ⓘ संस्कृती - संस्कृती, हडप्पा संस्कृती, बनास संस्कृती, प्राचीन इजिप्त संस्कृती, भारतीय संस्कृती, ग्रीक संस्कृती, सिंगापूरची संस्कृती, बौद्ध संस्कृती, कुंभार ..

प्रदेशानुसार संस्कृती राष्ट्रीयत्वानुसार संस्कृती देशानुसार संस्कृती धर्मानुसार संस्कृती संस्कृतीनुसार मिथकशास्त्र समुद्री संस्कृती अन्न व पेये अभिवादने आख्यायिका संस्कृतीनुसार आडनावे उपसंस्कृती उपासना पद्धती कला कृत्रिम वस्तू क्रीडा जागतिक वारसा स्थाने तत्त्वज्ञान तीर्थक्षेत्रे धर्म नावे नियतकालिके परंपरा पर्यटन पुस्तके पोशाख प्राच्यविद्या प्रादेशिकता भाषा मनोरंजन मानवी हक्क मिथकशास्त्र युनेस्को लिप्या लोकनृत्ये लोकसाहित्य वांशिकता विज्ञान व तंत्रज्ञान विश्वास वृत्तपत्रे शिक्षण सण आणि उत्सव समाज संस्था सांस्कृतिक इतिहास सांस्कृतिक देवाणघेवाण

संस्कृती

संस्कृती या संस्कृत शब्दाचा अर्थ चांगले करणे असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार. संस्कृती ही विविध अर्थच्छटा असणारी संकल्पना आहे. हा शब्द सहसा खालीलपैकी एखादा अर्थ ध्वनित करण्यासाठी योजला जातो: एखाद्या संस्थेच्या / संघटनेच्या किंवा एखाद्या समूहाच्या प्रवृत्ती, मूल्ये, ध्येये, प्रथा-प्रघात इत्यादी सामायिक बाबी मानवी ज्ञान, समजुती, वर्तणुकी इत्यादींचा एकत्रित परिपाक कला व शास्त्रे यांतील उच्च अभिरुची - अर्थ ...

हडप्पा संस्कृती

हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने त ...

बनास संस्कृती

भारतातील ताम्राषाणयुगीन संस्कृती हडप्पा संकृतीनंतरच्या काळातील आहेत.मात्र राजस्थानच्या मेवाड प्रदेशातील आहाड किंवा बनास या नावाने ओळखली जाणारी संस्कृती हडप्पा संस्कृतीची समकालीन होती. उदयपुर जवळच्या बलाथल आणि गीलुंड संस्कृतीची महत्त्वाची स्थळे आहेत. बालाथल येथील पुराव्या नुसार ती इसवी सनापूर्वी ४००० वर्षे प्राचीन होती. उदयपूरजवळच्या आहाड इथे तिचा शोध प्रथम लागला म्हणून तिला आहाड संस्कृती असे नाव देण्यात आले.हे गाव आहाड या बनास नदीच्या उपनदी वर वसलेले आहे.म्हणून तिला बनास संस्कृती असेही म्हणतात.

प्राचीन इजिप्त संस्कृती

प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोऱ्यात वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५०च्या सुमारास पहिल्या फॅरोने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते. पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला. या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. इ.स.पू. ३१च्या सुमारास रोमन साम्राज्याने शेवटच्या फॅरोचा पराभव करून इजिप्तला आपला एक प्रांत करून घेतले. खोदकाम, बांधकाम, शेती यात प्रावीण्य मिळवलेली आणि स्थिर समाजरचना असलेली ही संस्कृती होती. ओझायरिस या मृत्यूच्या देवते शिवा ...

भारतीय संस्कृती

संस्कृती या शब्दामध्ये सम् हा उपसर्ग आणि कृ हा संस्कृत धातू आहे. संस्कृतीचा अर्थ सर्वसमावेशक कृती असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार. भारतीय संस्कृती ही देशाच्या इतिहासामुळे, विलक्षण भूगोलामुळे आणि जनतेतील वैविध्यामुळे आकारास आली आहे. शेजारच्या देशांतील चालीरीती, परंपरा व कल्पना सामावून घेत, भारतीय संस्कृतीने सिंधुसंस्कृतीदरम्यान जन्माला आलेले तसेच वैदिक काळात, दक्षिण भारतातील लोहयुगकाळात, बौद्ध धर्माच्या ...

ग्रीक संस्कृती

ग्रीक संस्कृती चा उदय इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास युरोप खंडाच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या लहान-लहान बेटांमध्ये झाला. येथील लोक ग्रीक म्हणून ओळखले जातात आणि त्यांची संस्कृती म्हणजे ग्रीक संस्कृती होय. ग्रीसमध्ये विशिष्ट प्रकारची संस्कृती उदयास येण्यास तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरली. ग्रीसच्या उत्तरेला पर्वतांच्या रांगा आहेत. इतर तिनही दिशांना भूमध्य समुद्र आहे. त्यामुळे तेथील लोक उत्तम दर्यावर्दी बनले. तुटक डोंगराळ प्रदेश व शेकडो लहान-लहान बेटे यामुळे तेथे लहान-लहान नगर राज्ये उदयास आली. मात्र प्रबळ मध्यवर्ती सत्ता उदयास येऊ शकली नाही.

सिंगापूरची संस्कृती

सिंगापूरची संस्कृती मध्ये आशियाई आणि युरोपियन संस्कृतींचे मिश्रण पाहायला मिळते. मलय, दक्षिण आशियाई, पूर्व आशियाई आणि युरेशियन संस्कृतीच्या सिंगापूरवर असलेल्या प्रभावामुळे सिंगापूरला "इझी एशिया", "गार्डन सिटी" अश्या नावांनी देखील संबोधले जाते.

बौद्ध संस्कृती

बौद्ध कला, बौद्ध वास्तुशास्त्र, बौद्ध संगीत आणि बौद्ध पाककृती यांच्याद्वारे बौद्ध संस्कृती आहे. भारतीय उपखंडात बौद्ध धर्माचा विस्तार झाला आहे. आशिया खंडातील इतर देशांतील कलात्मक आणि सांस्कृतिक घटकांचा त्यांनी अवलंब केला आहे.

पर्शियन संस्कृती

आशिया खंडाच्या पश्चिमेला, इ. स. पू. १५०० ते इ. स. ७०० या काळात अस्तित्वात असलेल्या संस्कृतीला पर्शियन संस्कृती किंवा इराणी संस्कृती असे म्हणतात. ही अतिशय समृद्ध संस्कृती होती. पूर्वेस काराकोरम व हिंदुकुश पर्वत ते तायग्रिस नदी व युफ्रेटीस नदीचे खोरे या भागात ही संस्कृती होती. प्राचीन ग्रीस व रोम यांचा इराणशी संबंध होता. त्यामुळे ग्रीक व रोमन साहित्यांतून पर्शियन संस्कृती विषयी माहिती मिळते. तसेच चिनी बखरींमधूनही काही माहिती मिळते. या संस्कृतीने इस्लाम च्या आक्रमणाला कडवा लढा देण्याचा प्रयत्न केला. प्राचीन वैदिक संस्कृती आणि पर्शियन साहित्य आणि संस्कृती यात साम्य आहे असे मानतात. इ.स. पूर्व ३ ...

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचि स्थापना १९ नोव्हेंबर १९६०ला झाली. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही संस्था उभारली. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.

माया संस्कृती

माया संस्कृती ही अमेरिका खंडातील एक प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने दक्षिण अमेरिका खंडात झाला. मेक्सिको देशाच्या खालील भागात पसरलेल्या शहरांचे भग्न अवशेष आढळून येतात. स्पॅनिश आक्रमकांनी या संस्कृउतीचा सर्वनाश केला. त्यातील एका ख्रिस्ती धर्मप्रसारकाने इ.स.पू. १५५० च्या सुमारास काही माहिती नष्ट होतांना नोंदवून ठेवली त्यानुसार माया संस्कृतीच्या इतिहासाची माहिती घेता येते. पण ही अतिशय त्रोटक स्वरूपात उपलब्ध आहे.

हाक्रा संस्कृती

हाक्रा संस्कृती पाकीस्तानात सरस्वती नदीला हाक्रा असे नाव आहे. त्यामुळे तेथे सापडलेल्या सिंधु पूर्व संस्कृतीला हाक्रा संस्कृती असे नाव दिले गेलेले आहे. डॉ.रफिक मोगल यांनी तेथे चोलीस्तानच्या वाळवंटात केलेल्या अन्वेषणात ही संस्कृती उजेडात आली. तेथे बहावलपूर जिल्ह्यात या संस्कृतीची शंभराहून अधिक स्थळे त्यांनी शोधून काढली आहेत. भारतातही अशी काही स्थळे सापडली आहेत. पाकीस्तानात हडप्पा आणि जलीलपूर आणि भारतात कुणाल येथील हाक्रा संस्कृतीच्या वसाहतींचे उत्खनन झालेले आहे. हाक्रा संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. मातीच्या आणि कुडाच्या भिंती असलेल्या झोपड्यात हे लोक राहत असत. लाकडी वाशांवर छत उभारले जा ...

इस्लामी कॅलिग्राफी

इस्लामिक सुलेखन सामान्य इस्लामिक सांस्कृतिक वारसा आहे. वर्णमाला आधारित हस्ताक्षर व सुलेखन कलात्मक सराव आहे. यामधे अरेबिक, ऑट्टोमन आणि पर्शियन कैलिग्राफी समावेश आहे. हे खट्ट इस्लामी म्हणून अरबी मधे ओळखले जाते अर्थ इस्लामिक ओळ, रचना, किंवा बांधकाम.

कुंभार

ओल्या मातीपासून सुरई, माठ, खुजे, रांजण, कुंड्या, घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या इत्यादी घडवून, त्या वस्तू भाजून विकणारा कारागीर. तो एकेरी आणि दुहेरी चुली व शेगड्याही तयार करतो, मात्र त्या भाजायची गरज नसते. महाराष्ट्रातील कुंभार गौरी-गणपतीच्या, दुर्गेच्या आणि अन्य मूर्ती, हरतालिका, बैलपोळ्याचे बैल, दिवाळीच्या किल्ल्यात ठेवायच्या वस्तू आणि बाहुल्याही बनवतो. कुंभार हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ऋग्वेद कालापासून कुंभार आहेत. त्यांच्या देवता पांचानेपीर, भवानी, सांगई, सीतला, हर्दिया या असतात.

कोजागरी पौर्णिमा

कोजागरी पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा, हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी असेही संबोधिले जाते. पण हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते.आणि मध्यरात्री संस्कृतमध्ये को जागर्ति म्हणजे कोण जागत आहे असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. मान्यता आहे की कोण जागे आहे याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे आणि ...

क्षेत्री

क्षेत्री प्रादेशिक खसांना जातीचे क्षत्रिय समाज असे म्हटले जाते. खस कुरा ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन उत्तर विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. साधारणपणे, पार्वती / पहाड़ी क्षत्रियांना अक्षरभूमी क्षेत्री असे म्हटले जाते. अनेक इतिहासकारांनी क्षेत्रीला खस राजपूत असे नाव दिले आहे. क्षेत्रीस यांनी शासक, प्रशासक, राज्यपाल आणि योद्ध्यांची सेवा केली. क्षेत्री संस्कृत शब्द क्षत्रियचे प्रत्यक्ष व्युत्पन्न केले जाते. सन् १८५४ नेपाळी मुलुकी ऐन, क्षेत्री द्विज एवं तागाधारी यज्ञोपवीत हिंदू जातिचे लोक वर्गीकृत करण्यात आला. सन् 1951 पर्यंत सरकारने आणि सैन्याला मक्तेदारी मिळवून बहुतेक नेपाळी इतिह ...

दुर्गभ्रमण

रावे.्गभ्रमण अथवा ट्रेकिंग करण्यासाठी अनेक भ्रमणमंडळं महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत स्थापन झाली आहेत.हे भ्रमण प्रामुख्याने किल्ल्यांवर किंवा इतर ऊंच डोंगरावर करण्यांत येतं. ट्रेकर मंडळी साधारणतः किल्ल्यावरच्या देवळांमध्ये किंवा इतर इमारतींमध्ये निवारा घेतात. अनेक किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्येपण निवारा घेतांत. गावकरी सहसा ट्रेकर लोकांचे स्वागत आणि मदत करतात, पण अनेकदा भ्रमक गावकऱ्यांना वेळकाळाचा विचार न करता अडचण निर्माण करताना अढळतांत. काहीं वेळा गावकऱ्यांकडून भ्रमकांच्या ऐवजाची चोरी झाल्याचेही ऐकू येते. हे सर्व टाळण्यासाठी काही पाळले तर भ्रमण सुखकारक आणि सर्वांच्या सोयीचे होई ...

पितृपक्ष

पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. हा भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष असतो. यास महालय असेही नाव आहे. आपल्या नातेवाइकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, त्या नातेवाइकाचे श्राद्ध, पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. या पक्षात यमलोकातून पितर आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने, हा पक्ष अशा पितृकार्याला योग्य समजला जातो. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रव ...

बुद्ध जयंती

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. यातील अने ...

भुलाबाई

भुलाबाई म्हणजे पार्वती, जगन्माता. भूमीसारखी सर्जनशील. ही खेळोत्सव म्हणजे भूमीचा पार्वतीचा सर्जनोत्सव. शिवशक्तीची पूजा. एक प्रकारचा सुफलन विधी. भूलोबा हे शंकराचे प्रतीक या पूजेत खेळोत्स्वात शंकराची फक्त हजेरी असते. भुलाबाईच्या पूजनात श्री. वाकोडे यांना यक्ष संप्रदाय, शक्ती संप्रदाय यांच्या खुणा दिसतात. भाद्रपद पौर्णिमा सहसा अनंत चतुर्दशीच्या नंतरचा दिवस ते आश्विन पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा या एक महिन्याच्या कालावधीत खेळत्या वयाच्या मुली महिनाभर विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात बाहुल्या बसवून साजरा करतात., सायंकाळी सामूहिकपणे मैत्रिणींसोबत गाणी म्हणतात. ही ...

भोंडला

भोंडला किंवा भुलाबाई किंवा हादगा हा एक महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे. महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने ही एकच परंपरा पाळत असल्याचे दिसते. मुलींचे पावसाळ्यातील समूह नृत्य असेही या खेळाला संबोधिले जाते.

मडिसार

मडिसार ही भारताच्या तमिळनाडू राज्यातील ब्राह्मण समाजाच्या स्त्रीयांकडून साडी परिधान करण्यासाठीची एक शैली आहे. पाश्चात्य काळी, कोणत्याही लग्न झालेल्या स्त्रीने या शैलीद्वारे साडी परिधान करण्याची प्रथा होती, परंतु आज, बदलत्या काळानुरूप या पद्धतीत अनेक बदल झालेले दिसतात. जरी मडिसार स्त्रीयांकडून सर्ववेळ परिधान केली जात नसली तरीही संस्कॄतीची जपवणूक व्हावी या दृष्टीने काही ठरावीक सामाजिक व धार्मिक सण, उत्सव वा इतर समारंभ जसे लग्न समारंभ, इत्यादींमध्ये आजही काही स्त्रिया या पद्धतीने साडी परिधान करतांना दिसतात. शिवाय केवळ ब्राह्मण समाजातीलच नव्हे इतर समाजांतील व इतर प्रांतांमधील स्त्रीयादेखील ह्य ...

लोकगीत

लोकसंगीतातील गीते बरेचदा संगीताच्या चार ते पाच स्वरातच गायली जातात, त्यामुळे गाण्यासाठी ती तुलनेने सोपी जातात. दादरा आणि केरवा या तालांच्या पलीकडे त्यांची लय जात नाही. लोकगीत हा सामुदायिक जीवनाला उठाव देणारा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे.लोकगीते गाताना होणारा शब्दांचा उच्चार हा विशिष्ट ह्रस्व-दीर्घ पद्धतीने होणारा असल्याने ती ऐकताना मनाला विशेष आनंद होतो. महाराष्ट्रातील लोकसंगीत - डॉ. विजयालक्ष्मी बर्जे

मानवी हक्क

मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात. यातनांपासून मुक्तता Freedom from torture वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य Freedom of thought, conscience and religion जीवनाधिकार Right to life गुलामगिरीपासून मुक्तता Freedom from slavery कोर्ट सुनावणीचा अधिकार Right to a fair trial भाषण स्वातंत्र्य Freedom of speech संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबज ...

यजुर्वेद

यजुर्वेद या शब्दाचा अर्थ असा होतो. हा हिंदुंच्या चार वेदांपैकी दुसरा वेद आहे. वेदांची रचना ख्रिस्तपूर्व ६००० पूर्वीच्या काळात झाली, असा एक मतप्रवाह आहे.या विषयी विविध अभ्यासकात मतमतांतरे प्रचलित आहेत. यजुर्वेद संहितेत वैदिक काळातील यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्रांचा समावेश आहे. त्यांच्या प्रस्तुतीकरण व वापराच्या पद्धतीत ब्राह्मणग्रंथ व श्रौतसूत्रे यांनी मोलाची भर घातली. यज्ञसंस्थेचा तपशीलवार विचार या संहितेने मांडला आहे.धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद मानला जातो.हा यजुर्वेद ब्रह्मदेवाने लिहीला आहे.ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.

राष्ट्र

राष्ट्र ह्या शब्दाचा ढोबळ अर्थ एका भूभागावर राहणाऱ्या व संयुक्त सरकार असणाऱ्या व्यक्तींचा मोठा समूह असा होतो.राष्ट्र या शब्दाला इंग्रजी भाषेत "नेशन" म्हणतात. नेशन या या शब्दाचे मूळ लॅटिन मधील "nasci" या शब्दात आहे. nasci चा अर्थ जन्माला येणे असा आहे.म्हणूनच असे मानले जाते की एखाद्या राष्ट्राच्या लोकांमध्ये वांशिक आणि सांस्कृतिक संबंध असतात. एका राष्ट्रातील लोक साधारणपणे समान वंशाचे, वर्णाचे असतात व एकच भाषा बोलतात. बरेचदा राष्ट्र हा शब्द देश ह्याच अर्थाने वापरला जातो. भारतीय संस्कृतीमधील विविधतेचे वर्णन राष्ट्र हा शब्द वापरून करणे शक्य आहे. उदा: तमिळ राष्ट्र, मराठी राष्ट्र इत्यादी.

वेसक

वेसक एक उत्सव आहे जो जगभरातील बौद्धांद्वारे व काही हिंदुद्वारे साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रात सुट्टी असते. हा उत्सव बुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो, ज्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म आणि निर्वाण झाले होते तसेच या दिवशी त्यांना बोधी प्राप्त झाली होती. विविध देशांच्या पंचांगानुसार बुद्ध जयंती वेगवेगळ्या दिवशी असते. भारतात इ.स. २०१८ मध्ये ३० एप्रिलला बुद्ध जयंती होती. विविध देशांत या सणाचे वेगवेगळे नाव आहे. उदाहरण म्हणून, हाँगकाँगमध्ये याला बुद्ध जन्मदिन म्हटले जाते, इंडोनेशियामध्ये वैसक दिन म्हटले जाते, सिंगापुरमध्ये वेसक दिवस आणि थायलंडमध्ये वैशाख बुद्ध दिन म्हट ...

सांस्कृतिक सभ्यता

सभ्यता म्हणजे शहरी विकास, सांस्कृतिक अभिमानाद्वारे लावलेले सामाजिक स्तरीकरण, संवादाचे सिग्नल तंत्र आणि नैसर्गिक पर्यावरणातून वेगळे व वर्चस्व असणे यासर्वान्वरुन बनलेला एक जटिल समाज. सभ्यता बर्याच गोष्टीन्शी संबधीत आहे, उदा सामाजिक-राजकीय-आर्थिक वैशिष्ट्ये द्वारे परिभाषित, केंद्रियकरण, मानव आणि इतर पाळीव प्राणी, श्रमांचे विशेषीकरण, प्रगती आणि श्रेष्ठता सांस्कृतिकदृष्ट्या व्यस्त विचारधारा, स्मारक वास्तुकला, कराधान, शेती. ऐतिहासिकदृष्ट्या, सांस्कृतीक सभ्यता ही तुलनात्मकरित्या मोठी आणि अधिक प्रगत संस्कृती समजली जाते, लहान सांस्कृतीक सभ्यतेच्या तुलनेत.

होळी

ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", फाग, फागुन "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव",आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे.यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते.

                                     

पुष्करणी

विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर. जुन्या काळी अशा विहिरी बांधण्याची पद्धत होती.राजस्थानमधील पुष्कर या गावी अश्या प्रकारची पहिली विहीर बांधली गेली, म्हणून हे नांव पडले.