ⓘ काव्य - कविता, रुक्मिणी, मधुकर धोंड, विश्वनाथ खैरे, दिव्य प्रबंधम, कृष्णाजी केशव दामले, आनंद यादव, बाळ सीताराम मर्ढेकर, पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी, कविसंकेत ..

कविता

कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, ॲभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे.कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.

रुक्मिणी

रुक्मिणी ही कृष्णाची पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विर्दभाचा राजा होता. देवी रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव सुभानदेव असे होते. देवी रुक्मिणी मातेची ननंद हि देवी लक्ष्मी व देवी सटवाई देवता असुन हे दोन्ही देवता प्रभु विठ्ठल पांडुरंगाच्या सख्या बहिणी आहेत.

मधुकर धोंड

मधुकर वासुदेव धोंड हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

विश्वनाथ खैरे

विश्वनाथ खैरे हे एक मराठी लेखक, कवी, समीक्षक आहेत. त्यांनी काव्य, गद्य, नाट्यविषयक, भाषाविषयक, समीक्षणात्मक व विविध माहितीपर साहित्य लिहिले आहे.

दिव्य प्रबंधम

नालायिर दिव्य प्रबंधम इंग्रजी:Nalayir Divya Prabandham तमिळः நாலாயிர் திவ்ய பிர்பந்த்ம் दिव्य प्रबंधम किंवा नालायिर चार सहस्त्रदिव्य प्रबंधम्‌ ह्या भगवान विष्णूंच्यास्तुतीवर आधारलेल्या ओव्यांचा तमिळ भाषेतील काव्यसंग्रह आहे. हा मुळात, तत्कालीन वैष्णव तमिळ संत आळ्वार ह्यांनी रचला होता. दिव्य प्रबंधम्‌ ही तमिळ साहित्यातील एक सर्वोत्कृष्ट कलाकृती मानण्यात येते. ह्या रचनांचा संदर्भ "दिव्य देशम्‌" शी निगडित आहे. जिथे दिव्य संत आळ्वार भगवान विष्णूंची आराधना करत असत त्या स्थानांना दिव्य देशम म्हणतात. संत आळ्वार यांनी परमेश्वराच्या स्तुतिप्रीत्यर्थ गायलेल्या आणि रचलेल्या काव्यांना "नालायिर दिव्य प् ...

कृष्णाजी केशव दामले

कृष्णाजी केशव दामले हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.

आनंद यादव

आनंद यादव हे मराठी लेखक होते. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.

बाळ सीताराम मर्ढेकर

बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्‍या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल ...

पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी

पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी उर्फ भावगुप्तपद्म, २४ नोव्हेंबर १८४४; मृत्यू: पुणे, २९मार्च १९११)हे मराठीतील निबंधकार व कवी होते. पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी ह्यांनी पुण्यातील पंडित बाळशास्त्री देव ह्यांच्या संस्कृत पाठशाळेत व्याकरण, व्युत्पत्ती, अलंकार इत्यादी विषयांचे अध्ययन केले होते. त्यांची कालिदासाच्या ऋतुसंहारावर आधारित "षड्‌ऋतुवर्णन" ही रचना इ.स. १८८७साली पुस्तकरूपाने प्रकाशित झाली. त्यांनी विविध प्रकारच्या अन्योक्ती आणि काही काव्यकूटे भावगुप्तपद्म या नावाने लिहिली. पांडुरंग पारखींनी लिहिलेले निबंध, हे उपलब्ध ताम्रपट, शिलालेख, चिनी प्रवाशांचे ग्रंथ आदींचा अभ्यास करून ऐतिहासिक दृष्ट ...

अक्षरगणवृत्त

अक्षरगणवृत्ते म्हणजे लघु-गुरु अक्षरांचा साचेबद्ध आणि व्याकरणनिष्ठ आविष्कार करणे होय. अक्षरगणवृत्तामध्ये खालील उपप्रकार असतात अक्षरगणवृत्तात लघू म्हणजे र्‍हस्व उच्चार होणारी अक्षरे आणि गुरू म्हणजे दीर्घ उच्चार होणारी अक्षरे. यांचा क्रम रचनेतल्या प्रत्येक ओळीत पाळण्याचा नियम आहे. यामध्ये ४ ओळींची गण रचना सारखी असते, २ ओळींची सारखी असते अथवा सर्वच ओळींची वेगळी असू शकते. समवृत्त पृथ्वी वृत्त सुवृत्त बहू चांगले म्हणती सूज्ञ पृथ्वी तया आधी ज स ज त्यापुढे स य ल गा ही येती जया| पदात सतरा पहा असती अक्षरे मोजूनी पदा शरण येती ते तरती कीर्ती ऐशी जुनी| शेवट ची ओळ उदाहरण अर्धसमवृत्त विषमवृत्त.

कविसंकेत

निसर्गांत नसलेल्या पण प्राचीन कवींनीं कल्पिलेल्या कविकल्पना किंवा काव्यसंकेत: उदा० चक्रवाक आणि चक्रवाकी यांच्यामध्ये फक्त एक कमळाचे पान असते. पण ती दोघे एकमेकांस दिसत नाहीत. सारी रात्र दोघांना विरहावस्थेत कंठावी लागते. सूर्योदयीं त्यांची भेट होते. स्त्रीच्या विविध हावभावांनीं पुढील वृक्ष बहरतात असा कविसंकेत आहे. अशा बहरण्याला वृक्ष-दोहद% म्हणतात: मंदारा नर्मवाक्यें, सुरुचिर हंसनें चंपका येई बार । रमणीच्या मृदू वाक्यांनी मंदार वृक्ष फुलांनी बहरतो. तिच्या मृदु हास्याने चंपक फुलतो. चंद्रकांत मणी हा त्याच्यावर चंद्रकिरणे पडली की पाझरतो. शेफालिकेची फुले मध्यरात्रीनंतर दरवळू लागतात. चंद्र कुमुदा ...

गीतरामायण

गीतरामायण हे एप्रिल,इ.स.१९५५ ते एप्रिल,इ.स.१९५६ या कालावधीत गजानन दिगंबर माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेले, सुधीर फडके यांनी संगीत दिलेले, आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेले मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या गीतरामायणास भरीव लोकप्रतिसाद मिळाला.

ध्वनिसिद्धांत

ध्वनिसिद्धांत हा आनंदवर्धन या भारतीय साहित्यशास्त्रज्ञाने इ.स.च्या ११ व्या शतकात त्याच्या ध्वन्यालोक या ग्रंथात हा सिद्धांत त्याने मांडला आहे. ध्वनिआत्मा काव्यस्य या अर्थात ध्वनि हाच काव्याचा आत्मा आहे, असे त्याचे म्हणणे आहे. नाट्याचे अंतिम फलित रसनिष्पती होय असा भरतमुनीचा रससिद्धांत आनंदवर्धनाला मान्यच होता. मात्र काव्यात शब्दांच्या वाच्यार्थाला मुळीच महत्त्व नसल्याने त्या वेळी लक्षात आले होते. त्यामुळे शब्दांची अमुखवृत्ती वाच्यार्थ नसलेली हीच सर्व कविव्यापाराच्या मुळाशी आहे, म्हणजे व्यंग्यार्थ असे उद्भटांचे मत होते. ह्या व्यंग्यार्थ वृत्तीच्या विवेचनातूनच आनंदवर्धनाचा ध्वनिसिद्धांत निर्म ...

रुबाई

रुबाई हा मूळ अरबी भाषेतील स्फुट कवितेचा काव्यप्रकार असून, कवी माधव जूलियन यांना सर्वप्रथम मराठीत आणला. त्यांच्यानंतर गो.गो. अधिकारी, ज.के. उपाध्ये यांनीही उमर खय्यामच्या रुबाया मराठीत आणल्या आहेत. कवी कांत, शांता शेळके, प्रफुल्लदत्त, श्रीकृष्ण पोवळे, वा.न. सरदेसाई, रॉय किणीकर यांनीही रुबाया हा काव्यप्रकार हाताळला आहे.

वृक्ष-दोहद

वृक्ष दोहद हा शब्द वृक्षामधल्या अभिलाषेचा द्योतक आहे. वृक्षांनाही काही अभिलाषा असते असे भारतीय संस्कृतीत मानले जाते. वृक्ष दोहदाची पूर्तता कोण्या सुंदरीच्या विशेष क्रियेने होते. वैदिक साहित्य, रामायण, महाभारत, संस्कृत-प्राकृत नाटके आणि काव्ये, रीतिकाव्ये आणि लोकगीतांमध्ये वृक्ष दोहदाचे खूप वर्णन येते. भारतीय संस्कृतीची अशी मान्यता आहे की, की काही वृक्षांची अशी इच्छा असते की त्यांच्या बहरण्या-फुलण्याच्या काळात, म्हणजे तारुण्यात एखाद्या स्त्रीने त्याला स्पर्श करावा, त्याला थोपटावे किंवा त्यावर पदाघात करावा. याच कारणाने भारतीय साहित्यात युवतींच्या उपवन-वाटिकांवरच्या वा उद्यानांवरच्या प्रेमाचे ...

                                     

रामचंद्र श्रीपाद जोग

रामचंद्र श्रीपाद जोग हे मराठी लेखक होते. हे १९६०मध्ये ठाणे येथे भरलेल्या ४२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. यांचे टोपणनाव निशिगंध आहे.

                                     

विठ्ठल दत्तात्रेय घाटे

वि.द. घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे १८ जानेवारी, १८९५ - ३ मे, १९७८ हे मराठी कवी, लेखक होते. हे कवी दत्त तथा दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे ज्येष्ठ पुत्र होत. विठ्ठलरावांची कन्या डॉ. अनुराधा पोतदार, नातू डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि नात यशोधरा पोतदार-साठे हे सर्वच कवी आहेत. वि.द.घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललितलेखन प्रकार हाताळले. आचार्य अत्रे यांच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तक म्हणून नावाजलेली ’नवयुग वाचनमाला’ संपादित केली.

                                     

निरंजन उजगरे

दिपवा इ.स. १९९५ जायंटव्हील काव्यपर्व फाळणीच्या कविता महाराष्ट्राबाहेरील मराठी प्रहर इ.स. १९९१ कवितांच्या गावा जावे ३१ जुलै, इ.स. २००१ दिनार हिरोशीमाच्या कविता परिच्छेद नवे घर इ.स. १९७७ तत्कालीन

                                     

छंदोरचना

माधव जूलियन यांनी १९३७ साली लिहिलेल्या छंदोरचना या ग्रंथाबद्दल त्यांनी मुंबई विद्यापीठाने डी.लिट. ही पदवी दिली. या ग्रंथात काव्य रचनेमध्ये वापराची विविध प्रकारचे छंद, जाती आणि वृत्ते यांचा परिचय करून दिलेला आहे. त्या ग्रंथातला काही भाग येथे जशाच्या तसा उद्‌धृत केला आहे. मराठीत छंद, जाती आणि वृत्त ह्या तीन मुख्य पद्यप्रकारांत काव्यलेखन होते.

                                     

विद्रोही कविता

काव्यलेखनासाठी पारंपरिक रंजनवादी शैली टाळून कल्पनारम्यतेला नकार देऊन आशयाला थेट भिडणारी वास्तववादी कविता हे विद्रोही कवितांचे वैशिष्ट्य.तसेच प्रवाहा विरुद्ध तसेच निसर्ग कविता, ललित कविता वगळून प्रचलित व्यवस्थेवर आसूड ओढणाऱ्या कविता म्हणून ओळखल्या जातात.

                                     

विनोदी कविता

विनोदी कविता हा साहित्य लेखनातील एक पद्य प्रकार आहे. यात पद्यातून विनोद कथन केला जातो. प्रल्हाद केशव अत्रे हे मराठी विनोदी कविता लेखन करित असत. मराठी साहित्यातला हा तुलनेने नवीन प्रकार आहे. राहुल:पप्पु.!काय् करतो रे! तु आजकाल? पप्पु: मी एम.बी.बी.एस राहुल: तुला बघेल् तेव्हा तु शेतात्, आसतोस् आन एम् बी. बी.एस्.कधी करतोस्.? एम्. बी.बी.एस्.म्हणजे म्ह्शी बघता साळु‌खे स्वप्नाली सुरेश