ⓘ संगीत - संगीत, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, नाटक, नाटक अकादमी पुरस्कार, कर्नाटक संगीत, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, इळैयराजा, ऑपेरा, किराणा घराणे, गण, गायक, गीत ..

संगीत

नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. सं म्हणजे स्वर, गी म्हणजे गीत आणि त म्हणजे ताल होय.संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते.संगीतामधून आपण आपले भावना व्यक्त करू शकतो. जेव्हा आपण आनंदीत असतो तेव्हा संगीतातला शब्द आपल्याला समजतो पण जेव्हा आपण दुखात असतो तेव्हा त्या संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजतो.संगीत हे ईश्वराने दिलेली एक देन आहे.आपल्या मनातील भावना ह्या कदा ...

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत ही भारतीय शास्त्रीय संगीताची प्रामुख्याने उत्तर भारतात आढळणारी शैली आहे. अर्वाचीन काळात मात्र पूर्ण भारतभरात आणि परदेशांतही या संगीत प्रकाराचे गायक-वादक आणि श्रोते आढळतात. या शैलीचे मूळ वेदकालीन कर्मकांडातील मंत्रोच्चारात असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. इतिहासात बाराव्या शतकापासून उत्तर भारत आणि पाकिस्तान भागात आणि काही प्रमाणात बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तानातही ती प्रचलित होती असे आढळते. अभिजात भारतीय शास्त्रीय शैलीचे दोन उपप्रकारापैकी एक अशी ही शैली आहे, दुसरी दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेली कर्नाटक शैली आहे. ख्याल संगीत हे हिंदुस्थानी संगीताचे अर ...

संगीत नाटक

संगीत नाटक हा नाट्यप्रकार संगीत ह्या कलाप्रकाराच्या आणि नाटक ह्या साहित्यप्रकाराच्या संकरातून निर्माण झाला आहे. संगीत नाटक हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहे.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार

संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा पुरस्कार संगीत नाटक अकादमी या कलाक्षेत्रातील सरकारी संस्थेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. सन २००३पासून, या पुरस्काराचे स्वरूप ५०,००० रुपये रोख, एक मानपत्र, एक शाल व एक ताम्रपत्र असे आहे. संगीत,नृत्य अभिनय इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य, संगीत, अभिनय व कठपुतळी यांतील योगदानांबद्दल हे पुरस्कार आहेत. उदयोन्मुख कलावंतांपैकी काहींना शिष्यवृत्ती दिली जाते.

कर्नाटक संगीत

भारतीय अभिजात संगीताचा एक प्रकार भारताच्या दक्षिण भागात अर्थात कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यात प्रचलित असलेले अभिजात शास्त्रीय संगीत कर्नाटक संगीत म्हणून ओळखले जाते. कर्नाटक प्रांताच्या नावावरून भारतीय शास्त्रीय संगीताचा हा प्रकार ओळखला जातो. कर्णासकानास गोड वाटणारे म्हणून कर्नाटक संगीत अशीही एक व्युत्पत्ती सांगितली जाते. कर्णे अटति इति कर्णाटकम्

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातले गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात केली आणि गुरुभक्तीचे उदाहरण घालून दिले. भीमसेन जोशींच्या निधनानंतर ह्या संगीत महोत्सवाचे नाव ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे बदलण्यात आले.

इळैयराजा

इळैयराजा इंग्रजी: Ilaiyaraaja तमिळ: இளையராஜா,उच्चार-इळैयराजा जन्म नाव: डॅनिअल राजैय्या. जन्म दिनांक: जून २ १९४३ तमिळनाडू एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार व गायक आहेत.१९७० सालापासुन दक्षिण भारतीय संगीतात अत्यंत मोलाचे योगदान,विशेषतः तमिळ चित्रपट संगीत. हे "ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्यूझीक", लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत तसेच गेल्या ३० वर्षांच्या काळात त्यांनी विविध भाषातील ९०० त्यातील ४५० हुन अधिक चित्रपट तमिळ भाषेतील आहेत. हुन् अधिक चित्रपटातुन ४५०० हुन अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत प्रसिद्ध संगीतकार. फेब्रुवारी ११ १९९९ रोजी त्यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्का ...

ऑपेरा

ऑपेरा हे प्रामुख्याने एक संगीत नाटक असते ज्यामध्ये एक किंवा अनेक गायक व संगीतकार रंगमंचावर संवाद व संगीताने रचलेली एक कथा सादर करतात. ऑपेरामध्ये पारंपारिक नाटकाचे अभिनय, पार्श्वभूमीवरील देखावे, रंगभूषा, नृत्य इत्यादी अनेक घटक वापरले जातात. ऑपेराचे प्रयोग साधारणपणे ऑपेरागृहांमध्ये भरवले जातात. ऑपेरा हा पश्चिमात्य संस्कृतीमधील शास्त्रीय संगीताचा एक भाग मानला जातो. १६व्या शतकाच्या अखेरीस ऑपेराचा इटलीमध्ये उगम झाला. जगातील पहिला ऑपेराचा प्रयोग फ्लोरेन्स येथे इ.स. १५९८ साली भरवण्यात आला. १७व्या शतकामध्ये ऑपेरा झपाट्याने युरोपभर पसरला व जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड येथे ऑपेराचे अनेक प्रकार निर्माण झ ...

किराणा घराणे

हिंदुस्तानी शास्त्रीय रागसंगीताचा मूळ गाभा तसाच ठेऊन संगीत सादर करण्याच्या परंपरागत आणि विविध पद्धतींमुळे या संगीतात काही घराणी निर्माण झाली आहेत. त्यांपैकी किराणा मूळ नाव कैराना हे एक प्रमुख घराणे आहे.

ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचा सहयोग असलेल्या कलाकृती

गीतांना ग.दि. माडगूळकरांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत असलेली गाणी महाराष्ट्राच्या संगीत इतिहासात अजरामर झाली आहेत. असा दोन प्रतिभासंपन्न कलावंतांचा संगम क्वचितच अनुभवायला मिळतो. गीतरामायणासारखी संगीत कलाकृती पुन्हा निर्माण होण्यासारखी नाही.

गण

तमाशामध्ये पहिले गाणे सादर केले जाते त्याला गण असे म्हणतात. गण व मुजरा झाल्यावर गौळण सादर केली जाते. तत्त्ववेत्त्यांच्या ब्रह्मरूपापासून लोककथांमधील गौरीनंदनापर्यंत लोकाभिमुख झालेले गणपतीचे स्वरूप लोककलेच्या प्रत्येक आविष्कारात गणाच्या रूपात उभे राहते. लोककलाकार रंगमंचावर प्रवेश करतो आणि नम्रपणे गणेशाला वंदन करतो. तो असतो गण. गणाचे स्वरूप तात्त्विक आहे. गणातून शाहिराच्या प्रज्ञेचे आणि प्रतिभेचे खरे दर्शन घडते. गणातील प्रत्येक शब्द हा लोकवाणीतून अध्यात्मवाणीकडे सहजपणे जातो आणि याच शब्ददर्शनातून पुढे तत्त्वदर्शन उभे राहते.

गायक

गायक किंवा गवई म्हणजे गाणारा. गवयाला गायक अशी संज्ञा आहे. शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकाचे उत्तम, मध्यम आणि अधम असे तीन भेद आहेत. रागाचा आरंभ, विस्तार व शेवट करण्याचे ज्ञान, विविध राग व त्यांची अंगे यांचे ज्ञान, देशी रागांचे रूपभेदज्ञान, तालबद्ध रूपके गाण्याची निपुणता, तीनही स्थानात गमक प्रयोग करण्यची अनायास शक्ती, कंठाची वशता, तालाचे ज्ञान, गाण्यासाठी श्रम करण्यची तयारी, संप्रदायशुद्ध गाण्याची पद्धती, धारणा शक्ती, दोषरहित गाणे हे सर्व उत्तम गायकाचे गुण मानलेले आहेत गाणारा पुरुष.जो गायक गायनातले दोष वगळतो, जो सदोष गातो. तो अधम समजावा.

गायन

आवाज व वाद्य वाजविण्याची क्रिया म्हणजे गायन. गाणे हे आवाजासह वाद्ये निर्माण करण्याचे कार्य आहे. स्वर, ताल आणि विविध प्रकारच्या आवाजांच्या तंत्राचा वापर करून नियमित भाषण वाढवते. ज्याला गाणे गाता येत त्याला गायक म्हणतात. गायक असे संगीत सादर करतात ज्यात गायले जाऊ शकते किंवा वाद्य वादनाद्वारे एकत्र न करता. गायन औपचारिक किंवा अनौपचारिक, व्यवस्था केलेले किंवा सुधारित असू शकते. गायन करण्यामागे विविध कारण असू शकतात. छंद, आनंद, सांत्वन किंवा विधी,संगीत शिक्षणाचा भाग म्हणून किंवा व्यवसाय म्हणून हे हेतू असतात.गायनातील उत्कृष्टतेसाठी वेळ, समर्पण, सूचना आणि नियमित सराव आवश्यक आहे. जर सराव नियमितपणे केल ...

गीत

शब्दरचनेला सुरावट किंवा स्वररचना प्राप्‍त करून दिली तर ती शब्दरचना गीत बनते. शब्दरचना ही शब्दांच्या उच्चारांच्या ज्या समाजमान्य पद्धती आहेत तिच्यातून जन्माला येत असते. ती करताना प्रत्येक ओळीत विशिष्ट अनुक्रमाने येणारा शब्दसमूह हा एक कालिक रचना घडवितो. अनेकदा विशिष्ट अंतराने तोच तो उच्चार येतो आणि आपणास लयपूर्ण बांधणी प्रतीत होते. कवितेच्या या अंगभूत लयीवर सुरांची एक रचना बसविली गेली की ती कविता गीत बनते. संगीतातील स्वररचनेमध्ये कवितेतील शब्द बसविले की गीत तयार होते. अनेक गीतांच्या चाली या भारतीय शास्त्रीय संगीताच्या रागांवर आधारलेल्या असतात. अशा गीतांचा परिचय करून देणारी काही पुस्तके मराठी ...

ठुमरी

थुमरी अर्ध-शास्त्रीय भारतीय संगीत एक सामान्य शैली आहे. "थुमरी" हा शब्द हिंदी क्रिया थुमाकनापासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ "डान्स स्टेप्सने चालणे म्हणजे गळपटीच्या घोट्या बनविणे." प्रादेशिक फरक असले तरी, या प्रकारात नृत्य, नाट्यमय भावना, सौम्य कामुकता, उत्परिवर्तनशील प्रेम कविता आणि उत्तर प्रदेशचे लोक गीत यासारखे रूप जोडलेले आहे. हा मजकूर रोमांटिक किंवा भक्तीपूर्ण स्वरूपाचा आहे, सामान्यतः उत्तर प्रदेश हिंदी भाषेत अवधी आणि बृज भाषा म्हणतात. थुमरीला त्याच्या संवेदनामुळे आणि रागाने जास्त लवचिकता दिली जाते. दादर, होरी, काझरी, सावन, झुला आणि चैती यासारख्या इतर, अगदी हलक्या स्वरूपाच्या गोष्टींसाठी ...

दलित संगीत

दलित संगीत किंवा बहुजन संगीत हे बहुजन आणि अनुसूचित जातीच्या लोकांनी प्रामुख्याने जातीय भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी निर्माण केलेले संगीत आहे. यामध्ये दलित रॉक भीम रॅप आणि दलित पॉप तसेच चमार पॉप, भीम पाळणा, भीमगीत आणि पंजाबी आंबेडकरी संगीतासह रविदासियांच्या संगीत शैली यांचा समावेश होतो.

पंडित पन्नालाल घोष

साचा:भारतीय शास्त्रीय वादक पंडित पन्नालाल घोष हे एक श्रेष्ठ बासरी वादक होेते. त्यांचे पूर्ण नाव अमल ज्योती घोष असे होते. त्यांनी बासरी या वाद्यात अनेक सुधारणा केल्या, तसेच बासरी वादन हे भारतीय गायकीच्या जवळ नेऊन ठेवले.

पुरुषोत्तम जोग

पुरुषोत्तम जोग हे पुण्यात राहणारे वाद्यदुरुस्ती क्रणारे व्यावसायिक आहेत. त्यांचे मूळ गाव कोकणातील चिपळूण असून ते उपजीविकेसाठी पुण्यामध्ये आले. त्यांच्याकडे बी.कॉमची पदवी असून त्यांनी स्टेट बॅंकेमध्ये नोकरी केली. त्यांनी फरासखान्यासमोर राहणाऱ्या बाबूराव क्षीरसागर यांच्याकडून तबलावादनाचे शिक्षण घेतले. तबलावादनाचे दोन-चार महिने शिक्षण घेतल्यानंतर ते त्यांच्याचकडून तबला दुरुस्ती शिकले. तबला दुरुस्तीचे शिक्षण घेत असताना तपकीर गल्लीमध्ये राहणारे नानासाहेब घोटणकर यांच्याकडून त्यांना ऑर्गन दुरुस्तीचे प्रशिक्षण मिळाले. पुढे पुरुषोत्तम जोग यांना अविनाश गोडबोले यांनी व्हायोलिन आणि हेमंत गोडबोले यांनी ...

पोल्का

पोल्का हा मूळतः एक संपूर्ण युरोप आणि अमेरिकेत परिचित चेक नृत्य आणि नृत्य संगीत प्रकार आहे. हा १९ व्या शतकाच्या मध्यात बोहेमियामध्ये अस्तित्वात आला, आता चेक रिपब्लिकचा भाग आहे. पोल्का अनेक युरोपीय देशांमध्ये लोकप्रिय लोकसंगीत आहे आणि चेक प्रजासत्ताक जर्मनी, ऑस्ट्रिया, पोलंड, क्रोएशिया, स्लोव्हेनिया, स्वित्झर्लंडमधील लोक कलाकारांद्वारे आणि कमी प्रमाणात लाट्विया, लिथुआनिया, नेदरलॅंड, हंगेरी, इटली, युक्रेन, रोमेनिया, बेलारूस, रशिया आणि स्लोवाकिया मध्ये लोक कलाकारांद्वारे सादर केले जाते. नॉर्डिक देशांत युनायटेड किंग्डम, आयर्लंड, लॅटिन अमेरिका आणि युनायटेड स्टेट्समध्ये या नृत्याची स्थानिक प्रकार ...

साबण्णा बुरूड

साबण्णा भीमण्णा बुरूड हे पुण्यातील वाद्यांची दुरुस्ती करणारे एक कारागीर आहेत. तंत्रज्ञानाच्या आणि कोणत्याही यंत्राची मदत न घेता ते वाद्यांची हातानेच दुरुस्ती करतात. हार्मोनिअमपासून ऑर्गन, पायपेटी व सर्व तंतुवाद्यांची दुरुस्ती आणि नव्या कोर्‍या बाजाच्या पेटीची निर्मिती यांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. बुरूड यांना लहानपणी संगीत आवडत नसून नंतर त्यांना हिंदी चित्रपट संगीत आवडू लागले. पुढे ते या क्षेत्राकडे आले. २०१६ साली ७५ वर्षांचे झालेले साबण्णा इ.स. १९५६पासून वाद्यदुरुस्तीच्या व्यवसायात आहेत. हे मूळचे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यामधील बेळगेरी गावचे आहे. यांच्या घरातील व्यवसाय बुरूडगिरीचा ...

तुळशीदास बोरकर

तुळशीदास वसंत बोरकर हे एक मराठी हार्मोनियमवादक होते. त्यांचा जन्म गोव्यातील बोरी या गावात झालाी. ते लहानपणीच पुण्यात आले. गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम शिकण्यासाठी ते रोज पुणे-मुंबई ये-जा करत. तुळशीदास बोरकरांनी उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी दिग्गज कलावंतांना पेटीची साथ केली आहे. तुळशीदास बोरकर हे प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक होते. बोरकरांना भारत सरकारने २०१६ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.

भावगीते

अभंग, पोवाडा, लावणी यांचप्रमाणे भावगीत हा सुगम संगीताचा एक खास मराठी प्रकार आहे. उत्तम काव्यगुण असलेली भावस्पर्शी कविता जेव्हा गीत होते, तेव्हा भावगीताचा जन्म होतो. भावगीत म्हणजेच मनातील भावांचे शब्दसुरांद्वारा प्रकटीकरण होय. जी.एन. जोशी हे मराठीतले आद्य भावगीत गायक समजले जातात. त्यानंतर आलेले गजानन वाटवे यांनी भावगीतांची आवड घरांघरांत पोहोचवली. भावगीत या विषयावर प्रबंध लिहून शोभा अभ्यंकर यांनी पीएच.डी. मिळवली आहे. त्यांचे ‘सखी भावगीत माझे’ हे याच प्रबंधात आणखी भर घालून साध्यासोप्या भाषेत सादर केलेले पुस्तक आहे. भावगीत हे एके काळी कोणत्या न कोणत्या रागावर आधारलेले असायचे. या भावगीतांनी चां ...

मनोहर चिमोटे

पंडित मनोहर वासुदेव चिमोटे हे एक विख्यात हार्मोनियमवादक होते. भारतामध्ये एकल पेटीवादनाची सुरुवात त्यांनी केली. व्हायोलीन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. मनोहर चिमोटे यांचा जन्म एका खाणमालकाच्या घरात झाला. घरात सुखसोयींंची आणि ऐषारामाची इतकी रेलचेल होती की चिमोटे यांचे बालपण राजेशाही वातावरणात गेले. त्यांची हवेली राजवाडावजा होती, आणि इकडेतिकडे हिंडण्यासाठी घरची बग्गी होती. असे असले तरी वडील थोड्याफार धार्मिक मनोवृत्तीचे असल्याने घरात भजने आणि कीर्तने होत. भजन-कीर्तनाला भाविक तर येतच पण संगीतकारही येत. मनोहर चिमोटे यांनी श्रीमंती वातावरणा ...

महेश महदेव

महेश महदेव हा भारतीय संगीतकार, गीतकार आणि गायक आहे. कन्नड, तेलगू, तामिळ, हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेचे संगीत असलेले कर्नाटिक संगीत, हिंदुस्थानी संगीत आणि विनुतरनगागाला विविध प्रकारच्या विनुतरनगावला संगीत दिले गेले आहे.

नाना मुळे

नाना मुळे हे गायकांना साथ करणारे एक प्रसिद्ध मराठी तबलावादक होत. एकेकाळी नाना मुळे फक्त रंगमंचावरील गायक कलावंतांच्या गाण्यांना तबल्याची साथ करीत. मात्र जशीजशी संगीत नाटके कमी होऊ लागली तसेतसे नाना रंगमंचावर नसलेल्या अन्य गायकांनाही साथ करू लागले. पं. जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, श्रीमती शोभा गुर्टू, पं. कुमार गंधर्व, पं. सी.आर. व्यास इतकेच काय, जुन्या पिढीतील उस्ताद अमीर खानसाहेबांपासून ते पुढच्या पिढीतील अनेक तरुण गायकांना नाना मुळे यांना तबल्याची साथ केली. या सर्वांच्या बरोबर असंख्य कार्यक्रम गाजवले. इतके कार्यक्रम झाले, की नानांना अनेक महिने कुटुंबीयांचे दर्शनही होत नसे. नामवंत ...

विनायक जोशी

विनायक जोशी हे मराठी भावगीतांवर आधारित कार्यक्रम करणारे एक गायक होते. ते बँक ऑफ इंडियात नोकरी करत होते. विनायक जोशी यांचे शास्त्रीय संगीतातील औपचारिक प्राथमिक शिक्षण पं. एस.के. अभ्यंकर यांचेकडे झाले. त्यानंतर संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांचेकडे सुगम संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर गजल गायनासाठी पं. विजयसिंह चौहान यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. विनायक जोशी हे सुधीर फडके स्मृती समितीचे ते विश्वस्त होते. चतुरंग प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. गीत नवे गाईन मी, सरींवर सरी, बाबुल मोरा, चित्रगंगा, स्वरभावयात्रा, तीन बेगम आणि एक बादशहा यांसारख्या असंख्य सांगीतिक कार्यक्रमांचे ते संकल्पक हो ...

संगीत प्रकार

हिंदुस्तानी संगीतावर मराठीत अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांपैकी काही ही:- राग किरण फाटक संगीत राग विज्ञान: भाग १ ते ४ सुधा पटवर्धन संगीतशास्त्र परिचय मधुकर गोडसे रागाच्या परिघाकडून केंद्रबिंदूकडे किरण फाटक चला, शिकू या हार्मोनियम! वसंत गजानन देशपांडे रागसंगीतासाठी गांधर्व कंठस्वर: साधना आणि उपाय डॉ. दिग्विजय वैद्य ख्याल: एक विचार किरण फाटक अस्ताई केशवराव भोळे नादवेध अच्युत गोडबोले बंदिश किरण फाटक हिंदुस्तानी संगीत पद्धती - भाग १ ते ५ वि.ना. भातखंडे संगीत दर्पण श्री.रं. कुलकर्णी संगीत निबंधावली किरण फाटक संगीतशास्त्र परिचय मोहन मार्डीकर

संगीत रत्‍नाकर

हा भारतात तेराव्या शतकात रचलेला संगीतशास्त्रावरचा ग्रंथ आहे. हा महाराष्ट्रातील देवगिरीच्या सिंहणराजाच्या काळात आयुर्वेदाचार्य आणि संगीतज्ञ शारंगदेव - अथवा निःशङ्क शार्ङ्‌गदेव - यांनी १३व्या शतकात रचला. हा ग्रंथ आजही हिंदुस्तानी संगीताचा प्राण समजला जातो. याचे लेखन इ.स. १२१० पासून इ.स. १२४७ पर्यंत म्हणजे ३७ वर्षे चालू असावे असे मानले जाते.

संगीतातील राग

जनचित्ताचे रंजन कणाऱ्या स्वर आणि वर्ण यांच्या व्यवस्थेला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात राग असे म्हणतात. स्वरांचा सुंदर प्रभाव पडतो. शास्त्रीय गायनात अथवा कोणत्याही प्रकारच्या गायनात सुस्वरता, स्वरबद्धता, आरोह, अवरोह, तालबद्धता, नजाकत व रंगत आणावयासाठी करण्यात आलेल्या विशिष्ट सांगीतिक रचनांना संगीतातील राग असे म्हणतात.

                                     

बेस संगीत

बास संगीत या प्रकाराला यूके बास किंवा पोस्ट-डबस्टेप देखील म्हटले जाते. बास संगीत हे एक प्रकारचे क्लब संगीत आहे. २०००च्या दशकाच्या मध्यात युनायटेड किंगडममध्ये हा प्रकार प्रचलित झाला. या संगीतावर डबस्टेप, यूके गॅरेज, आर ॲंड बी, वोंकी, हाउस आणि ग्रीम यासारख्या विविध संगीत शैल्यांच्या प्रभाव आहे. "बास संगीत" हा शब्दप्रयोग वापरला कारण कलाकारांनी या शैलींचे ध्वनीचा संमिश्रपणे वापर सुरू केला.

                                     

संगीत शाकुंतल

संगीत शाकुंतल मराठी भाषेतले पहिले संगीत नाटक आहे. या नाटकामुळे मराठी रंगभूमीवर अजरामर संगीत नाटकांच्या परंपरेची सुरवात झाली. कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतलम या संस्कृत नाटकाचे हे मराठी रूपांतर आहे. लेखक: बलवंत पांडुरंग तथा बळवंत पांडुरंग किर्लोस्कर साल: इ.स. १८८० पात्रे: विदूषक चोर सेवक राजा दुष्यंत मातली कण्व मुनी शारद्वत शारंग्रव गौतमी सूत्रधार शकुंतला शिपाई अनसूया नटी प्रियंवदा

                                     

संगीत दिग्दर्शक

नाटकाला/चित्रपटाला संगीत देणाऱ्यास संगीतकार किंवा संगीत दिग्दर्शक म्हणतात. नुसतेच पार्श्वसंगीत देणाऱ्यास संगीत संयोजक म्हणतात. अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांनी हिदी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांपैकी काही हे - एन.दत्ता दत्ता नाईक सी. रामचंद्र रामचंद्र नरहर चितळकर के. दत्ता दत्ता कोरगावकर सुधीर फडके वसंत देसाई दत्ता डावजेकर

                                     

उपशास्त्रीय संगीत

उपशास्त्रीय संगीत हे शास्त्रीय संगीताचा बाज असलेले परंतु त्याचे सगळे नियम न पाळणारे संगीत आहे. ठुमरी, दादरा, कजरी, सावनी, झूला, चैती, होरी, भजन हे सगळे गायनप्रकार उपशास्त्रीय संगीत प्रकारांमध्ये मोडतात. चैती, होरी, कजरी, सावनी हे वेगवेगळ्या ऋतूंशी जुळलेले गानप्रकार आहेत. ह्यातील बरेचसे लक्ष्मी शंकर, गिरिजा देवी अश्विनी भिडे-देशपांडे, शोभा गुर्टू ह्यांनी गायले आहेत.

                                     

उत्तरा केळकर

उत्तरा केळकर या मराठी गायिका आहेत. त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.रंगमंचीय सांगीतिक कार्यक्रमातूनही त्या आपली कला सादर करतात.

                                     

न्यास स्वर

ज्या स्वरावर गाणं किंवा राग समाप्त होतो त्याला न्यास स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ यमन रागात गंधार हा न्यास स्वर मानला जातो. एकंदरीत २१ प्रकारचे न्यास स्वर असतात.

                                     

पार्श्वगायन

गाण्याचा नाटक/चित्रपटात वापरला जाणारा एक प्रकार. मूळात हे गायनच असते.नाटकात /चित्रपटाच्या पडद्यावर कलाकार फक्त तोंड हलवितात.मूळ गाणे अन्य गायक वा गायिकेने गायलेले असते. ते कलाकारासारखे दृश्य स्वरुपात नसतात.

                                     

पॉप संगीत

पॉप संगीत हा पश्चिमात्य लोकप्रिय संगीताचा एक प्रकार आहे. १९५० च्या दशकात रॉक ॲंड रोलवरून प्रेरणा घेऊन अमेरिका व ब्रिटनमध्ये पॉप संगीत उदयास आले. पॉप संगीतामध्ये गायन तसेच अनेक वाद्यांचा वापर केला जातो.

                                     

भारतीय अभिजात संगीत

भारतीय अभिजात संगीत हे वेदकालापासून अस्तित्वात आहे असे मानले जाते. चार वेदांपैकी सामवेद हा गायनविषयक कलांचे विस्तृत विवेचन करतो तसेच तो गेय स्वरूपातही आहे.

                                     

संगीत नाटक अकादमी

The official website of the Sangeet Natak Akademi Data Bank on Traditional/Folk performances An agenda for the arts, Frontline magazine The Hindu, February 15 - 28, 2003 - article on 50th anniversary carnatic india a portal on Indian classical fine arts. D. G. Godse The Academys Awardee 1988 Akdemi Music. The Academys Official List of Award winners. Current events page on the website slightly outdated