ⓘ अभियांत्रिकी - अभियांत्रिकी, महाविद्यालय, पुणे, स्थापत्य अभियांत्रिकी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद, रासायनिक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी ..

अभियांत्रिकी

वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक व प्रत्यक्षातील ज्ञान मिळवण्याच्या व वापरण्याच्या कौशल्यांना, व्यवसायांना आणि शास्त्रांना अभियांत्रिकी असे म्हणतात. सामान्यपणे विज्ञानाच्या प्रत्यक्षातल्या उपयोगाला अभियांत्रिकी म्हटले जाते. बांधकामे, यंत्रे, उपकरणे, पदार्थ, प्रणाली व प्रक्रिया यांचे आराखडे व निर्मिती करणे ही अभियांत्रिकीची प्रमुख कार्य आहेत. यासाठी गणिताचा आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांसारख्या विविध विज्ञानांचा उपयोग होतो. यातील पदवीधरांना अभियंता असे म्हणतात. प्रमुख अभियांत्रिकी शाखा पुढील प्रमाणे आहेत - रसायन अभियांत्रिकी उपकरण अभियांत्रिकी यांत्रिक अभियांत्रिकी संगणकशास्त्र अभियांत्रिकी उ ...

अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे

अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे हे महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. इ.स. १८५४ साली स्थापन झालेले हे महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, गिंडी व आय. आय. टी., रुरकी यांपाठोपाठ भारतातील तिसरे सर्वाधिक जुने महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय मुळा आणि मुठा, या दोन नद्यांच्या संगमाजवळ आहे. विद्यालयाच्या अभ्यास पध्तीना १९५० साली "पूना मॉडेल म्हटले जायचे.

स्थापत्य अभियांत्रिकी

स्थापत्य अभियांत्रिकी ही सर्वात जुनी अभियांत्रिकी शाखा आहे. यात नागरी आयोजन, बांधकाम, आणि बांधलेल्या इमारतींचे अनुरक्षण, व इतर सामाजिक प्राधिकरण संबंधित क्षेत्रे येतात. पृथ्वी, जल, किंवा संस्कृ‍ती आणि त्यांच्या क्रिया यांच्या संबंधित असल्यानेच इंग्रजीत याला सिव्हिल म्हटले जाते. आजच्या याच्या क्षेत्रात पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, पूर व्यवस्थापन आणि वाहतूक यांचा ही अंतर्भाव होतो. थोडक्यात स्थापत्य अभियांत्रिकी असे क्षेत्र आहे की जे आपल्या विश्वाला, राहत्या जागेला अधिक सुखकर बनवण्यास मदत करते. याच्या खालील प्रमुख शाखा आहेत. सागरी अभियांत्रिकी भूविज्ञान जीवयांत्रिकी स्थापत्य आयोजन व नियंत्रण पदार ...

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद GECA ची स्थापना इ.स. १९६० साली महाराष्ट्र शासनाने केली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद हे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आधिपत्या खाली आहे. जुलै २००६ पासून या अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान करण्यात आली असून, स्वतंत्र विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला आहे.

रासायनिक अभियांत्रिकी

रासायनिक अभियांत्रिकीची व्याख्या एक वा दोन ओळीत करणे कठीण आहे. परंतु असे म्हणता येईल की प्रत्येक उत्पादन प्रक्रियेत रासायनिक अभियांत्रिकी संकल्पनांची गरज असते. रासायनिक अभियांत्रिकीमध्ये रासायनिक व भौतिक प्रक्रियांचा पदार्थांच्या अधिक मौल्यवान उत्पादने वा उपयुक्‍त स्वरूपाच्या उर्जांमधील रुपांतरासाठी वापर होतो. रासायनिक अभियंत्याचे काम संकल्पना निर्माण करणे,तिचे आरेखन व विकास करणे, आणि त्या संकल्पनांचा वापर करून प्रक्रिया लाभदायक, सुरक्षित, कार्यक्षम व पर्यावरणदृष्ट्या स्वीकारार्ह बनवणे हे होय. रासायनिक अभियंत्याचा उत्पादन कसे व किती असावे,त्याचा दर्जा काय असावा,काम करणाऱ्या लोकांची सुरक्षा ...

वैद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी

वैद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी, यास इंग्रजी भाषेत मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजिनीअरिंग असे म्हणतात, अभियांत्रिकीची एक प्रमुख शाखा आहे. या शाखेच्या अभ्यासक्रमांतर्गत पायाभूत विद्युतशास्त्रासोबत प्रामुख्याने सूक्ष्मविद्युत पातळीवर चालणाऱ्या उपकरणांचा व यंत्रांचा अभ्यास असतो, तसेच दूरसंचार व दळणवळण शास्त्राच्या वेगवेगळ्या सैद्धांतिक व तांत्रिक बाबी शिकविल्या जातात. वैद्युत अभियांत्रिकी, किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक सर्किट, साधने मायक्रो, माइक्रोकंट्रोलर्सकरीता आणि इतर प्रणाली डिझाइन नॉन-रेषेचा आणि सक्रिय विद्युत घटक वापर कोणत्या एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरि ...

विद्युत अभियांत्रिकी

विद्युत अभियांत्रिकी हि अभियांत्रिकी शिक्षणाची एक शाखा आहे जी सर्वसाधारणपणे विद्युत व विद्युत-चुंबकत्वाचा अभ्यास व त्यांचे उपयोग यांच्याशी निगडीत आहे. १९व्या शतकाच्या उत्तार्धात तारायंत्र, दुरध्वनी आणि विद्युत शक्ति वितरण व वापर यांच्या वाणिज्यीकरणानंतर प्रथमच हि शाखा व्यवसायिक म्हणुन अभिन्न मानली जाउ लागली. त्यानंतर, प्रसारण आणि नोंदणी माध्यमांमुळे इलेक्ट्रॉनिक्स दैनंदिन जिवनाचाच भाग बनले. ट्रान्झिस्टर आणि त्यामागोमाग एकात्मिक परिपथाच्या शोधामुळे इलेक्ट्रॉनिक्स इतके स्वस्त झाले, की त्याचा उपयोग जवळपास सर्वच घरगुती उपकरणांमध्ये करता येण्याजोगा झाला. वैयक्तिक संगणक आणि माहिती तंत्रज्ञान यां ...

वाहतूक अभियांत्रिकी

वाहतूक अभियांत्रिकी म्हणजे वैज्ञानिक तत्त्वांचा वापर करून लोकांची, प्राण्यांची व सामानाची सुरक्षित, कुशलतेने व पूर्ण कार्यक्षमतेने ने-आण करणे आहे. ही स्थापत्य अभियांत्रिकीची उप-शाखा आहे. हिच्यात खालील सहा विभाग आहेत - अवकाश, हवाई, महामार्ग, पाईपलाईन, देशांतर्गत जलमार्ग, समुद्रकिनार्‍यावरची व सागरावरची वाहतूक). हे विभाग एकूण १८ तांत्रिक विभागांपैकी एक तृतीयांश विभागांचे प्रतिनिधित्व करतात. रस्त्यांचे नियोजन आणि बांधणी, शहरांचे नियोजन, आणि वाहतुकीचे नियंत्रण करण्याविषयीचा अभ्यास वाहतूक अभियांत्रिकीत केला जातो. देशातील पायाभूत सुविधासाठी या शाखेचे योगदान फार मोठे आहे.

अश्वशक्ती

एक अश्वशक्ती म्हणजे १ मिनिटात ३३,००० पौंड वजन १ फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती. १८ व्या शतकाच्या शेवटी जेम्स वॅट १७ जानेवारी १७३६ ते २५ ऑगस्ट १८१९ या स्कॉटिश संशोधकाने शोधलेल्या वाफेच्या इंजिनांचा वापर इंग्लंडमध्ये खाणीत अंतर्गत मालवाहतुकीसाठी सुरू झाला. अशा इंजिनाची क्षमता किती आहे, हे मोजण्यासाठी त्याने ‘अश्वशक्ती’ हे एकक विकसित केले. पाळीव घोड्याच्या शक्तीचा वापर शेकडो वर्षे शेती, प्रवास, मालवाहतूक अशा बाबतीत होत होता; त्यामुळे कार्यशक्ती किंवा कामाचा वेग मोजण्यासाठी घोड्याच्या शक्तीशी तुलना करणे हे तर्कसंगत ठरले. वॅटने निरीक्षण केले की एक घोडा १२ फूट ३.७ मी. त्रिज्या असलेले गोल चाक एका ...

उपयोजित यामिकी

उपयोजित यामिकी ही पदार्थविज्ञानाची एक शाखा असून त्यात यामिकीच्या व्यवहारातील उपयोगाचा अभ्यास केला जातो. उपयोजित यामिकीमध्ये स्थायू तसेच द्रव पदार्थ किंवा संस्था या बाहेरून लावल्या गेलेल्या बळाला कसा प्रतिसाद देतात याचे विवेचन आहे. उदाहरणार्थ या ज्ञानशाखेमध्ये दडपणाखाली असलेल्या द्रवाचे वहन कसे होते, बाहेरून लावलेल्या बळामुळे पदार्थ कसे भंग पावतात, किंवा बाहेरील आवाजामुळे कानाचा पडदा कसा कंप पावतो यासारख्या घटनांचा अभ्यास केला जातो. अभियांत्रिकीतील यामिकीच्या अभ्यासात मुळात स्थिर असणाऱ्या वा गतिमान असणाऱ्या वस्तूवर विविध बळांचा प्रयोग झाला असता तिच्या आचरणात होणाऱ्या बदलाचा अभ्यास केला जातो ...

उष्णता वहन

उष्मांतरण हे असे एक विज्ञान आहे, ज्यात भौतिक वस्तूचे तापमान बदलले की, त्याच्यातल्या ऊर्जेचे काय होते, याचा अंदाज केला जातो.ही ऊर्जा स्वतःची जागा बदलते म्हणजेच स्थानांतरण करते.उष्मागतिकीत ऊर्जेच्या या स्थानंतरणाला उष्णता असे म्हणतात.उष्णतेचे स्थानांतरण म्हणजे उष्मांतरण. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये उष्णतेच्या स्थानंतरणाचा दर काय असेल,त्याचा पण अंदाज उष्मांतरणात केला जातो. उष्मांतरण प्रामुख्याने तीन पद्धतीने होते. १.वहन २.प्रक्रमण ३.प्रारण १.वहन:- संपर्कात असलेल्या वस्तू दरम्यान ऊर्जा हस्तांतरण होत असते. औष्णिक चालकता ही उष्णता आयोजित करण्यासाठी सामग्रीची मालमत्ता आहे आणि प्रामुख्याने उष्णता ...

ऊर्जापरिवर्तक

एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करणारे साधन. अशा साधनांचे अनेक प्रकार आहेत. त्यांचा उपयोग मुख्यतः दूरमापनात होतो. विद्युत् शक्ती हाताळण्यास सोपी असल्याने तिचा माध्यम म्हणून चांगला उपयोग होतो. मापन करावयाच्या भौतिकीय राशीतील बदलाने विद्युत् मंडलातील रोध, प्रवर्तन किंवा धारणा यांचे मान बदलता येते. तेव्हा या गुणधर्मांना अनुसरून त्या त्या उपकरणाला अनुक्रमे रोध, प्रवर्तन व धारणाऊर्जा परिवर्तके अशी नावे दिलेली असतात. दैनंदिन व्यवहारात आढळणारी या उपकरणांची उदाहरणे म्हणजे कार्बन कणांचा अथवा धारितेचा उपयोग करणारा ध्वनिग्राहक. आपल्या बोलण्याने ध्वनिग्राहकावर ध्वनी तरंगां ...

गतिनियंता

मूलचालकांचा सरासरी परिभ्रमी वेग नियमित करणारे यांत्रिक साधन. जेव्हा एंजिनावरील भार बदलत नाही तेव्हा त्याची ठराविक सरासरी परिभ्रमी गती कायम राखणे व जेव्हा भार बदलतो व त्यामुळे वेगात बदल होतो तेव्हा एंजिनाला पुरविल्या जाणाऱ्या ऊर्जेत जरूर तो बदल घडवून वेग पूर्वपदावर आणणे हे गतिनियंत्याचे कार्य होय. प्रत्येक एंजिनला गतिनियंत्याशिवाय, काहीसे त्याच्याच सारखे कार्य करणारा, आणखी एक घटक जोडलेला असतो. तो म्हणजे प्रचक्र होय. पण प्रचक्र हे फक्त एंजिनातील कार्यमाध्यमाच्या एका आवर्तनातील गतीचे नियमन करू शकते. त्याला एंजिनाच्या सरासरी वेगाचे नियमन करता येत नाही आणि गतिनियंत्याला आवर्तनातील गतीच्या फरकाच ...

पाणीपुरवठा

पाणी ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक आवश्यक बाब आहे. पाण्याचा उपयोग घरगूती कामासाठी, बागकाम व शेती, बाष्पशक्ती व जलविद्युत् शक्ती यांची निर्मिती, विविध प्रकारचे उद्योगधंदे, आगनिवारण, मूलमूत्र व औद्योगिक अपशिष्ट वाहून नेणे इ. अनेक कामांसाठी होतो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेने असा इशारा दिला आहे की, इ. स. २००० च्या सुमारास जेव्हा जगाची लोकसंख्या दुप्पट होईल तेव्हा १९७० साली लागत होते त्याच्या तिप्पट पाण्याची जरूरी असेल आणि त्या वेळी जगाला पाण्याच्या दुर्भिक्ष्याला तोंड द्यावे लागेल. वर निर्दिष्ट केलेल्या पाण्याच्या प्रत्येक प्रकाराच्या वापरासाठी पाण्यामध्ये भौतिकी व रसायनशास्त्र य ...

बहुवारिकीकरण

लहान रेणूंपासून बहुवारिके बनविण्याच्या विक्रिया. यांचे दोन प्रकार आहेत: समावेशक बहुवारिकीकरण व संघनन बहुवारिकीकरण. समावेशक बहुवारिकीकरण: या विक्रिया-प्रकारात एकवारिकाचे रेणू एकमेकांत सामावले जातात विक्रियेमध्ये त्यातील अणू किंवा त्यांपासून बनलेली संयुगे वेगळी होत नाहीत. ज्या संयुगांत द्विबंध किंवा त्रिबंध आहेत अशा संयुगांचे रेणू, उदा., CR2 = CR2 R= H किंवा प्रातिष्ठापित मूलक म्हणजे एका अणूच्या वा अणुगटाच्या ठिकाणी आलेला दुसरा अणुगट.मूलक CH ≡ CH यांचे बहुवारिकीकरण या प्रकारे होते. त्याचप्रमाणे काही वलयी संयुगांच्या वलयांचा भंग झाला म्हणजे विक्रियाशील केंद्रे असलेल्या संरचना निर्माण होतात व ...

लेथ

लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात अन ज्याने काम करायचे आहे त्याला टूल म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात. ॲटोमॅटीक लेथ,CNC लेथ,टरेट लेथ, बेंच लेथ, इंजिन लेथ अशा प्रकारच्या काही लेथ मशीन्स. बोरिंग/कौंटर बोरिंग:-असमान व्यासाचे छिद्र फेसिंग करणे:-दंडगोलाची लांबी कमी करणे. टर्निं ...

संवेदक

संवेदक म्हणजे एक बदल जाणण्याची क्षमता असलेले साधन. हे साधन प्रत्यक्षातील गोष्टी मोजते आणि त्याचे वाचन करता येईल अशा संदेशात रूपांतर करते. हे संवेदक पारंपरिक मापन यंत्रांची जागा घेत आहेत. उदाहरणार्थ, पार्‍याच्या उष्णतेच्या कमी अधिक होण्याने प्रसरण आणि आकुंचन होण्याच्या गुणधर्मावर आधारित च्या ऐवजी आता तापमानानुसार विद्युत्‌विरोध बदलणारी थर्मिस्टर नावाची वस्तू वापरून तापमापीचा संवेदक बनतो. याला रेडियो सर्किट जोडून दूरवरून तापमान वाचता येते. बाजारात विविध प्रकारचे संवेदक भरपूर प्रमाणात मिळतात. त्यांचा वापर रोजच्या वापरातील अनेक उपकरणात केला जातो.

सांगकाम्या

तुम्हाला विकिपीडिया:सांगकाम्या हे अपेक्षित आहे का? सांगकाम्या म्हणजे संगणक आज्ञावलीनुसार ठरवून दिलेले काम करणारे यंत्र होय. यास यंत्रमानव असेही काहीवेळा म्हंटले जाते. तसेच रोबो किंवा रोबोट हा इंग्रजी शब्दही वापरात असलेला आढळतो.

                                     

संगणक अभियांत्रिकी

संगणक अभियांत्रिकी ही अभियांत्रिकीची एक प्रमुख शाखा आहे.सध्या सर्वत्र संगणक वापरले जातात. त्यामुळे संगणक अभियांत्रिकी शाखेला खूप महत्त्व आलेले आहे.संगणक अभियांत्रिकी शाखेत प्रामुख्याने संगणक प्रणाली,पायाभूत संगणकीय गणित,माहिती व्यवस्थापन, सॉफ्टवेर निर्मिती,डाटाबेसेस,ऑपरेटीग प्रणाली संगणक रचना यांचा समावेश होतो.

                                     

यांत्रिक अभियांत्रिकी

मेकॅनिकल इंजिनीरिंग ही अभियांत्रिकीच्या सर्वांत जुन्या शाखांपैकी एक आहे. ही एक अभियांत्रिकीची अतिशय विस्तारित शाखा आहे. हिच्यात साधारणपणे यांत्रिक व्यवस्थेच्या मागचे तत्त्व तिच्या उत्पादनासाठी लागण्याऱ्या भौतिक नियमांचा अभ्यास आणि वापर असतो. यातील उपशाखा अशा आहेत: Statics, Dynamics, Strength of materials, Solid mechanics, Thermodynamics, Fluid Dynamics, Heat Transfer, Refrigeration and Air Conditioning, Kinematics including robotics, Manufacturing Technology, Mechatronics व Control Theory.

                                     

चक्री कर्तन यंत्र

अनेक तीक्ष्ण दाते असलेल्या फिरणाऱ्या चक्री कर्तकाने धातू कापण्याचे काम करणारे यंत्र. अशा यंत्राचे अनेक प्रकार आहेत. यंत्रात आडव्या तर्कूवर चक्री कर्तक बसविलेला असतो व तो उभ्या पातळीत फिरतो. त्याच्या खालच्या बाजूने सरकणाऱ्या टेबलावर कापावयाची वस्तू बसविलेली असते. कसल्याही चक्राचे किंवा वस्तूचे सारखे भाग पाडण्यासाठी या यंत्राच्या टेबलाच्या पुढील बाजूला एक खास विभाजन प्रयुक्ती बसविलेली असते, हे या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणता येईल. आडव्या तर्कूवर फिरणारा कर्तक कसे काम करतो.

                                     

माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी

नातं रिचार्जे करू आपल्यातलं बोलणं संपलं असेल तर पुन्हा एकदा टॉक टाइम भरू. चाल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्जे करू मनामध्ये काही अडले असेल तर त्या वाईट गोष्टींना फॉरमॅट मारू. चाल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्जे करू नवा घेऊन पुन्हा कॅनवास नव्या चित्रात नवे रंग भरू चाल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्जे करू प्रेमाचा नेट पॅक, समजुतीच बॅलन्स हृदयाच्या वोउचेवर पुन्हा स्क्रॅच करू चाल ना, पुन्हा एकदा नातं रिचार्जे करू