही संगीतातील सर्वोच्च पदवी संपादन केली १९६ ...

गरबा

गरबा हा नवरात्रात सादर होणारा एक पारंपरिक नृत्यप्रकार आहे. भारतातील गुजरात प्रांतात हा प्रकार शारदीय नवरात्र काळात विशेषत्वाने खेळला जातो. हे नाव संस्कृतमधील दीपगर्भ या शब्दापासून तयार झाले आहे. महिलांचा या नृत्यात विशेष सहभाग असतो. काहीवेळा देवीला वंदन करण्यासाठी पुरुष सुद्धा या नृत्यात सहभागी होतात.

गीता कपूर

गीता कपूर बॉलिवूडमधील एक भारतीय नृत्यदिग्दर्शक आहे. डान्स इंडिया डान्स, सुपर डान्सर आणि इंडिया के मस्त कलंदर या भारतीय वास्तव नृत्य कार्यक्रमच्या न्यायाधीशांपैकी एक आहे.

चारी नृत्य

चारी नृत्य भारताच्या राजस्थान राज्यामधील एक लोकनृत्य आहे. चारी नृत्य हे महिलांचे समूहनृत्य आहे. हे नृत्य अजमेर आणि किशनगढ भागातील सैनी समाजात हे अधिक प्रचलित आहे. चारी नृत्य हे लग्न समारंभात, एक मुलाचा जन्म किंवा इतर आनंदाप्रीत्यर्थ केले जाते.

दांडिया रास

दांडिया किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे. हे समूहनृत्य नवरात्रात केले जाते. गुजरातमध्ये कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी हे नृत्य करण्याची परंपरा आहे.

नटराज

नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्त्व आहे. शिवाने प्रथम आपल्या तांडवातून नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे. त्याचजोडीने संगीत शास्त्राचा उगमही भगवान शिवाच्या डमरू वादनातून झाला असे मानले जाते.

बिहू नृत्य

हे भारतातील आसाम राज्यातील प्रमुख लोकनृत्य आहे.आसामचे वैशिष्ट्य आणि संस्कृती असलेल्या बिहू उत्सवांच्या काळात हे नृत्य केले जाते.रोंगाली बिहू, काटी बिहू, माघ बिहू या उत्सवांच्या काळात बिहू नृत्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

भरतनाट्यम नृत्यशैलीची घराणी

भरतनाट्यम ही अतिशय प्राचीन अशी शास्त्रीय नृत्यशैली आहे.तिचा उगम तामिळनाडू प्रांतातील तंजावूर येथे झाला.भरतनाट्यमचे मूळ प्राचीन तमिळ नृत्य कुट्टू असल्याचे मानले जाते.देवळातील कोरीवकाम,लेण्या आदिमधून नृत्याच्या इतिहासाचा मागोवा घेता येतो.इसवीसनाच्या दहाव्या शतकापासूनचा काल हा आधुनिक नृत्याचा काळ मनाला जातो.या काळात स्थापत्य,शिल्प,चित्र,संगीत अशा ललित कलांची भरभराट झाली.त्यांचा सर्वदूर प्रसार झाला आणि त्या अधिकाधिक विकसित होत गेल्या. शास्त्रीय नृत्यशैली वेगवेगळ्या काळातील कलाकारांनी वेगवेगळ्या काळात आपापल्या कल्पनाशक्तीने फुलवल्या.हे कलाकार भिन्न भिन्न प्रांतातले,वेगवेगळ्या जातीजमातीचे,निरनिर ...

भारतीय नृत्यशास्त्र

सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय नृत्यपरंपरांचे शास्त्र हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात रचलेल्या भरतमुनिरचित नाट्यशास्त्र या नावाने ओळखले जाते. नाट्य या शब्दातच नृत्याचा आणि संगीताचा समावेश होतो. त्यामुळे नाट्य व संगीत या विषयांवरील जवळजवळ सर्वच जुन्या संस्कृत ग्रंथांत नृत्याबद्दल विचार आढळतो. रस, भाव आणि व्यंजक इ. नी युक्त असलेले ते नृत्य म्हटले जाते.नृत्य ही एक ललित कला आहे.**

भोवत्या-छबिना

कोकणामध्ये अनेक देव-देवतांचे उत्सव साजरे होतात. तेव्हा आरती झाल्यानंतर मंदिराच्या भोवताली अभंग किंवा भजन म्हणत देवाच्या पालखीसह प्रदक्षिणा घातली जाते. नंतर मंदिराच्या प्रांगणात फेर धरून एखाद्या पदाच्या तालावर पारंपारिक पद्धतीने नाचतात.

मार्गम संकल्पना

मार्गम ही भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यशैलीत कार्यक्रम करताना विशिष्ट क्रमाने रचना सादर करण्याची पद्धत आहे. त्या क्रमाला मार्गम असे म्हणतात. नृत्यकलेचे अंतिम साध्य हे रसनिर्मिती आहे व त्यासाठी मार्गम ही एक संकल्पना, एक आराखडा, एक मूलभूत कल्पना आहे. नृत्याचा अपेक्षित परिणाम साधण्यासाठी मार्गम ही योजना आहे. भरतनाट्यम नृत्यातील नृत्त आणि अभिनयाचा समतोल,रती,वात्सल्य आणि भक्ती या तिन्ही भावनांचा परिपोष या तत्त्वांचा विचार करून मार्गम मध्ये विविध नृत्य रचनांचा समावेश केलेला असतो. मार्गम ही संकल्पना १८ व्या शतकात तंजावूर बंधू नावाने प्रसिद्ध असलेल्या चेन्नया,पोनैया,शिवानंद आणि वडिवेल्ल बंधूंनी निर ...

मोहिनीअट्टम

मोहिनीअट्टम, हे केरळ मध्ये प्रगत आणि प्रसिद्ध झालेल्या भारतीय शास्त्रीय नृत्यकलेपैकी एक आहे. कथकली ही केरळमधील दुसरी शास्त्रीय नृत्यकला होय. विष्णूने अमृमंथना दरम्यान घेतलेल्या मोहक सुंदरीच्या अवतारावरुन मोहिनीअट्टम नृत्यकलेला नाव मिळाले. मोहिनीअट्टम चे मूळ हे सगळ्या शास्त्रीय नृत्यकलेप्रमाणे नाट्यशास्त्रात आहे. नाट्यशात्रानुसार हे नृत्य लास्य पद्धतीचे आहे. हे नृत्य नाजूकपणे प्रीतीचा भाव आणून केले जाते. मोहिनीअट्टम हे पारंपरिकरीत्या स्त्रीयांनी साकारलेले एकांकी नृत्य आहे. यासाठी गहन प्रशिक्षण दिले/घेतले जाते. या नृत्याला सहसा कर्नाटकी शास्त्रीय पद्धतीची साथ असते. संगीत, नृत्याद्वारे अभिनय ...

यक्षगान

यक्षगान हा कर्नाटकातील नृत्यनाट्याचा कलाप्रकार आहे. या अभिजात नृत्यनाट्य शैलीमध्ये नृत्य, गायन, अभिनय, वेशभूषा यांचा संगम आहे. कर्नाटकाच्या सांप्रदायिक कलाप्रकारांमध्ये हा प्रमुख कलाप्रकार गणला जातो. यक्षगानाला इ.स.च्या सतराव्या शतकापासून ज्ञात इतिहास आहे. आधुनिक काळात कोटा शिवराम कारंत यांनी या कलेस पुनरुज्जीवित केले. कर्नाटकाच्या किनारी भागातील उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड जिल्हा व उडुपी हे जिल्हे व घाटावरील शिमोगा, चिकमगळूर व केरळातील कासारगोड जिल्ह्यांमध्ये यक्षगानाचा प्रामुख्याने प्रसार आहे. आरंभीच्या काळातील मराठी नाट्यसंगीतावर यक्षगानाचा काही अंशी प्रभाव पडला होता.

लावणी

लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे. लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे. लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक माध्यम समजले जाते.भक्ती रसयुक्त लावणी मागे पडली.लास्य रसाचे दर्शन घडविणारी लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी ही भारताच्या महाराष्ट्र प्रांतातली लोकप्रिय संगीताची एक शैली आहे. लावणी ही पारंपारिक गाणे आणि नृत्य यांचे संयोजन आहे. लावणीम ...

लोकनृत्य

खालील सर्व निकषांवर बसणा-या नृत्यांना लोकनृत्य म्हणता येईल. १ १९ व्या शतकाच्या आधीपासून प्रचलित व प्रताधिकारीत नसलेली नृत्ये. २ परंपरेने चालत आलेली नृत्ये. ३ सामान्य माणसांमध्ये लोकप्रिय असलेली नृत्ये. ४ उत्स्फुर्तता हा मुख्य घटक असलेली नृत्ये.

                                     

साल्सा (नृत्य)

साल्सा ही मूलतः क्युबा देशातून उगम पावलेली, जोडीने नृत्य करायची नृत्यशैली आहे. युरोपीय व आफ्रिकी संस्कृतींमधील संगीत व तालपरंपरांच्या प्रभावातून साल्शाची निपज झाली, असे मानले जाते. लॅटिन अमेरिका, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप या ठिकाणी लोकप्रिय असलेला ही नृत्यशैली आशिया व आफ्रिका खंडांतही रसिकप्रिय होत आहे.