ⓘ विज्ञान - विज्ञान, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, नेहरू विज्ञान केंद्र, न्यायसहायक विज्ञान, नैसर्गिक विज्ञान, भारतीय विज्ञान संस्था, आश्रम, गणित ..

विज्ञान

एखाद्या विषयाच्या व्यवस्थित रीतीने systematic study केलेल्या अभ्यासास विज्ञान असे म्हणतात. विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान Science होय. लॅटिन भाषेतील Scientia सायन्शिया या शब्दावरून इंग्रजीतील ‘सायन्स’ हा शब्द तयार झालेला आहे. विज्ञानात ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. तथापि, सर्वच प्रकारच्या ज्ञानाला विज्ञान म्हटले जात नाही - उदा. अध्यात्म.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान व वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे. याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिकारानुसार "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम, १९९८"ला अनुसरून हे इ.स. १९९८ साली स्थापन झाले. महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. सध्या या विद्यापीठाचे कुलगुरू हे डॉ. अरुण जामकर आहेत. विद्यापीठाचा कारभार चालण्यासाठी ११ विविध समित्या व विभागांची स्थापना करण्यात आली आहे.

नेहरू विज्ञान केंद्र

नेहरू विज्ञान केंद्र भारतातील सर्वात मोठे परस्परसंवादी विज्ञान केंद्र आहे. ते मुंबईतील वरळी येथे स्थित आहे. केंद्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ओळखले जाते. १९७७ सालीत लाइट ॲण्ड साइट प्रदर्शनासह हे केंद्र सुरू झाले आणि १९७९ मध्ये तिथे एक सायन्स पार्क तयार करण्यात आला.११ नोव्हेंबर १९८५ रोजी ते तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते जनतेसाठी खुले करण्यात आले. काळानुसार बदल ह्या केंद्रात विज्ञानाच्या विविध संकल्पना सोप्या आणि साध्या सरळ भाषेत समजून घेता येतात.येथे मुलांसाठी विज्ञान उद्यान साकारलेले आहे. केंद्रात शिरताक्षणीच उजव्या बाजूला उद्यान आहे तर डाव्या बा ...

न्यायसहायक विज्ञान

निरनिराळ्या विज्ञान शाखांचे एकत्रीकरण करून ही बहुआयामी शाखा बनली आहे. येथे निरनिराळ्या शास्त्रशाखांतील शास्त्रज्ञ येतात. न्यायसहायक विज्ञानशाखेच्या प्रयोगशाळेत मानसोपचार तज्ज्ञ, विषतज्ज्ञ व रोगतज्ज्ञ तर असतातच, शिवाय हस्ताक्षरतज्ज्ञ, छायाचित्रकार व वर्णनावरून चित्र रेखाटणारे चित्रकारही असतात. प्रयोगशाळेत पुरावा उचलण्यासाठीही काही विशिष्ट चिमटे, कागद इत्यादी साधनांचा व रसायनांचा वापर करतात.

नैसर्गिक विज्ञान

नैसर्गिक विज्ञान ही निरीक्षण आणि प्रयोगावरून प्रायोगिक पुराव्याच्या आधारावर नैसर्गिक समस्येचे वर्णन, अंदाज आणि समजण्याशी संबंधित विज्ञानशास्त्राची एक शाखा आहे. संशोधन आणि निष्कर्षांची पुनरावृत्ती यासारख्या यंत्रांचा वापर वैज्ञानिक प्रगतीची वैधता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी केला जातो. नैसर्गिक विज्ञानाच्या दोन मुख्य शाखा आहेत. भौतिक विज्ञान. भौतिक विज्ञान हे शाखांमध्ये विभाजित केले आहे, ज्यात भौतिकशास्त्र, अंतरिक्ष विज्ञान, रसायनशास्त्र, आणि पृथ्वी विज्ञान यांचा समावेश आहे. जीवन विज्ञान किंवा जैविक विज्ञान

भारतीय विज्ञान संस्था

भारतीय विज्ञान संस्था ही संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी असलेली अग्रेसर शिक्षण संस्था बंगळूर, भारत येथे आहे. या संस्थेत पदव्युत्तर तसेच doctoral कार्यक्रम आहेत. ज्यामध्ये २०० पेक्षा अधिक संशोधक ३७ पेक्षा अधिक विभागांमध्ये काम करतात. उदाहरणार्थ: अभियान्त्रिकीमध्ये अंतरीक्ष अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि स्वयंचलन इत्यादी, आणि शास्त्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र इत्यादी. भारतीय विज्ञान संस्था भारतातील संशोधनसंस्थांमध्ये पहिल्या दर्जाची संस्था आहे.

विज्ञान आश्रम

विज्ञान आश्रम पुणे जिल्ह्यातील पाबळ गावातील एक शैक्षणिक संस्था आहे. डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग हे या संस्थेचे संस्थापक आहे.ते हिंदुस्थान लिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या ‘इंजिनिअरिंग सायन्स’ विभागाचे प्रमुख होते. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी १९८३च्या सुमारास विज्ञान आश्रम सुरू केला. अनेक मुले, त्यांनी शाळा सोडली असली तरी, जीवनात यशस्वी होतात. ती काम करत करतच शिकतात. याचाच अर्थ काम करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. समाजातील जास्तीत जास्त मुले अशा प्रकारे शिकत असतील तर शिकण्याची हीच मुख्य पद्धत हवी, या विचारातून डॉक्टरांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. त्यांनी ख्यात ...

मराठी विज्ञान परिषद

मराठी विज्ञान परिषदेची स्थापना इ.स. १९६६ साली झाली. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे, विज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने मराठी भाषा समृद्ध करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे अशी प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून कार्य करीत असलेल्या या संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय मुंबईत चुनाभट्टी येथे आहे. मध्यवर्तीशी संस्थेशी संलग्न विभागांशी संख्या एकूण ६८ इतकी आहे. हे सर्व विभाग महाराष्ट्रभर विखुरले असून महाराष्ट्राबाहेरही परिषदेचे ४ विभाग कार्यरत आहेत. अशाच उद्देशाने कलकत्यात १९१३ साली ’भारतीय विज्ञान परिषद संस्था’ स्थापन झाली आहे. मराठी विज्ञान परिषद ...

विज्ञान केंद्रे

मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरच्या धर्तीवर ठाण्यात एक सायन्स सेंटर उभारले गेले आहे. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेने एनसीएसएम मंजुरी नंतर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली या सेंटर उभारणीची झाली. हे सेंटर, ठाणे आणि सभोवतालच्या शहरातील शाळकरी मुलांचे कुतूहल शमविण्याबरोबर त्यांच्या ज्ञानात भर टाकणारे असून ठाणे शहराच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक चळवळीतला महत्त्वाचा टप्पा आहे. सायन्स सेंटरमध्ये अंतराळ विज्ञान, कम्प्युटर्स आदी विविध विज्ञान शाखांची सखोल माहिती देणाऱ्या दालनांसोबतच ५० बदलत्या प्रदर्शनाची सोय असलेली विज्ञान वाटिका प्रस्तावित आहे. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेने ...

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, भोपाळ

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, भोपाळ ही भोपाळ, मध्य प्रदेश येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे.

आयुर्वेद

आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह जीवन + विद्या अशाप्रकारे होतो. आयुर्वेदाची सुरवात ब्रह्मापासून झाली असे मानले जाते. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो. आयुर्वेदातील सिद्धान्त आणि औषधे आधुनिक विज्ञानाच्या clinical trials या पद्धतीनुसार तपासलेली नसतात. ...

औषधसतर्कता

प्रतिकूल परिणामांचा, विशेषतः औषधांच्या दीर्घकालिक व अल्पकालिक अनुषंगिक परिणामांचा शोध, निर्धारण, आकलन आणि प्रतिबंधन यांच्याशी संबंधित औषधशास्त्राची शाखा म्हणजे औषधसतर्कता होय. साधारणतः औषधे, जैविक साधने, वानस्पतिक उपचार व पारंपरिक उपचार यांच्या प्रतिकूल परिणामांबद्दल वैद्यकव्यवसायींकडून व रुग्णांकडून माहिती गोळा करण्याचे, देखरेखीचे, संशोधनाचे, निर्धारणाचे आणि मूल्यांकनाचे काम या शास्त्रात केले जाते. या कार्याचे दोन उद्देश असतात: औषधांशी संबंधित धोक्यांबद्दल नवी माहिती मिळविणे रुग्णांना होणारी इजा टाळणे. औषधसतर्कता चिकित्साशास्त्रीय अवस्थेपासून सुरू होते आणि औषधाच्या उत्पादन आयुष्यचक्रात सु ...

गणित

मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल या संकल्पनांवर आधारित असलेली आणि त्यांचा अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. गणित हे निरपवाद निष्कर्ष काढण्याचे शास्त्र आहे असे विद्वान मानतात. हे प्रतिमानांचे शास्त्र असून संख्या, अवकाश, विज्ञान, संगणक, अमूर्त कल्पना आणि अशाच काही तत्सम विषयांमध्ये गणिताच्या साह्याने प्रतिमाने शोधता येतात. नवीन संकल्पनाथिअरी मांडून तिला, तिच्यातील तथ्ये, मूळवाक्ये आणि व्याख्यांपासून कठोर तर्काद्वारे सिद्ध करण्यासाठी गणिती अशा संकल्पनेचा धांडोळा घेतात. इतिहास अमूर्तता आणि तर्क यांच्या वापराने मोजणी, आकडेमोड, मापन यांपासून भौतिक जगतातील आकार आणि कृती यांच्या शिस्तबद्ध अभ ...

गर्भारपणा

हा लेख मानवाच्या स्त्रीजातीतील गर्भावस्थेविषयी आहे. स्त्रीच्या गर्भाशयातील फलन व भ्रूण किंवा गर्भ म्हटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे गर्भावस्था किंवा गरोदरपणा होय. गर्भावस्थेत जुळे किंवा तिळ्यांप्रमाणे अनेक सगर्भता असू शकतात. गर्भधारणेनंतर सुमारे ३८ आठवड्यांत प्रसूती होते; रजोचक्राची लांबी चार आठवडे असणाऱ्या स्त्रियांमध्ये हा काळ अंतिम सामान्य रजोकालाच्या प्रारंभापासून सुमारे ४० आठवडे इतका येतो. सस्तनी प्राण्यांच्या गर्भावस्थांपैकी मानवी गर्भावस्थेचा सर्वाधिक अभ्यास झालेला आहे. गर्भधारणा लैंगिक समागमातून किंवा सहाय्यक प्रजननी तंत्रज्ञानामार्फत साधली जाऊ शकते. गर्भधारणेपास ...

चिकित्सा पद्धती

रोग झाल्यावर त्याच्या उपचाराच्या पद्धतीला चिकित्सापद्धती म्हणतात. आधुनिक काळात,जीवनात गुंतागुंत इतकी वाढत आहे की मनुष्य दिवसेंदिवस वेगवेगळ्या शारीरिक व मानसिक रोगांना बळी पडत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या चिकित्सापद्धती पण समोर येत आहेत. कधी कधी, एका रोगावर दिलेले औषध हे दुसऱ्या रोगाचे कारण बनत आहे. जगात सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक चिकित्सा पद्धती आहेत. त्यात वेगवेगळे असे त्यांचे गुण-दोष आहेत.कोणाला कोणती एक पद्धत आवडते तर कोणाला दुसरी. रोग्याला रोगापासून आराम हवा असतो. तो मिळावयास हवा.चिकित्सा पद्धती कोणतीही असो. शक्य तोवर रोगी त्याचे आर्थिक कुवती प्रमाणे चिकित्सापद्धती स्विकारतो असा अनुभ ...

जनुकशास्त्र

जनुकशास्त्र हे जनुक अभ्यासणारे शास्त्र आहे. यातील संशोधनामुळे सदोष मानवी जनुके हुडकून त्यांच्या जागी काही दुरुस्त्या करता येतात व संभाव्य रोग टाळता येतात. सध्या मानवी प्रतिकारशक्तीस कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांची संकेतावली उलगडण्यासाठी संशोधन केले जाते आहे. जेव्हा पेशीविभाजनाची क्रिया होत असते तेव्हा काही जनुकांची नक्कल करण्यात चुका होतात. त्यामुळे कर्करोग व इतर जीवघेणे रोग होतात. हे रोग ते काही वेळेला केमोथेरपी सारख्या उपचारालाही दाद देत नाहीत.

जीवाश्मशास्त्र

जीवाश्मशास्त्र या शास्त्रात प्रागैतिहासिक जिवांची उत्पत्ती व पर्यावरणाशी जुळवून घेताना झालेली त्याची उत्क्रांती, यांचा प्रामुख्याने जीवाश्मांच्या मदतीने अभ्यास केला जातो. विद्याशाखीय दृष्टिकोनातून जीवाश्मशास्त्र ही जीवशास्त्र व भूशास्त्र यांच्याशी संबंधित आंतरविद्या आहे. जीवाश्म विखुरलेले असतात. जीवाश्मांना एकत्रित करून कल्पनेच्या साहाय्याने प्राण्यांच्या शरीराचा आकार, खाद्यसवयी तसेच पुनरुत्पादन प्रक्रिया इत्यादी विविध प्रकारची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न जीवाश्मशास्त्रज्ञ करीत असतात. या शास्त्राच्या अभ्यासामुळे, डायनॉसॉर जातीमधील अतिभव्य प्राणी पृथ्वीवरून नष्ट होण्याची कारणे कोणती याचा ...

तत्त्वज्ञान

भारतात प्राचीन काळापासून धर्म आणि तत्त्वज्ञान यांना एकच मानले गेले; तर पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाची सुरूवात ग्रीक तत्त्वज्ञानाने झाली, असे मान्य झाले आहे. तत्त्वज्ञान म्हणजे अस्तित्व,ज्ञान, मूल्ये, विवेकशक्ती, मन आणि भाषा यांच्या संबंधातील सर्वसाधारण व मूलभूत प्रश्नांची चिकित्सा असे समजले जाते. अशा प्रश्नांचा अभ्यास करणे किंवा ते शक्यतो सोडवणे हा हेतू तत्त्वज्ञानामागे असतो. अशा प्रकारच्या समस्यांचा विचार करणारे जे इतर मार्ग किंवा इतर ज्ञानशाखा आहेत; त्यापेक्षा अतिशय भिन्न रीतीने होणाऱ्या चिकित्सकतेमुळे व तर्काधिष्ठित युक्तिवादामुळे तत्त्वज्ञान वेगळे ठरते. प्रश्न उपस्थित करणे, चिकित्सक चर्चा ...

तारा

अवकाशामध्ये गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र असणाऱ्या आणि प्लाझ्माचा बनलेल्या चमकत्या गोलाला तारा असे म्हटले जाते. सूर्य हा पृथ्वीला सर्वांत जवळचा तारा आहे. रात्रीच्या वेळी बहुदा तारे निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात. काही ताऱ्यांचा रंग लालसर तांबूस, हिरवट किंवा पिवळसर दिसतो. तारा वातावरणाच्या जास्त थरातून येताना होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणामुळे अनेक रंगांमध्ये चमकताना दिसतो. ताऱ्याचे हे रंग फसवे असतात, पण तारा जर आकाशात, क्षितिजापासून उंच असेल व हवा स्थिर असेल तर ताऱ्याचा दिसणारा रंग खरा असू शकतो. तारे वायुरूप व तप्त असतात. ताऱ्यांच्या अंतर्भागातील तापमान काही कोटी अंश सेल्सिअस असले तरी त्यांच्या पृष ...

द्रव

द्रव हे पदार्थाचे मूल रुप मानले जाते. द्रव ही अशी स्थिती आहे की ज्या मध्ये पदार्थाच्या कणांना मुक्तपणे फिरता येते. पाणी हे द्रवाचे उदाहरण आहे. वायूच्या कणांना एकमेकांबद्दल जराही आकर्षण वाटत नाही म्हणून वायूचे कण एकमेकांपासून दूर जातात. वायूच्या कणांवर दाब देऊन त्यांना जवळ आणले आणि कुठूनही भांड्याबाहेर पडू दिलं नाही तर एका ठराविक परिस्थितीत, हे खूप जवळ आलेले वायूचे कण एकमेकांकडे आकर्षित होतात. हे घडत असतांना तिथलं तापमान कमी होत जाते. एका विशिष्ट तापमानाला आणि दाबाला वायूचे द्रवात रुपांतर होते. खूप दाबामुळे, जबरदस्तीने द्रवरुपात गेलेल्या वायूवरचा दाब कमी झाला तर त्याचे परत वायूत रुपांतर होते.

नायट्रोजन चक्र

वातावरणात नायट्रोजन ७८% या प्रमाणात आढळतो. निसर्गात जैविक व अजैविक प्रक्रियेत होणारा नायट्रोजनचा वापर व पुन्हा त्याचे वातावरणात होणारे उत्सर्जन याला नायट्रोजन चक्र असे म्हणतात. सजीवांमध्ये आढळणारे प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ल यांचा नायट्रोजन हा अविभाज्य घटक आहे. इतर मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय मूलद्रव्य आहे, असे असले तरीही सर्वच सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. नायट्रोजन हा वातावरणातील सर्वात मुबलक घटक आहे. नायट्रोजन चक्र एक जटिल जैवरासायनिक चक्र आहे ज्यामध्ये नायट्रोजन त्याच्या अक्रिय वातावरणीय रेणू फॉर्म N 2 मधून जैविक प्रक्रियेत उपयुक्त अशा रूपात रूपांतरि ...

मानसशास्त्र

मानसशास्त्र: Psychology, सायकॉलॉजी हे मन व वर्तणूक यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा शब्द रुडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञ याने १६ व्या शतकात तयार केला गेला आहे. हा शब्द psyche साईक व logus लोगस या शब्दांवरून आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे. यावरून त्या काळातला या शास्त्रावरचा धार्मिक प्रभाव लक्षात येईल. परंतु काही तत्त्वज्ञांनी यास आक्षेप घेतला.आत्मा ही एक गूढ, अमूर्त, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे आत्म्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य नाही. हा विचारप्रवाह विकसित होऊन मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला १९वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी मन ...

यंत्रमानव

यात डोळ्यांच्या जागी दोन कॅमेरे बसवले जातात. हे कॅमेरे संगणकाशी जोडलेले असतात. तसेच यामध्ये मायक्रोफोन बसवलेले असतात. त्यांचा वापर करून असिमो यंत्रमानव दिलेल्या ठराविक आज्ञांना उत्तरे देऊ शकतो. तसेच आवाज कोठून आला आहे त्याचे ज्ञानही त्याला होऊ शकते.

युनानी औषधोपचार पद्धती

युनानी औषधोपचार पद्धती ही एक पुरातन पद्धती आहे. त्यातही औषधांचे व्यवस्थापन आणि प्रकृतीच्या आकलनाची विशिष्ट तत्त्वे आहेत. युनानी औषधोपचार पद्धतीनुसार मानवी शरीर सात मूळ घटकतत्त्वांनी बनलेले आहे. ही तत्त्वे आरोग्याच्या देखभालीसाठी व जडणघडणीसाठी कारणीभूत असतात. यापैकी कोणत्याही घटकाचा अपव्यय किंवा त्यांच्या भौतिक स्थितीतील बदल आजाराला किंवा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. ही सात घटकतत्त्वे खालीलप्रमाणे आहेत. ५) अल्‌-अखाह जीवनावश्‍यक स्फूर्ति ७) अल्‌-अफआल शारीरिक क्रिया १) अल्‌-अरकान किंवा अल्‌-अनासीर मूलद्रव्य ६) अल्‌-कवा शक्ती ३) अल्‌-अखलात शारीरिक द्रव्ये २) अल्‌-मिजाज स्वभाव किंवा प्रवृत्ती ४) ...

रसायनशास्त्र

रसायनशास्त्र हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. रसायनशास्त्रात रसायनांचे पृथक्करण करून त्यातील संयुगांचाही अभ्यास केला जातो. रसायने अतिरिक्त प्रमाणत शरीरास घातक असतात. रसायनशास्त्राला कधीकधी केंद्रीय विज्ञान असे सुद्धा म्हटले जाते. कारण, हे शास्त्र मूलभूत पातळीवर आणि अनुप्रयुक्त वैज्ञानिक विषयांना समजून घेण्याचे एक आधार प्रदान करते. रसायनशास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे. इस्पितळामध्ये दिली जाणारी औषधे ही रासायनेेेच असतात. इमारतीला दिला जाणारा रंग रसायनापासून ...

वैज्ञानिक पद्धती

विविध नैसर्गिक गोष्टींची चिकित्सा करून त्यांबद्दलचे ज्ञान मिळवणे आणि जुन्या ज्ञानाची दुरुस्ती करून त्याचे नव्या ज्ञानाबरोबर संकलन करणे यांसाठीच्या पद्धतींच्या संचांला वैज्ञानिक पद्धती असे म्हटले जाते." वैज्ञानिक म्हणून गणली जाण्यासाठी ही पद्धती ही नेहमी प्रायोगिक आणि मोजमाप करता येईल अशा पुराव्यांवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे तर्कवादाची काही ठराविक तत्वेदेखिल यामध्ये पाळली जाणे अपेक्षित असते. The scientific method is a body of techniques for investigating phenomena, acquiring new knowledge, or correcting and integrating previous knowledge. The scientific method is an ongoing process, which ...

शब्दकोशांची सूची

अभ्यासकांना महत्त्वाच्या संदर्भकोशांची शब्दकोशांची यादी एकत्रित एके ठिकाणी मिळण्यासाठी ही सूची उपयुक्त आहे. यात मराठी, हिंदी तसेच इतर भाषातील महत्त्वाच्या शब्दकोशांची नोंद असावी. मराठी शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी निराळी सूची मराठी-मराठी शब्दकोशांची सूची या पानाव पहा.

शास्त्र

एखाद्या कोणत्याही विषयाच्या व्यवस्थित व तर्कशुद्ध अभ्यासाला किंवा समजून घेण्यास शास्त्र असे म्हणतात. किंवा असे म्हणता येईल की, एखाद्या विषयाचा स + अस्त्र म्हणजेच एखाद्या अस्त्राचा वापर करुन केलेल्या सखोल अभ्यासाला शास्त्र म्हणतात.

सांख्यिकी

आकडेवारी जमविणे, तिचे विश्लेषण करणे, निष्कर्ष/अनुमान काढणे, स्पष्टीकरण देणे आणि ती सारांश रूपात प्रस्तुत करणे यासंबधीचे शास्त्र म्हणजे संख्याशास्त्र. संख्याशास्त्र ही एक आधुनिक काळातील ज्ञानशाखा आहे. एखाद्या वैज्ञानिक, औद्योगिक अथवा सामाजिक समस्येचा संख्याशास्त्रीय अभ्यास करताना संख्याशास्त्रीय समष्टी किंवा संख्याशास्त्रीय प्रतिमान ह्यांचा अभ्यास करण्याची पद्धत आहे. समष्टी ही संज्ञा विविध व्यक्तींचा समूह अथवा विविध वस्तूंचा समूह अशा अर्थी वापरण्यात येते. उदा. एखाद्या प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या सर्व व्यक्ती किंवा एखाद्या स्फटिकातील सर्व अणू. विदेसंबंधीच्या विविध पैलूंचा विचार संख्याशास्त्रा ...

संयुगे

संयुग अनेकवचन:संयुगे ही रसायनशास्त्रातील एक संज्ञा आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक मूलद्रव्ये रासायनिक बंधनांनी जोडली गेली की संयुगाची निर्मिती होते. वेगवेगळ्या संयुगाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात. मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देवाण-घेवाण किंवा विद्युतपरमाणुच्या भागीदारीमुळे संयुगे तयार होतात. धातू आणि अधातू मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देवाण-घेवाण होते. संयुगाचे आयनिक संयुगे व सहसंयुज संयुगे असे प्रकार पडतात. १) आयनिक संयुगे - मूलद्रव्यांमध्ये विद्युतपरमाणुची देवाण-घेवाण मुळे ही संयुगे तयार होतात. आयनिक संयुगाचे धन प्रभारीत व ऋण प्रभारीत आयन असे दोन घटक असतात. दोन भिन् ...

१७२९ संख्या

१७२९ ही १७२८ नंतरची आणि १७३० च्या अगोदरची नैसर्गिक संख्या आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे. या संख्येला रामानुजन संख्या म्हटले जाते. गणितज्ञ हार्डी ज्या गाडीने आजारी रामनुजनला भेटायला गेले होते, त्या गाडीचा 1729 हा काहीसा नीरस नंबर होता. तसे रामानुजनला सांगितल्यावर त्यांनी तत्काळ हा नंबर किती खास आहे हे सांगितले. म्हणून ही संख्या रामानुजन संख्या म्हणून प्रसिद्ध आहे. १२ ३ + १ ३ = १७२९ आणि १० ३ + ९ ३ = १७२९. अशीच एक दुसरी संख्या ४ ३ + ३ = ९१ आणि ६ ३ + -५ ३ = ९१ आणि विशेष म्हणजे ९१ × १९ = १७२९

                                     

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ

पशु वैद्यक क्षेत्रातील शिक्षणाकरीत डिसेंबर 2000 मध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.

                                     

रमण विज्ञान केंद्र

रमन विज्ञान केंद्र, नागपूर हे कोलकाताच्या राष्ट्रीय कौन्सिल ऑफ सायन्स म्युझीअम्सचे एक घटक आहे, जे संस्कृती मंत्रालयाच्या अधीन आहे. विदर्भ क्षेत्रातील जनते आणि विद्यार्थ्यांमधील विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी १९८९ मध्ये हा केंद्रस्थापित करण्यात आले. भौतिकशास्त्रातील प्रथम भारतीय नोबेल पुरस्कार विजेता सर सी व्ही रमण हे नागपूरमधील महालेखापरीक्षकांच्या कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे या केंद्राला हे नाव मिळाले.

                                     

आनुवांशिक जनुकशास्त्र

आनुवांशिक जनुकशास्त्र हे जनुकशास्त्राची पुढची श्रेणी आहे. मानवात, तसेच बहुतेक सजीवांच्या पेशींच्या केंद्रातील डीएनएवरील माहिती ए, टी, जी आणि सी या रासायनिक स्वरुपांत असते. या रासायनिक स्वरुपांत बदल होतो पण डीएनएची श्रृंखला तशीच असते, या रासायनिक स्वरूपातील बदलांचा अभ्यास आनुवांशिक जनुकशास्त्रात केला जातो. भारतातील नामवंत शास्त्रज्ञ संजीव गलांडे यांनी या विषयात संशोधन केले आहे. ‎

                                     

धातुशास्त्र

धातू मूलद्रव्ये, त्यांची आंतरधात्वीय संयुगे, मिश्रधातू म्हणून ओळखली जाणारी धातूंची मिश्रणे या सर्वांच्या भौतिक व रासायनिक वर्तनाचा अभ्यास करणारी धातुशास्त्र किंवा धातुविज्ञान ही पदार्थविज्ञानातील एक शाखा आहे. धातूंच्या तंत्रज्ञानास, अर्थात धातू व्यावहारिक उपयोगात कसे आणले जातात या विद्येसही, धातुशास्त्र म्हणतात.

                                     

फॅरनहाइट

फॅरनहाइट हे तापमान मोजण्याचे एक एकक आहे. डॅनियल फॅरनहाइट ह्या जर्मन शास्त्रज्ञाने १७२४ साली ह्या एककाचा शोध लावला. ह्या मोजमापानुसार ३२ फॅरनहाइटला पाणी गोठते व २१२ फॅरनहाइटला पाणी उकळते. सध्या जगातील बहुतांशी देशांनी फॅरनहाइटचा वापर थांबवून सेल्सियस ह्या एककाचा स्वीकार केला आहे. अमेरिकेमध्ये मात्र अजुनही फॅरनहाइट हेच एकक वापरले जाते.

                                     

भिंग

भिंग ही बहिर्वक्र आकाराची काचेची चकती असून त्याचा उपयोग कोणत्याही वस्तूच्या प्रतिमेचे दृष्य रूप मोठे करण्यासाठी होतो. बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र भिंगांच्या विशिष्ट रचनेने दुर्बिण आणि सूक्ष्मदर्शक तयार करता येतो.

                                     

विज्ञानदिन

फेब्रुवारी २८ हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून साजरा करण्यात येतो. विज्ञानप्रसारविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. वैज्ञानिक दृष्टिकोन शोधक वृत्ती मानवतावाद आणि सुधारणा यांना प्रोत्साहन देणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे या घटनेतील कर्तव्याची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अनिष्ट परंपरांचा पगडा उतरवून निर्भयपणे विज्ञानवाद स्वीकारावा असे आवाहन यात केले जाते.

                                     

विद्युतघट

विद्युतघट म्हणजे रासायनिक शक्तीचे विद्युतशक्तीत रुपांतर करणारे साधन होय. अलेस्सान्ड्रो व्होल्टा यांनी त्याचा शोध इ. स. १८०० मध्ये लावला. जॉन फ्रेडरिक डॅनियल यांनी इ. स. १८३६ मध्ये त्याची सुधारित आवृत्ती डॅनियल सेल तयार केली.

                                     

शरीररचनाशास्त्र

शरीररचनाशास्त्र हे नावाप्रमाणे शरीरातील असणाऱ्या अवयवांच्या अभ्यासाचे शास्त्र आहे. या मध्ये प्रतिके, आकृत्या, मृतशरीर विच्छदनाद्वारे अवयवांचा अभ्यास केला जातो.

                                     

शरीरशास्त्र

शरीरशास्त्राच्यामध्ये खालील भाग येतात. प्रसुतीशास्त्र स्त्रीरोगशास्त्र शरीरक्रियाशास्त्र शरीररचनाशास्त्र शल्यचिकित्सा नेत्रशल्यचिकित्सा विकृतीविज्ञान मूर्छाशास्त्र/भुलशास्त्र