ⓘ युद्ध - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध, व्हियेतनाम युद्ध, दुसरे इंग्रज-मराठा युद्ध, महाभारतीय युद्ध, कारगिल युद्ध, क्राइमियन युद्ध, भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध ..

भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध

डिसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत पाक युद्ध भारत व पाकिस्तानमधील तिसरे युद्ध होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांगलादेशची निर्मिती केली.युध्दाची सुरुवात पाकिस्तानी आक्रमणाने झाली.

व्हियेतनाम युद्ध

व्हियेतनाम युद्ध हे शीत युद्धकालातील व्हियेतनाम, लाओस आणि कंबोडियामध्ये लढले गेलेले युद्ध होते. ह्या युद्धाचा कालावधी साधारणतः नोव्हेंबर १, इ.स. १९५५ ते एप्रिल ३०, इ.स. १९७५पर्यंत मानण्यात येतो. हे युद्ध उत्तर व्हियेतनाम व त्याचे कम्युनिस्ट सहकारी विरुद्ध दक्षिण व्हियेतनाम, अमेरिका व त्यांचे कम्युनिस्ट-विरोधी सहकारी असे लढले गेले. आग्नेय आशियामधील वाढत्या कम्युनिस्ट शक्तीला रोखणे हा अमेरिकेचा ह्या युद्धात पडण्याचा हेतू होता. व्हियेत काँग ह्या दक्षिण व्हियेतनाममधील परंतु उत्तर व्हियेतनामच्या बाजूने लढणाऱ्या पक्षाने कम्युनिस्टविरोधी सेनेविरुद्ध शिवरायांच्या गनिमी काव्याचा वापर केला. जवळजवळ २ ...

दुसरे इंग्रज-मराठा युद्ध

दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरुन आता इंदूर व ग्वाल्हेर येथे गेले. महादजी शिंद्याच्या निधना नंतर मराठ्याच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येउ लागले. पेशवे व शिंदेना होळकरांनी ऑक्टोबर २५ १८०२ रोजी पुण्याच्या जवळ पराभूत केले. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व दुसरा बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली जी वसईचा तह या नावाने ओळखली जाते. या तहानुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्ता स्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य क ...

महाभारतीय युद्ध

महाभारत युद्ध हे कौरव आणि पांडव या दोन सैन्यात लढले गेले. हे युद्ध १३ ऑक्टोबर इ.स.पू. ३१३९ या दिवशी सुरू झाले, असे दिल्लीच्या इन्स्टिटूट ऑफ सायंटिफिक रिसर्चमधील संशोधकांचे म्हणणे आहे.

कारगिल युद्ध

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यासन १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत-पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले.सन १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीम ...

क्राइमियन युद्ध

क्राइमियन युद्ध हे फ्रेंच साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य व सार्दिनियाचे राजतंत्र ह्यांच्या युतीने रशियन साम्राज्याविरुद्ध लढलेले १९व्या शतकामधील एक युद्ध होते. सध्या युक्रेनच्या अंमलाखाली असलेल्या क्राइमिया ह्या द्वीपकल्पावर प्रामुख्याने घडले गेलेले हे युद्ध ढासळत्या ओस्मानी साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक भूभागांवर सत्ता प्रस्थापित करण्याच्या अनेक प्रयत्नांपैकी एक होते. हे युद्ध रेल्वे, टेलिग्राफ इत्यादी अनेक आधुनिक तंत्रांच्या वापरासाठी तसेच फ्लॉरेन्स नाइटिंगेल ह्या ब्रिटिश नर्सने केलेल्या कामासाठी स्मरणीय ठरले. पूर्व युरोपात सुमारे तीन वर्षे चाललेल्या ह्या युद ...

भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध

इ.स. १९६०चे दशक जागतिक राजकीय पटलावर एक वेगळेच समीकरण मांडत होते. शीतयुद्धाला रंग चढत होता. NATO च्या छत्राखाली अमेरिका समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे रशियाचे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरू होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्‍न केला. भारताने ती विनंती फेटाळून लावल्यावर राजकीय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. १९४७ नंतर नेहरूंच्या नेतृत्वाखालील सरकारची दिशा समाजवादी राज्यव्यवस्थेकडे झुकताना दिसू लागली. ही व्यवस्था ही भ ...

भारत-चीन युद्ध

भारत-चीन युद्ध हे इ.स. १९६२ साली भारत व चीन या देशांदरम्यान झालेले युद्ध होते. यात चीनने भारताचा मोठा प्रदेश गिळंकृत केला व नंतर त्यातील काही भागातून माघार घेतली.

कलिंगचे युद्ध

कलिंगचे युद्ध सम्राट अशोकांनी इ.स.पू. २६१ मध्ये केलेले एक प्रमुख युद्ध होते. कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. सुरूवातीला अशोक हे युद्धखोर झाले होते. सर्वत्र त्यांची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती. अखंड भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगड व झारखंड मधील काही भाग येतात.

गनिमी कावा

गनिमी कावा अथवा इंग्रजीत गुरिला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे. शहाजीराजांनी निजामशाहीच्या अखेरच्या दिवसात ह्या पद्धतीचा वापर केला. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे ...

चक्रव्यूह (युद्धशास्त्र)

चक्रव्यूह किंवा पदमव्यूह ही एक युद्धातील बचावात्मक बहुपन्क्ति सुरक्षा रचना आहे जी वरुन पाहिल्यास एका फुलत्या कमळासारखी किंवा चक्रा सारखी दिसते. सर्व पन्क्तितले योद्धे हे युद्धासाठी अत्यंत आक्रमक स्थितीत असत. ही रचना द्रोणाचार्यांनी युद्धामध्ये वापरली होती जे भीष्म पितामह यांना दुखापत झाल्यानंतर सेनापती झाले होते. असे बरेचसे व्यूह हे कौरवांसोबत पांडवांनी देखील आत्मसात करून घेतले होते. त्यातले बरेचसे व्यूहरचने विरुद्ध प्रतिकारात्मक उपाय करून लक्ष्याला हरवू शकत होते. महाभारतामध्ये वर्णन केलेल्या युद्धाच्या रूपात निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे देखील खूप महत्त्वाचे होते की शक्तिशाली सै ...

नागरी युद्ध

नागरी युद्ध म्हणजे सिव्हिल वाॅर. नागरी युद्धात एकाच देशातल्या संघटित गटांमध्ये युद्ध होते. उदा० संयुक्त राष्ट्रामधल्या एका देशाचे विभाजन झाल्यावर निर्माण झालेल्या दोन नवीन देशामधले युद्ध. युद्धामधल्या एका पक्षाला मूळ देशावर किंवा देशाच्या काही भागावर नियंत्रण मिळवायचे असते, मूळ देशापासून स्वतंत्र व्हायचे असते किंवा देशाचे धोरण बदलवायचे असते. लॅटिनमध्ये पहिल्या शतकातल्या रोमन कॅथॉलिक गणराज्यात झालेल्या नागरी युद्धाला बेल्लम सिव्हिल असे संबोधिले गेले. असे. त्यावरूनच नागरी युद्ध ह्या संज्ञेची निर्मिती झाली. नागरी युद्ध मोठे व तीव्र संघर्षाचे असू शकते. ते संघटित असते व दीर्घकाळ चालू शकते. त्या ...

पायदळ सैनिक

पायी चालून शत्रूशी लढाई करणाऱ्या सैन्यदलांस पायदळ म्हणतात. हा सर्वात जुना सैन्यदल प्रकार आहे. युद्धात संख्येने सर्वात जास्ती असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत पारंगत असते. प्राचीन तसेच आधुनीक काळांतही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते. इतर दळांच्या मानाने युद्धात पायदळाची हानी जास्ती होते. सैन्यातील इतर दळांच्या मानाने पायदळाचे प्रशिक्षण खडतर असते व त्यांत शिस्त, आक्रमकता आणि शारीरिक क्षमतेवर जास्ती भर दिला जातो. दुसऱ्या महायुद्धापासून तंत्रज्ञान प्रगत होत गेल्याने सैन्यातील मुख्यतः पश्चिमात्य देशांतील पायदळाचा आकार कमी होत गेलेला आढळतो. उदा. अमेरिकन सैन्यात पायदळाची संख्या केवळ ४९,००० आहे. एकू ...

                                     

मेक्सिकन-अमेरिकन युद्ध

मेक्सिकन-अमेरिकन युद्ध हे मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये १८४६-१८४८मध्ये लढले गेलेले युद्ध होते. यात मेक्सिकोचा सपशेल पराभव झाला व त्याचा अर्धा भाग अमेरिकेने हस्तगत केला. याचबरोबर मेक्सिकोने आपल्यापासून विभक्त झालेल्या टेक्सासच्या प्रजासत्ताकाला अधिकृत मान्यता दिली.

                                     

कळरीपयट्ट

कळरीपयट्ट ही एक युद्धकला आहे. या युद्धपद्धतीचा उगम केरळ मध्ये झाला. यात तलवारीचा वापर प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी चपळाईने केला जातो.

                                     

घोडदळ

घोड्यावर स्वार होवून युद्धात भाग घेणार्‍या सैन्यदलास घोडदळ म्हणतात. घोडेस्वारांस अधिक शस्त्रास्त्रे व चिलखते वाहून नेणे तसेच वेगांत कूच करणे सोपे असल्यामूळे पायदळापेक्षा घोडदळाची कार्यक्षमता जास्त असते.

                                     

मर्यादित युद्ध

मर्यादित भागातच लढले जाणाऱ्या युद्धाला मर्यादित युद्ध असे म्हणतात. सहसा दोन पक्ष एकमेकांवर शक्य तेथे हल्ले करतात परंतु राजकीय, भौगोलिक किंवा नैतिक कारणांमुळे हे मर्यादित राहू शकते. भारत व पाकिस्तानातले कारगिल युद्ध याचे उदाहरण आहे.

                                     

लढाऊ हत्ती

लढाऊ हत्ती हा एक माणसांनी प्रशिक्षित व नियंत्रित केलेला युद्धात वापरला जाणारा हत्ती असे. यांचा मुख्य उपयोग शत्रूसैन्यावर चाल करून जाउन त्यांची फळी फोडणे व त्यांच्यांत घबराट पसरवून देण्याचा असे.

                                     

हवाई सुरक्षा यंत्रणा

शत्रूच्या हवाई मार्गाने केलेल्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून बचाव करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या यंत्रणेस अथवा व्यवस्थेस हवाई सुरक्षा यंत्रणा म्हणतात. या यंत्रणेचे कार्य, शत्रू हल्ल्यादरम्यान त्यांची बॉम्बफेकी विमाने, रडारपासून छुपी लढाऊ विमाने, सर्व प्रकारची क्षेपणास्त्रे आदींना शोधणे,त्याचा मागोवा घेणे व पर्यायांचा वापर करून त्यांना लक्षावर पोचण्याआधी नष्ट करणे अशा प्रकारचे असते.अत्याधुनिक लढाईत या यंत्रणेचे स्थान बरेच महत्त्वाचे असते.