ⓘ समाजशास्त्र - समाजशास्त्र, मराठी समाजशास्त्र परिषद, तत्त्वज्ञानाचे समाजशास्त्र, आणि ऑगस्ट कॉम्त, कास्ट्स इन इंडिया, सदानंद भटकळ, बॅचलर ऑफ आर्ट्स, अरनादन जमात ..

समाजशास्त्र

समाजशास्त्र म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो. यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रणाचे रुप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते. व्यवस्थाबद्द ज्ञान सम्मुचयास ...

मराठी समाजशास्त्र परिषद

मराठी समाजशास्त्र परिषदेचे २३वे राज्यस्तरीय अधिवेशन १८-१९ जानेवारी २०१३ला कोल्हापूर येथे होणार आहे. उद्‌घाटक कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार असतील. बीजभाषण नेहरू विद्यापीठातील अभ्यासक डॉ नंदू राम करतील. अधिवेशनाचे विषय: सीमांतिक उपेक्षत समूह, अन्य विषय - शिक्षणाचे बाजारीकरण, कृषि धोरण, प्रसारमाध्यमे आदींचा उपेक्षित समूहांवर होणारे परिणाम.

तत्त्वज्ञानाचे समाजशास्त्र

तत्त्वज्ञानाचे समाजशास्त्र ही समाजशास्त्राची उपशाखा आहे, ही तत्त्वज्ञानाची शाखा नाही. तत्त्वज्ञानाचे समाजशास्त्र ही तुलनेने नवी संज्ञा आहे.ज्ञानाचे समाजशास्त्र आणि विज्ञानाचे समाजशास्त्र या संज्ञांच्या धर्तीवर ही नवी संज्ञा तयार करण्यात आली आहे. कोणत्या सामाजिक परिस्थितीत तात्त्विक विचार निर्माण होतात, त्या परिस्थितींचा अभ्यास या शाखेत केला जातो. हेतू तत्त्वज्ञानाचा समाजातील प्रभाव समजून घेणे हा या विद्याशाखेचा मुख्य हेतू आहे. तत्त्वज्ञानाच्या समाजावर वेगवेगळा परिणाम होत असतो. त्या परिणामांमध्ये आणि त्या काळातील वेगवेगळ्या बौद्धिक कृतींमध्ये गुंतलेल्या सामाजिक परिस्थिती समजावून घेणे; समाजा ...

समाजशास्त्र आणि ऑगस्ट कॉम्त

व्यक्तीच्या परस्पर सहचार्यातून सामाजिक संबंध निर्माण होतात. व या सामाजिक संबंधाचा वैज्ञानिक पध्दतीने आभ्यास केला पाहिजे.असे काही विचारवंतांना वाटू लागले व त्यांनी या सामाजिक संबंधाचा शास्त्रीय पद्धतीने आभ्यास करावयास सुरुवात केली व त्यामुळे प्रामुख्याने ऑगस्ट कॉम्त ने भौतिक शास्त्रात उपयोगात आणलेल्या पद्धतीचा वापर समाजशास्त्रत केला व समाजात सुद्धा नौसर्गिक शास्त्राप्रमाणेच शास्त्र आहे असे स्पष्ट केले. समाजशास्त्र मध्ये सामाजिक संबंधाचा आभ्यास केला जातो व हा आभ्यास करत असताना निरीक्षण, वर्गीकरण, गृहीत कृत्य, पूर्वकथान व निष्कर्ष इत्यादी मार्गाचा अवलंब समाजशास्त्रामध्ये करता येणे शक्य अाहे.अ ...

कास्ट्स इन इंडिया

कास्ट्स इन् इंडिया: देअर मेकनिझम, जेनसिस ॲन्ड डिव्हेलपमण्ट हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेला एक समाजशास्त्रीय लेख आहे, जो त्यांनी मे, इ.स. १९१६ मध्ये कोलंबिया विद्यापीठातील एका सेमिनारमध्ये वाचला होता. या लेखामुळे जगाला बाबासाहेबांच्या रूपात एक २५ वर्षीय तरूण भारतीय समाजशास्त्र जगाला गवला तसेच भारतातील जातीव्यवस्थेतीची किड संपूर्ण जगापुढे उघड झाली. नंतर हा इ.स. १९१७ मध्ये पुस्तक रूपात प्रकाशित झाला. याच्या अंतर्गत भारतात जातींची उत्पत्ती, गठन व विकास यावर प्रकाश टाकला गेला आहे. डॉ. आंबेडकरांच्या नजरेत, जाती एक असा परिबद्ध वर्ग आहे, जो स्वतः पुरताच मर्यादित राहतो. त्यांच्या अनुसार जाती स ...

सदानंद भटकळ

सदानंद भटकळ हे एक सामाजिक कार्यकर्ते होते. यांनी सुरू केलेल्या पॉप्युलर प्रकाशन या संस्थेच्या व्यवसायात उतरल्यावर सलग ६३ वर्षे त्यांनी या प्रकाशन संस्थेला आपल्या अथक प्रयत्नाने लौकिक मिळवून दिला. "पॉप्युलरच्या पुस्तकांचा जागतिक मान्यता होती. ग्रंथ प्रकाशनाच्या व्यवसायात असताना, त्यांचे सामाजिक कार्य सुरू होते. मुंबईच्या एल्‌फिन्स्टन महाविद्यालयातून समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयाची एम.ए. पदवी घेतल्यावर, ते एलएलबी झाले. स्वातंत्र्याच्या चळवळीत ते सहभागी झाले होते. स्वातंत्र्यानंतर, भारतीय युवकांसमोरच्या समस्यांचा वेध घ्यायसाठी त्यांनी "द फ्यूचर ऑफ इंडियन यूथ, हा ग्रंथ लिहिला होता. उत्तम म ...

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील नांदेड येथे स्थित असून त्याची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली. हे विद्यापीठ साधारणपणे स्वारातीम SRTM या संक्षिप्त नावाने ओळखले जाते. विद्यापीठाचे जुने नाव नांदेड विद्यापीठ असे होते. या विद्यापीठाचे नाव मराठवाडा मुक्ती संग्रामाचे जनक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे. हैद्राबाद मुक्तिसंग्राम स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे. या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हा हे दक्षिण मराठवाड्यातील ४ जिल्हे येतात. नांदेड ...

बॅचलर ऑफ आर्ट्स

बॅचलर ऑफ आर्ट्स तथा बी.ए. ही विद्यापीठीय अभ्यासक्रमात कला शाखेतील पदवी आहे. अनेक देशांतील शिक्षणप्रणालींमध्ये ही पदवी दिली जाते. सहसा ही पदवी भाषा, साहित्य, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, तत्वज्ञान अशा विषयांत उच्चशिक्षण घेतल्यावर मिळते. राज्यशास्त्र, समाजशास्त्र यांंसारख्या विषयांंचाही यात अंंतर्भाव होतो. भारतात या पदवीच्या अभ्यासक्रमासाठी १२वी इयत्ता किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यानंतर सहसा तीन वर्षे अभ्यास केल्यावर बी.ए.ची पदवी मिळते. काही देशांतून ही पदवी मिळविण्यासाठी चार वर्षांचा अभ्यासक्रम असतो.

अरनादन जमात

ही भारताच्या केरळ, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांमधील अत्यंत गौण समजली जाणारी वन्य जमात आहे. अरनादन स्वतःस एरनाड तालुक्यातील मूळ रहिवासी समजतात म्हणून त्यांना एरनादन असेही म्हणतात. त्यांची संख्या १९४१ साली ४८९ होती. हे मुळचे कंदमुळे वगैरे खाणारे व शिकारी लोक होते, परंतु आता ते शेतमजुरी करू लागले आहेत. कुरळे केस, रुंद व बसके नाक, त्या भागातील इतर जमातींच्या लोकांच्या मानाने लांब हात, ही त्यांची शरीरवैशिष्ट्ये निग्रोवंशीयांशी मिळतीजुळती आहेत. त्यांची बोली तमिळ, मलयाळम् व तुळू या भाषांच्या मिश्रणातून बनलेली आहे. अरनादन बांबूच्या झोपडीत राहतात. बांबूच्या चटया तसेच गाडगी, मडकी व पारधीची आयुधे आण ...

अस्पृश्य

व्यापक माहितीसाठी अस्पृश्यता पहा अस्पृश्य म्हणजे असे लोक की ज्यांच्या स्पर्शाने किंवा त्यांच्या सावलीने मनुष्य अपवित्र होतो किंवा बाटतो अशी अशास्त्रीय धारणा होय. हिंदू धर्मातील चार वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अस्पृश्य हे वर्णव्यवस्थेच्या बाहेर आहेत. त्यांना अवर्ण असेही संबोधले जाते. २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे संविधान लागू झाले आणी अस्पृश्यता कायद्याद्वारे नष्ठ करण्यात आली. वर्णभेद हा भारतामध्येच नव्हे तर पश्चिमात्य राष्ट्रांमध्ये होता. परंतु अस्पृश्यता ही अत्यंत भयानक गुलामगिरीची प्रथा भारतात होती.

आर्थिक विकास (समाजसेवक आणि राजकारणी लोकांचा)

समाजकारण आणि राजकारण करणाऱ्या आणि त्यांच्या नातलगांचा बऱ्याच वेळा चांगला आर्थिक विकास होतो. जो पर्यंत लाभ आणि प्रतिलाभ सिद्ध होत नाही तो पर्यंत ते त्यांच्या उद्योजकता क्षमतेचे आदर्श उदाहरण असते.आजकाल निवडणूक आयोगाकडे काही राजकारणी काही प्रमाणात संपत्ती जाहीर करतात दर निवडणूकी दरम्यान होणारा त्यांच्या आर्थिक स्थितितील बदल मतदारांपुढे राहून मतदारांनी त्याचा योग्य निष्कर्ष काढावा हा उद्देश असतो. आर्थिक विकासाचे विभीन्न मार्ग उपलब्ध असतात.

पुरुषत्व

पुरुषत्व किंवा मर्दानगी म्हणजे पुरुषांची ठरावीक वागणूक, भूमिका व वैशिष्टे ह्यांचा एकत्रित संच आहे. हा विचार मुळात पुरुषांशी व पुरुषी वागणुकीशी निगडित आहे. हा विचार सामाजिक आणि जैविक वस्तुस्थितीवरून निर्धारित होतो. स्त्री आणि पुरुष हे दोन्ही ह्या विचारांचे वाहक असतात किंवा असू शकतात. काही संस्कृतींमध्ये पुरुषत्व हे शौर्य, शक्ती, सामर्थ्य, इत्यादींचे प्रतीक मानले जाते. या संस्कृतीने रुबाबदार, बलदंड शरीरयष्टी असणे म्हणजे पुरुष अशी समाजात प्रतिमा निर्माण केली आहे. शैक्षनिक क्षेत्रात, पुरुषत्व ही एक आंतरविद्याशाखीय संज्ञा असून त्यात पुरुष, पुरुषत्व, स्त्रीवाद, लिंगभाव, व राजकारण ह्यांचा समावेश ...

भाषाशास्त्र

खालील भाषांतरात स्वनविज्ञान आणि ध्वनिकी या दोन शब्दांची गल्लत झाली आहे. भाषाशास्त्र हे वैज्ञानिक पद्धतीने नैसर्गिक भाषाांचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे. भाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ. खुणांची व चिन्हांशी भाषा. भाषेच्या अभ्यासात यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त असते.

मराठा आरक्षण

मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांत १६%आरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्रात मराठा समाजातर्फे केली जात होती. तसेच मराठा सेवा संघ आणि त्याच्या इतर सहयोगी संस्था त्यासाठी आंदोलने केलीत. मराठा सेवा संघाची युवा आघाडी संभाजी ब्रिगेड या मुद्यावर विशेष आक्रमक होते. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज सातारा गादीचे छत्रपती उदयनराजे भोसले व कोल्हापूर/करवीर गादीचे युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला होता. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागात परिषदा घेतल्या गेल्या. संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत २८ ऑक्टोबर रोजी नांदेड येथे डॉ. शंकरराव चव्हाण सभ ...

संततिनियमन

भारतीय लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्या स्फोट, वाढती महागाई आणि अपुरी साधनसंपत्ती यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हळू हळू नाहिशी होत आहे. लहान कुटुंबामध्ये एक किंवा दोन मुलांचा सांभाळ दांपत्य करू शकते. संततिनियमन केल्याने दोन अपत्यामध्ये पुरेसे अंतर ठवणे आणि आर्थिक स्तिति सुधारली म्हणजे इच्छित वेळी मूल होऊ देण्याकडे विवाहित जोडप्यांचा कल वाढतो आहे.

सामाजिक न्याय

सामाजिक न्याय म्हणजे शोषणविरहीत, समताधिष्ठित, न्याय्य समाजाची निर्मिती होय. एक समाजवादी राष्ट्र या भूमिकेतून सामाजिक न्याय ही संकल्पना समताधिष्ठित समाजनिर्मितीकडे जाणारी आहे. सामाजिक न्याय या विस्तृत संकल्पनेमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो. त्यामध्ये दलितांचे प्रश्न - प्रतिनिधित्व, आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी, विषम वागणूक इत्यादी. आदिवासींचे प्रश्न - जंगल आणि जमिनीवरचा हक्क, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याविषयीच्या समस्या इत्यादी. स्त्रियांचे प्रश्न उदा. प्रतिनिधित्व, अन्यायी वागणूक, कौटुंबिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, बलात्कार, कामाच्या ठिकाणचे लैंगिक शोषण, स्त्रीभ्रुण हत्या, हुंडाबळी, ऑन ...

सामाजिक समूह

सामाजिक समूह हि संकल्पना पाहण्यापूर्वी समूह या संकल्पनेचा अर्थ जाणून घेणे आवष्यक आहे. समूह म्हणजे एकमेकांच्या सान्निध्यात असणे एकमेकांच्या निकट असणे. उदा. कपाटामध्ये लावून ठेवलेली पुस्तके, बांधकामासाठी रचून ठेवलेल्या विटा, हरणाचे कळप इ. हे सर्व समूह आहेत. हे घटक परस्परांच्या सान्निध्यात जरी असले तरी त्यांच्यात संबंध प्रस्थापित होत नाहीत. त्यांना परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव नसते. एका बसमध्ये बसलेले सर्व प्रवासी देखील एका प्रकारचा समूह आहे. परंतु जेव्हा त्यांना परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा सामाजिक समूह अस्तित्वात येतो. इतर प्राण्यांच्या व वस्तूंच्या तुलनेत मानवी समूह अत्यंत ...

स्व-संघटन

स्व-संघटन म्हणजे अशी प्रक्रिया, ज्यामध्यॆ ज्यामुळॆ एखाद्या प्रणालीतील वैश्विक पातळीवरील समन्वय आणि शिस्त, सुरूवातीला अराजक असलॆल्या प्रणालीच्या उपघटकांमधील स्थानिक अंतःक्रियेतून निर्माण होते. सामान्यतः ही प्रक्रिया स्वयंभू असते आणि अशा प्रकारचा प्रक्रयेत समन्वय किंवा शिस्त निर्माण करण्यासाठी कुठल्याही बाह्य व्यक्ती किंवा यंत्रणेच्या हस्तक्षेपाची गरज नसतॆ. काही अत्यंत प्राथमिक स्वरुपाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून प्रणालीचे उपघटकच अशी शिस्त निर्माण करतात. यातून निर्माण हॊणारी यंत्रणा ही पूर्णपणे विकेंद्रित असते. सामान्यतः ही व्यवस्था अतिशय चिवट असते आणि दीर्घकाळ टिकणारी व ऋणात्मक पुनर्भ ...

                                     

भाषाशास्त्रीय मानवशास्त्र

भाषाशास्त्रीय मानवशास्त्र हा भाषा आणि संस्कृती आणि मानवी जीवशास्त्र, माहिती आणि भाषा दरम्यान संबंध यांचा अभ्यास होय. मनुष्याची उत्पत्ति व विकास यांचें भाषाशास्त्रीय दृष्टया विवरण करणार्‍या शास्त्राला भाषाशास्त्रीय मानवशास्त्र असें म्हणतात. ही मानवशास्त्र विषयाचीच एक उपशाखा आहे. पारंपारिक भाषिक मानवजातीचा अभ्यास करणारे हे शास्त्र समाजशास्त्र व त्या अनुषंगाने लोक जीवनाचा अभ्यास करते. या अभ्यासांच्या निष्कर्षाने समाजशास्त्र विषयात अनेक बदल घडून आले आहेत.

                                     

दिलीप खैरनार

प्रगत सामाजिक संशोधन पद्धती व सांख्यिकी शैक्षणिक रामजन्मभूमी - बाबरी मशीद प्रश्न वैचारिक समाजशास्त्रीय मूलभूत संकल्पना शैक्षणिक समाजशास्त्र परिचय शैक्षणिक, सहलेखक पी. के. कुलकर्णी भारतीय समाजातील नैतिक मूल्ये सामाजिक वृद्धांच्या समस्या चिंता आणि चिंतन मार्गदर्शनपर भारतीय ग्रामीण समाजशास्त्र शैक्षणिक

                                     

सामाजिक शास्त्र

मानवी वर्तन व समाज यांसंबंधीच्या शास्त्रांना सामाजिक शास्त्र किंवा सामाजिक विज्ञान असे म्हणतात. सामाजिक शास्त्रे ही व्यापक संकल्पना असून् नैसर्गिक शास्त्र नसणाऱ्या सर्व शास्त्रांचा यात सामावेश होतो. उदा. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरीकशास्त्र, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, पुरातत्वशास्त्र, शिक्षणशास्त्र इत्यादि.

                                     

आधुनिकीकरण.

आधुनिकीकरण आधुनिकीकरण म्हणजे अर्थ व्यवस्थेतील विविध प्रकारच्या संस्थात्मक व रचनात्मक बदलांची प्रक्रिया होय. संस्थात्मक बदल हे आधुनिकीकरणाचा पाया ठरतात. आधुनिकीकरणात नवीन बदले, उत्पादन तंत्र व पद्धती यांना महत्त्व प्राप्त होते. आधुनिकीकरणात आधुनिकचा दुसऱ्या बाजूने विचार करताना शेती क्षेत्रावरील अवलंबित्व कमी करून औदोयागिकरणाला प्राधान्य देणे म्हणजे आधुनिकीकरण होय. भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रतील आधुनिकीकरणाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते.

                                     

एकत्र कुटुंब पद्धती

एकत्र कुटुंब पद्धती मध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील अनेक भावंडे एकाच घरात राहतात. भारतात ग्रामीण भागात ही पद्धत प्रचलित असली तरी नागरी भागातून ही पद्धत आता हळूहळू नाहीशी होत आहे.

                                     

ऑगस्ट कॉम्ट

"ऑगस्ट कॉम्ट" हे समाजशास्त्राचे जनक होत. १८३८ मध्ये पोझिटिव्ह फिलॉसॉफि या ग्रंथाच्या चौथ्या खंडात sociology असा उल्लेख केला.

                                     

मार्क्सचा परकीयीकरणाचा सिद्धान्त

कार्ल मार्क्सच्या परकीयीकरणाच्या सिद्धान्तानुसार लोकांचे त्यांच्या मानवी स्वभावाच्या पैलूंपासून होणारे सामाजिक परकीयीकरण हे सामाजिक वर्गांमध्ये विभागलेल्या समाजात जीवन जगण्याचा परिणाम आहे.

                                     

वर्णद्वेष

वर्णद्वेष ही समाजातील ठरावीक लोकांविरुद्ध भेदभाव करण्याची एक पद्धत आहे. वर्णद्वेषी विचारपद्धतीनुसार समाजामधील लोकांचे जात, वर्ण इत्यादी बाबींवरून वेगळे गट पाडले जातात. एक गटाला समाजात उच्च स्थान तर दुसर्‍या गटाला दुय्यम स्थान देण्यात येते. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद हे वर्णद्वेषाचे राजकीय स्तरावरील वापराचे उदाहरण आहे. नाझी जर्मनीद्वारे घडवण्यात आलेले होलोकॉस्ट देखील वर्णद्वेषाचेच उदाहरण आहे.