ⓘ इतिहास - इतिहास, भारतीय सैन्याचा इतिहास, भारत इतिहास संशोधक मंडळ, महाराष्ट्राचा इतिहास, बौद्ध धर्माचा इतिहास, भारताचा इतिहास, इराक युद्ध, गागाभट्ट, तवारिख ..

कालखंडानुसार इतिहास खंडानुसार इतिहास इतिहास दालने देशानुसार इतिहास विषयागणिक इतिहास इतिहासावरील अपूर्ण लेख इ.स. ११७ इ.स. १२६ इ.स. ७०६ इतिहासकार ऐतिहासिक मार्ग ऐतिहासिक व्यक्ती घटना जगातील विविध संस्कृती जीवनक्रम दलित इतिहास देशानुसार ऐतिहासिक वास्तू देशानुसार राज्यकर्ते धर्माचा इतिहास पोलंडचा इतिहास प्रदेशानुसार इतिहास प्राचीन घटना प्राचीन राज्ये प्राचीन शहरे प्राचीन संस्कृती बौद्ध धर्माचा इतिहास भारताचा इतिहास भूतपूर्व साम्राज्ये मराठा इतिहास मानवी स्थलांतर रोमन इतिहास लष्कर विकिपीडियाचा इतिहास विकिप्रकल्प इतिहास विषयानुसार इतिहास शिलालेख इतिहासविषयक साचे ऐतिहासिक मार्गक्रमण साचे साम्राज्ये हस्तलिखिते

इतिहास

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = इति + ह +आस = हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो. प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय टायम ब ...

भारतीय सैन्याचा इतिहास

भारतीय सेनेचा इतिहास उपलब्ध काही संदर्भांनुसार, लाखो वर्षांचा आहे. तो वेदकालिन व रामायण तसेच महाभारत यांच्याइतका जूना आहे. पुरातन कालापासून ते १९व्या शतकापर्यंत अनेकानेक राजांनी व सम्राटांनी आपले परंपरागत सैन्य तयार केले होते.भारताचे इतिहासात सत्ता, भूमी व तत्त्वांसाठी अनेक लढाया झाल्यात. त्यावेळेस परंपरागत युद्धसाधनांचा वापर करण्यावर भर होता. कोणी आक्रमण केल्यास संरक्षित रहावे म्हणून किल्ल्यांचा वापरही करण्यात येत असे. पुरातनकाली सैन्याचे पायदळ व घोडदळ होते. तसेच लढाईत काही ठिकाणी हत्तींचाही वापर करण्यात येत असे.

भारत इतिहास संशोधक मंडळ

भारत इतिहास संशोधक मंडळाची विश्वनाथ काशीनाथ राजवाडे आणि सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुण्यातील अप्पा बळवंत चौकात असलेल्या सरदार मेहेंदळे यांच्या वाड्यात केली. पुढे ही संस्था पुण्याच्या सदाशिव पेठ परिसरातील स्वतःच्या इमारतीत स्थलांतरित झाली. त्यानंतरही पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ इतिहास संशोधकांना मदत करण्यासाठी आणि ऐतिहासिक अभ्यासाच्या प्रगतीस हातभार लावण्याच्या उद्देशाने पुढे चालूच राहिले. जनतेने मंडळाला दानादाखल पुस्तके आणि कागदपत्रे मिळवून देऊन खूप समर्थन दिले. राजवाडे यांचे शिष्य दत्तो वामन पोतदार, गणेश हरि खरे आणि वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी मंडळाच्या कामात स्वतःला झोक ...

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्रातील नद्या, पर्वत आणि इतर स्थळांचा रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. परंतु विश्वसनीय ऐतिहासिक साधने वापरून लिहिलेला महाराष्ट्राचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून उपलब्ध आहे. राजकीय कालखंडानुसार महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मोगल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.

बौद्ध धर्माचा इतिहास

सम्राट अशोक च्या शिलालेखानुसार, बौद्ध धर्माचा प्रसार त्याच्या काळात खूप दूरवर झाला होता. सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग दाखवणारे तथागत बुद्ध दिव्य आध्यात्मिक अवस्थांमधील विभूती मानले जातात. जगभरातील कोट्यवधी लोकांनी भगवान बुद्धांनी दिलेल्या अष्टांगिक मार्ग या आठ सिद्धान्तांवर विश्वास ठेवलेला आहे. भगवान बुद्धांच्या मते, धम्म जीवनाचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी,व परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी आणि निर्वाण प्राप्त करण्यासाठी तृष्णा सोडणे आवश्यक आहे. याशिवाय, भगवान बुद्धांनी सर्व संस्कारांना कायमचे वर्ज्य केले आहे. भगवान बुद्धंनी नैतिक संस्थेचा आधार म्हणून मानवाचे वर्णन केले आहे. भगवान बुद्धांनुसा ...

भारताचा इतिहास

भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. येथील लिखित इतिहास २,५०० वर्षांपूर्वीचा असून इतर पुराव्यांनुसार भारतात ७०,००० वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्त्व आणि इतिहास आहे. भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ताकेंद्री आल्या या राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय. मौर्य साम्राज्य ज्याला गुप्त राज्य असेही म्हटले जाते.हे भारतातील पहिले प्रभावी असे केंद्रीय शासन होते भारतामध्ये सत्ताही मोठ्या काळापर्यंत टिकू ...

                                     

इराक युद्ध

२० मार्च २००३ ते १८ डिसेंबर २०११ दरम्यान चाललेले युद्ध. यात अमेरिका आणि मित्र देशांनी बाथ सत्ताधारी इराकमध्ये आक्रमण केले. बाथ पक्षाची सत्ता उलथवण्यात आली आणि सद्दाम हुसेनला पकडण्यात आले.

                                     

गागाभट्ट

शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी जेव्हा राज्याभिषेक करणे आवश्यक झाले तेव्हा महाराष्ट्रातील ब्राह्मण अनुकूल नव्हते. आधीच्या शेकडो वर्षांत महाराष्ट्रात कोणालाच राज्याभिषेक न झाल्याने राज्याभिषेकाच्या विधींचे कोणालाच ज्ञान नव्हते. या विषयावरील ग्रंथही उपलब्ध नव्हते. महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला नकार दिला. मात्र पैठणमधील एका ब्राह्मणाने काशीतील गागाभट्टांचे नाव सुचवले.

                                     

गॉर्डियन गाठ

गॉर्डियन गाठ ही अलेक्झांडर द ग्रेटशी निगडीत एक प्राचीन आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार ही गाठ सोडवणारा मनुष्य आशियाचा राजा बनेल असे भाकित वर्तवले गेले होते. आधुनिक काळात गॉर्डियन गाठ हा शब्दप्रयोग नेहमीच्या मार्गाने सोडविणे अशक्यप्राय वाटणारा परंतु वेगळ्याच तऱ्हेने विचार केला असता अगदी सोपा असलेला प्रश्न यास उद्देशून वापरला जातो.

                                     

तवारिख

तवारिख तथा तवारीख या अरबी शब्दाचा अर्थ इतिहास आहे. यात कालक्रमानुसार घटनांची जंत्री व वर्णने लिहिली जातात. इस्लामपूर्व-काळातील अरबी जमातींचा लिखित व अलिखित इतिहास दंतकथांनी भरलेला असे. हदीस म्हणजे इस्लामी स्मृतीशास्त्रांच्या नियमांनुसार इतिहासलेखनात ‘इस्नाद’ म्हणजे अनेक पुरावे दिले जात. तवारिखा या लेखनप्रकाराने ऐतिहासिक काळातील घडामोडीना महत्त्व आले आणि अरबी लेखनात अधिक विश्वासार्हता आली. अनेक बखरी या तवारिखांवर आधारित असल्याचे आढळते. थदबदददददडतवारिख हा लेखनप्रकार फार्सी भाषेतही आढळून येतो.

                                     

ताम्र युग

ताम्र युग किंवा कांस्य युग हा पृथ्वीवरील असा ऐतिहासिक काळ होता जेव्हा तांबे अथवा कांसे ह्या धातूंपासून औजारे व आयुधे बनवली जात होती. तीन ऐतिहासिक युगांमधील ताम्र युग हे पाषाणयुग व लोह युग ह्यांच्या मधील काळ मानले जाते. ह्या युगात धातू वितळवून त्यापासून वस्तू बनवणे शक्य झाले. भारतामध्ये जोर्वे, मालवा, सावलंदा ह्या महत्त्वाचा ताम्रयुगीन पुरातत्वीय स्थळे आहेत.

                                     

ताम्रपट

ताम्रपट हा तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला मजकूर असतो. यावर प्रामुख्याने दानपत्रे आणि राजाज्ञा तसेच इतर दूरगामी आज्ञा कोरुन ठेवण्याची प्रथा दिसून येते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने भारतीय क्रांतिकारकांना त्यांच्या बलिदानाच्या गौरवार्थ ताम्रपट दिले होते.

                                     

नान्जिंगची कत्तल

१३ डिसेंबर १९३७ रोजी दुसर्‍या चीन-जपान युद्धात जपानी सैनिकांनी चीनचे नान्जिंग शहर जिंकले. त्यावेळी साधारण २,५०,००० ते ३,००,००० लोकांचा खून व २०,००० स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला.

                                     

कृ.वा. पुरंदरे

चिमणाजी बल्लाळ उर्फ चिमाजी आप्पा मराठ्यांच्या इतिहासाची साधने पुरंदरे दप्तर १ व ६ शिवचरित्र साहित्य खंड १ पुरंदर: शिवरायांची पहिली राजधानी शंकराजी नारायण पंतसचिव शिवचरित्र साहित्य खंड ७

                                     

पोप ग्रेगोरी चौथा

ग्रेगोरी चौथा हा जानेवारी २५, इ.स. ८२७ ते मृत्युपर्यंत पोप होता. याच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. त्याने रोममधील बेसिलिका दि सान मार्कोची पुनर्बांधणी केली.

                                     

प्राचीन जगतातील सात आश्चर्ये

आर्टेमिसचे मंदिर मॉसोलस येथील थडगे ऑलिंपीया येथील झ्यूसचा पुतळा गिझाचे महान पिरॅमिड्स बॅबिलॉनचे झुलते बगीचे अलेक्झांड्रियाचा दीपस्तंभ र्‍होडस येथील हेलिओसचा प्रचंड पुतळा