ⓘ नाटक - नाटक, नटसम्राट, नाटक, महाराष्ट्र नाटक मंडळी, नाट्यसंस्था, पौराणिक नाटक, सेलिब्रेशन, तो मी नव्हेच, मराठी नाटक, अंमलदार, ऐतिहासिक नाटक ..

नाटक

नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असू शकते. नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात आलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे ब्रेथ हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून बारा तासांपर्यंत असू शकतो. ‘वा ...

नटसम्राट (नाटक)

नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला.

महाराष्ट्र नाटक मंडळी (नाट्यसंस्था)

महाराष्ट्र नाटक मंडळी ही मराठी नाटकांची निर्मिती करणारी नाट्यसंस्था होती. १० सप्टेंबर, इ.स. १९०४ रोजी हिची स्थापना झाली. या मंडळीने कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित कीचकवध, भाऊबंदकी इत्यादी नाटके रंगभूमीवर आणली व ती नाटके विशेष गाजली. त्र्यंबक सीताराम कारखानीस, केशवराव दाते इत्यादी अभिनेत्यांनी या मंडळीची धुरा वाहिली.

पौराणिक नाटक

पौराणिक नाटक हे हिंदू पुराणांतील कथांवर आधारलेले नाटक होय. यात रामायण, महाभारतातील यांतील कथांचाही समावेश होतो. सौभद्र, स्वयंवर, सुवर्णतुला, धाडीला राम तिने का वनी, मत्स्यगंधा, द्रौपदी, कच देवयानी ही या प्रकारच्या नाटकांची काही उदाहरणे आहेत. हिंदू पौराणिक कथांप्रमाणेच ग्रीक कथांवरही मराठीत नाटके आहेत. उदाहरणार्थ, ईडिपस रेक्स. शांता वैद्य यांनीही हे नाटक ‘राजा इडिपस’ या नावाने मराठीत आणले आहे. हेच नाटक विवेक आपटे यांनी ‘आदिपश्य’ या नावाने मराठीत आणले. त्यांनी नाटकाचे मूळ स्वरूप बदलून त्याला मराठी कीर्तनाचा साज चढवला आहे. ‘आदिपश्य’चे दिग्दर्शक - चिन्मय मांडलेकर होत. या नाटकाचे पन्‍नासहून अधि ...

सेलिब्रेशन (नाटक)

सेलिब्रेशन हे प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग नोव्हेंबर १९, २००३ रोजी जिगीषा क्रिएशन्स प्रा. लि., मुंबई या नाट्यसंस्थेतर्फे शिवाजी मंदिर, दादर येथे झाला.

तो मी नव्हेच (मराठी नाटक)

तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी "लखोबा लोखंडे" ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित होती, व खटला हा बार्शीच्या कोर्टात चालू होता.

                                     

अंमलदार (नाटक)

अंमलदार हे पु.ल. देशपांडे यांनी रूपांतरित केलेले पहिलेच नाटक आहे. रशियन नाटककार निकोलाय गोगोल ह्याच्या द इन्स्पेक्टर जनरल या नाटयकृतीचे हे मराठी रूपांतर आहे. अंमलदार मध्ये स्वतः पु.ल. देशपांडे सर्जेरावांची भूमिका करत.

                                     

ऐतिहासिक नाटक

ऐतिहासिक नाटक हे ऐतिहासिक कथा व व्यक्तिरेखांवर आधारित नाटक होय. यातील कथानक काही सत्य आणि काही काल्पनिक गोष्टींवर आधारित असते. बेबंदशाही, रायगडाला जेव्हा जाग येते आणि ही श्रींची इच्छा ही या प्रकारच्या नाटकाची काही उदाहरणे आहेत.

                                     

मालतीमाधव (नाटक)

मालतीमाधव हे भवभूतींनी लिहिलेले एक नाटक आहे.यात दहा अंक आहेत.ही एक प्रेमकथा आहे.हे त्यांचेद्वारे भारताच्या उत्तरेत लिहीण्यात आलेले नाटक आहे.त्यात तेथील नद्या,झाडे, वाडे, देवालये इत्यादींचा सुंदर उल्लेख करण्यात आलेला आहे.असे समजण्यात येते कि या नाटकाचा पहिला प्रयोग कालप्रियनाथाच्या यात्रेत करण्यात आला.

                                     

संगीत नाटक अकादमी फेलोशिप

संगीत नाटक अकादमी फेलोशिप, हा एक प्रयोगिक कलांसाठी संगीत नाटक अकादमीने सादर केलेला भारतीय सन्मान आहे. अकादमीने दिलेला हा" सर्वात प्रतिष्ठित आणि दुर्मिळ सन्मान” आहे आणि कोणत्याही वेळी केवळ ४० व्यक्तीपुरता हा मर्यादित आहे.

                                     

महावीर चरित्र (नाटक)

महावीर चरित्र या भवभूतींनी लिहिलेल्या संस्कृत नाटक वीर रसावर आधारीत आहे. हे नाटक अपूर्ण आहे असे म्हणतात. त्याचे फक्त पाचच अंक उपलब्ध आहेत.या नाटकात रामाचे वर्णन आहे.

                                     

प्रीतिसंगम (नाटक)

प्रीतिसंगम हे मराठी भाषेतील आचार्य अत्रे यांनी लिहिलेले आणि गाजलेले संगीत नाटक आहे. हे नाटक संत सखूच्या जीवनावर आधारले आहे. विश्वनाथ बागुल, ज्योत्स्ना मोहिले आणि उदयराज गोडबोले यांनी या नाटकाच्या पहिल्या प्रयोगांत भूमिका केल्या होत्या. वसंत देसायांनी या नाटकातील गाण्यांना चाली दिल्या होत्या. हे नाटक पुढे प्रशांत दामले, क्षमा वैद्य व मोहन जोशी यांनीही केले.

                                     

आनंदी निधान

आनंदी निधान महाराष्ट्रातल्या अहमदनगर शहरातील गांधी मैदानाजवळ असलेले, सर्वात जुने नाट्यगृह होते. नगरमध्ये झालेले पहिले नाटक याच नाट्यगृहात झाले होते. त्या नाट्यगृहाचे रूपांतर पुढे चित्रा नावाच्या चित्रपटगृहात झाले. प्रारंभी तेथे काही मूक चित्रपट लागले व पुढे बोलके चित्रपट लागू लागले.

                                     

एलन स्टीवर्ट

एलन स्टीवर्ट हा ‘ल ममा’ या १९६१ पासून चालू असलेल्या जगप्रसिद्ध प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या संस्थापक होत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या या आफ्रिकन-अमेरिकन विदुषीने अनेक रंगकर्मीना पुढे आणले. पैकी नाटककार सॅम शेपर्ड, संगीतकार फिलीप ग्लास हे प्रमुख. आफ्रिकेतील अनेक छोट्या देशांतील रंगकर्मी, संगीतकार, गायक यांना त्यांनी न्यूयॉर्कमध्ये हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

                                     

चित्रनाट्य

एका किंवा एकाहून अधिक चित्रकारांच्या चित्रांवर आधारलेल्या नाट्यकृतीला चित्रनाट्य म्हणतात. चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांवर आधारित चित्रगोष्टी हे नाटक आविष्कार नाट्यसंस्थेने रंगभूमीवर आणले आहे. त्यात २० कलाकार काम करतात. नाटकाची संकल्पना शांता गोखले यांची असून लेखन-दिग्दर्शन सुषमा देशपांडे यांचे आहे. या चित्रनाट्याचा पहिला प्रयोग पुण्यात १४ डिसेंबर २०१२ रोजी झाला. पहा: नाटक

                                     

त्र्यंबक सीताराम कारखानीस

त्र्यंबक सीताराम कारखानीस हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक होते. ते महाराष्ट्र नाटक मंडळी या नाट्यसंस्थेचे संस्थापक होते. आपल्या नाट्यसंस्थेद्वारा कारखानीस यांनी गडकरी, देवल, खाडिलकर, औंधकर, खरे, आदी नामवंत नाटककारांची पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा विविध स्वरूपांची एकूण सोळा नाटके रंगभूमीवर आणली. पहा: महाराष्ट्र नाटक मंडळी नाट्यसंस्था; महाराष्ट्रातील नाट्यसंस्था