ⓘ भूगोल - भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, मानवी भूगोल, उत्पादन भूगोल, भारताचा भूगोल, जर्मनीचा भूगोल, राजकीय भूगोल, प्रादेशिक भूगोल, प्राकृतिक भूगोल, राज्य, अक्षांश ..

भूगोल

भूगोलाला इंग्रजीमध्ये Geography हा शब्द आहे. या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील शब्द - Geo आणि Graphiya या शब्दापासून झालेली आहे. या दोघांचा अर्थ Earth किंवा पृथ्वी असा होतो. graphein या शब्दाचा वर्णन करणे किंवा लिहिणे होतो. यो दोन शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो. भूगोलशास्त्रज्ञ चार पारंपरिक विचारांतून भूगोलाच्या अध्ययनावर भर देतात. ...

महाराष्ट्राचा भूगोल

१. प्राणहिता नदी प्रणाली २. गोदावरी नदी प्रणाली ३. कृष्णा नदी प्रणाली ४. भीमा नदी प्रणाली

मानवी भूगोल

सांस्कृतिक भूगोल हा सांस्कृतिक उत्पादने आणि मानदंडांचा अभ्यास आहे - त्यांचे स्थान आणि ठिकाणे यांच्यातील फरक, तसेच त्यांचे संबंध. हे मार्ग, भाषा, धर्म, अर्थव्यवस्था, सरकार आणि अन्य सांस्कृतिक घटनांचे वर्णन आणि विश्लेषणावर लक्ष केंद्रित करते आणि एका स्थानापर्यंत दुसऱ्यापासून वेगळे किंवा सतत राहते मानवी भौगोलिक भूगोलची शाखा म्हणजे लोक आणि त्यांचे समुदाय, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी संवाद साधून त्यांच्याशी आणि त्यांची जागा आणि स्थानासह त्यांचे अभ्यास करून त्यांचा अभ्यास करणारी भौगोलिक माहिती.मानव भूगोल सामाजिक परस्पर संबंधांच्या नमुन्यांची तसेच स्थानिक पातळीवर परस्पर निर्भरता आणि पृ ...

उत्पादन भूगोल

आर्थिक भूगोल हा संपूर्ण जगभरातील आर्थिक हालचालींच्या स्थान, वितरण आणि स्थानिक संघटनेचा अभ्यास आहे. हे भूगोलमधील शिस्त पारंपारिक उपक्षेत्र दर्शवते तथापि, अनेक अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राच्या शिस्त अधिक नमुनेदार पद्धतीने क्षेत्राशी संपर्क साधला आहे. आर्थिक भूगोलने उद्योगांचे स्थान, संवर्धनाच्या अर्थव्यवस्थेसह ज्याला "दुवा साधणे" देखील म्हटले जाते, परिवहन, आंतरराष्ट्रीय व्यापार, विकास, स्थावर मालमत्ता, सभ्यता, जातीय अर्थव्यवस्था, लिंगदशाच्या अर्थव्यवस्थांचा समावेश असलेल्या विविध विषयांच्या विविध पध्दतींचा विविध प्रकारे विचार केला आहे. कोर-परिधि सिद्धांत, शहरी स्वरूपाचे अर्थशास्त्र, पर्याव ...

भारताचा भूगोल

भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत, वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे. भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतातील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या ...

जर्मनीचा भूगोल

जर्मनी हा पश्चिम-मध्य युरोपामधील एक देश आहे. जर्मनीच्या दक्षिणेस आल्प्स पर्वत तर उत्तरेस उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र आहेत. जर्मनीचे एकूण क्षेत्रफळ ३,५७,०२१ चौ. किमी इतके असून त्यापैकी ३,४९,२२३ चौ. किमी इतकी जमीन तर ७,७९८ चौ. किमी इतके पाणी आहे. झुगपिट्स हे आल्प्समधील २,९६२ मी उंचीचे शिखर जर्मनीमधील सर्वात उंच स्थान आहे. डॅन्युब, ऱ्हाईन व एल्ब ह्या जर्मनीमधील प्रमुख नद्या आहेत. जर्मनीच्या उत्तरेला डेन्मार्क, पूर्वेला पोलंड व चेक प्रजासत्ताक, दक्षिणेला ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड, नैऋत्येला फ्रान्स तर पश्चिमेला बेल्जियम, लक्झेंबर्ग व नेदरलँड्स हे देश आहेत.

                                     

राजकीय भूगोल

राजकीय भूगोल ही मानवी भूगोलाची शाखा आहे. रॅट्झेल याने इ.स. १८९७ मध्ये पोलीटीश हा ग्रंथ प्रकाशित केला. पॉडस यांनी राजकीय भूगोलाची व्याप्ती विभागणी सहा गटात केली आहे. व्याख्या: १) मानवाचे वसतिस्थान असलेल्या पृथ्वीवरील इतर घटकाच्या सबधने स्थान व स्थानाच्या विविध राजकीय वेशिष्ट्याचा अभ्यास. २) राजकीय भूगोल हे राजकीय वेशिष्ट्याशी संबंधीत असलेले,त्याचप्रमाणे संघटनाच्या सरचनेचे अध्ययन करणारे शास्त्र आहे.

                                     

प्रादेशिक भूगोल

प्रादेशिक भूगोल ही सर्वसामान्य भूगोलाची एक प्रमुख शाखा आहे. या शाखेच्या अभ्यासामध्ये भूभागांवरील नद्या, पर्वत, किनारपट्ट्या, पठारे, वाळवंटे, दर्‍या, आखाते, समुद्र आदी नैसर्गिक गोष्टींचा समावेश होतो. प्रादेशिक भूगोलाला इंग्रजीत Regional Geography म्हणतात.

                                     

प्राकृतिक भूगोल

प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची शाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक वैशिष्ट्यांचे अध्ययन करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. प्राकृतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात.

                                     

राज्य

राज्य ही राजकीय प्रणाली व सरकार एकत्रित करणारी एक सुनियोजित संस्था आहे. राज्य हा शब्द एखाद्या देशामधील संघीय राजकीय विभागाला संबोधण्यासाठी देखील वापरला जातो. राज्य हे देशाचा अविभाज्य घटक आहे.

                                     

अंटार्क्टिक

अंटार्क्टिक हा पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाभोवतालचा एक भौगोलिक प्रदेश आहे. अंटार्क्टिक प्रदेशात अंटार्क्टिका हा खंड तसेच दक्षिणी महासागर ह्यांचा समावेश होतो.

                                     

अक्षांश

पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे विषुववृत्तापासून उत्तर अथवा दक्षिणेकडील अंशात्मक अंतर अक्षांश या प्रमाणाने मोजले जाते. अर्थात एखाद्या ठिकाणाचा अक्षांश हा पृथ्वीच्या मध्यापासून त्या ठिकाणापर्यंत काढलेल्या रेषेचा विषुववृत्ताच्या प्रतलाशी होणारा कोन होय. साधारणपणे हा कोन अंशांमध्ये दर्शवितात. हा कोन विषुववृत्ताशी 0° पासून उत्तर अथवा दक्षिण धृवापर्यंत 90° असा बदलतो. अक्षांश हे प्रमाण सर्वसाधारणपणे phi, ϕ {\displaystyle \phi \,\!} या ग्रीक अक्षराने दर्शविले जाते.

                                     

आर्क्टिक

आर्क्टिक हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाभोवतालचा एक भौगोलिक प्रदेश आहे. आर्क्टिक प्रदेशात आर्क्टिक महासागर तसेच कॅनडा, ग्रीनलॅंड, रशिया, आइसलॅंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, नॉर्वे, स्वीडन व फिनलंड ह्या देशांतील काही भागांचा समावेश होतो.

                                     

उत्तर गोलार्ध

विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास उत्तर गोलार्ध असे म्हणतात. पृथ्वीवरील जमीनीच्या भागापैकी बहुतकरून भाग उत्तर गोलार्धात आहे तर जगातील ९०% लोकही उत्तर गोलार्धातच राहतात.

                                     

उत्तर ध्रुव

उत्तर ध्रुव हा पृथ्वीवरील सर्वात उत्तरेकडील बिंदू आहे. उत्तर ध्रूवामध्ये पृथ्वीवरील सर्व रेखावृत्ते एकत्र येऊन मिळतात. उत्तर धृव हा दक्षिण ध्रुवाचा विरुद्ध बिंदू मानला जातो.

                                     

कर्कवृत्त

कर्कवृत्त हे पृथ्वीवरील पाच प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे. सूर्य जिथे मध्यान्ही बरोबर डोक्यावर येईल अशा ठिकाणांमधे कर्कवृत्त हे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त होय. कर्कवृत्तावर २१ जून ह्या दिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो. कर्कवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ अंशसुमारे साडेतेवीस अंश उत्तरेस आहे. विषुववृत्तापासून कर्कवृत्तासारख्याच अंतरावर असलेल्या दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध असे म्हणतात.