ⓘ मनोरंजन - सहकारी मनोरंजन मंडळ, का.र. मित्र, लोकानुनय, बीबीसी, अपंगांचे सांस्कृतिक कार्यक्रम, अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियनशिप, छायाचित्रण, नृत्यनाटिका, बॅले, भक्त ..

सहकारी मनोरंजन मंडळ

सहकारी मनोरंजन मंडळ ही येथील एक नाट्यसंस्था होती सन १९२० च्या काळात परळ-पोयबावाडी ह्या भागात माडांच्या वाड्या, दारूचे गुत्ते, जुगारांचे अड्डे, तमाशाची थिएटरे होती. यांच्या विळख्यात बहुजन समाज गुरफटून गेला होता. दिवसभर कष्ट करणाऱ्या कामगारांचे जीवन सुखी होण्यासाठी जिवाला काहीतरी करमणूक पाहिजे होती. ती ज्या दर्जाची असेल त्याप्रमाणे समाजाची वृत्ती बनत असते. करमणुकीची पातळी जेवढी उच्च तेवढी समाजाची पातळी उच्च. याच दृष्टीिनातून परळ भागात एखादी चांगली नाट्यसंस्था स्थापन करून या संस्थेद्वारे कामगारांचे जनतेचे चांगल्या प्रकारे मनोरंजन, प्रबोधन करून त्यांची अभिरुची बदलण्याचा प्रयत्न करावा असे कामगा ...

का.र. मित्र

काशीनाथ रघुनाथ मित्र हे एक मराठी लेखक, मनोरंजन मासिकाचे आणि मनोरंजन या मराठी भाषेतील पहिल्या दिवाळी अंकाचे संपादक, तसेच बंगाली साहित्याचे मराठी अनुवादक होते.

लोकानुनय

मनोरंजन लोकानुनय मनोरंजनाच्या सर्वच क्षेत्रांत वेगवेगळ्या प्रकारे होतो, तसा तो इतिहासाच्या लेखनमांडणीतही होतो. आत्मविश्वास मिळवण्याकरिता, व्यक्ती आणि समुदायास अभिमानाचीही गरज असते. या अभिमान निर्मितीकरिता आदर्शांची आवश्यकता असते, अथवा आदर्श मूल्याशी/नायकाशी/प्रसंगाशी जोडून घेण्याची भूक असते. या स्वत:च्या आणि वाचकाच्या भुकेचा विचार करून ललित लेखक हे व्यक्ती, प्रसंग व आदर्श मूल्ये यांभोवती मिथकांची रचना करताना, प्रमाण पुराव्यावर आधारित वास्तववादी लेखनापर्यंत मर्यादित न रहाता कल्पनेच्या भराऱ्या घेत लेखन करतो. बऱ्याचदा असे लेखन पूर्वलक्षी पद्धतीने केले जाते म्हणजे एखादे मूल्य, एखादा नायक किंवा ...

बीबीसी

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन बीबीसी ही जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे. केवळ इंग्लंड मध्ये या संस्थेचे सुमारे २८,५०० कर्मचारी आहेत व वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ८०० कोटी डॉलर इतकी आहे. बीबीसी ही पहिली राष्ट्रीय प्रसारण संस्था आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेड या नावाने १८ ऑक्टोबर १९२२ मध्ये स्थापित झाल्यानंतर १९२७ मध्ये ही संस्था सार्वजनिक बनली. ही संस्था अनेक मनोरंजन आणि माहितीपर कार्यक्रम निर्मित करते, जे सर्व जगभरात दूरचित्रवाणी टेलिव्हिजन, आकाशवाणी आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित केले जातात. "माहिती, शिक्षण आणि मनोरंजन पुरवणे" हे या संस्थेचे ध्येय संसदेने बीबीसी स ...

अपंगांचे सांस्कृतिक कार्यक्रम

कोल्हापूर शहरात नसीमा हुरजूक‎ यांनी १९८४ साली अपंग विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक तसेच सामाजिकदृष्ट्या पुनर्वसनाचे काम करणारी ‘हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड’ नावाची संस्था स्थापन केली. ‘हम होंगे कामयाब’ हा सांस्कृतिक कार्यक्रम संस्थेच्या विविध उपक्रमांपैकी एक आहे.

अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियनशिप

अल्टिमेट फाईटींग चॅम्पियनशिप अमेरिकेतील मिक्स मार्शल आर्ट सामने आयोजित करणारी संस्था आहे.या संस्थेचे मुख्यालय लास वेगास शहरात आहे.ही संस्था मिक्स मार्शल आर्टचे सामने आयोजीत करणारी जगातील सर्वात सुप्रसिद्ध संस्था आहे. अल्टिमेट फाईटींग चॅम्पियनशिपला यु एफ सी या नावाने सुद्धा ओळखले जाते.

छायाचित्रण

प्रकाश-संवेदी वस्तुंद्वारे प्रकाश किंवा विद्युतचुंबकीय उत्सार यांची नोंद करुन टिकाऊ प्रतिमा निर्माण करण्याच्या पद्धतीला छायाचित्रण असे म्हणतात. छायाचित्रण ही एक कला आणि शास्त्र आहे. छायाचित्रण ही एक कला छायाचित्रकार व त्याच्या कॅमेरा या वर अवलंबून असते. छायाचित्रण ही एक कला वस्तू, तिला पाहाण्याचा द्रुश्तिकोन व वेळ त्याच्या विविध अंगाण या वर अवलंबून असते. कॅमेरा हे काही वषा॔पूवी॔ भौतिक पण आता एक इलेक्टोनिक वस्तू आहे. पूर्वी यासाठी फिल्म कॅमेर्‍याचा वापर होत असे पण आजकाल डि़जिटल कॅमेरे आणि मोबाईल कॅमेरे जास्त लोकप्रिय आहेत. उद्योग, व्यवसाय, जाहिराती, उत्पादन, कला, मनोरंजन, बहुसंवाद mass comm ...

नृत्यनाटिका (बॅले)

नृत्यांच्या साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला नृत्यनाटिका म्हणतात. महाराष्ट्रात अशा अनेक नृत्यनाटिका रंगमंचावर सादर करण्यात आल्या आहेत, आणि येत असतात. पण महाराष्ट्रात नृत्यनाटिका सादर करणारे कलावंत तसे कमीच आहेत. सीमा देव, आशा पारेख, कनक रेळे इत्यादी. उत्तरी भारतात, विशेषत: बंगालचे आणि ओरिसाचे कलावंत या क्षेत्रात अग्रेसर आहेत.

फेका फेकी

फेका फेकी हा १९८९ या वर्षी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. बिपिन वर्टी ने या चित्रपटास दिगदर्शित केले आहे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सविता प्रभुने यांनी यात मुख्य भूमिका निभावल्या आहेत.

भुताचा भाऊ (चित्रपट)

कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका - जॉनी लिव्हर - गप्पाजी अशोक सराफ - बंडू लक्ष्मीकांत बेर्डे - बारकू रेखा राव - बिट्टी जयराम कुळकर्णी - राव साहेब भारती आचरेकर - नंदुची आई वर्षा उसगावकर - अंजू अंजली विजय पाटकर - वॉर्ड बॉय सचिन पिळगांवकर - नंदू नंदकुमार हिंदीतील नामवंत विनोदी कलाकार जॉनी लिव्हर यांचा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट.

                                     

मनोरंजन

जी कंटाळविणाऱ्या जीवनशैलीतूमन वळविते किंवा फावल्या वेळात मनाचे रंजन करते अशी कोणतीही कृती मनोरंजन समजली जाते. मुळात, या प्रकाराने शरीरशक्तीचे पुनर्निर्माण होते असे समजतात. यात दोन प्रकार आहेत-प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष. मनोरंजन हा आनंद देतो.

                                     

मनोरंजन भक्त

मनोरंजन भक्त हे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अंदमान-निकोबार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

                                     

बाँबे टाइम्स

बाँबे टाइम्स हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे पुरवणीवजा वृत्तपत्र आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीबरोबर हे वृत्तपत्र वितरीत केले जाते. यात बव्हंश मनोरंजन, संगीत व इतर कलांबद्दलच्या बातम्या आणि माहिती असते.

                                     

आदित्य चोप्रा

आदित्य चोप्रा हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. सध्याच्या घडीला तो यश राज फिल्म्स ह्या मोठ्या मनोरंजन कंपनीचा चेअरमन देखील आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मोहब्बतें व रब ने बना दी जोडी हे त्याने आजवर दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. ह्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांचा तो निर्माता आहे. त्याला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

                                     

आभाळमाया

कवी - मंगेश कुळकर्णी, गायिका - देवकी पंडित, संगीत दिग्दर्शक - अशोक पत्की खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील आजच्या लोकप्रिय शीर्षक गीतांचा पाया ‘आभाळमाया’च्या या गीताने घातला असे म्हटले जाते.

                                     

हॉटस्टार

हॉटस्टार ही एक स्टार इंडियाची सहाय्यक कंपनी, नोवी डिजिटल एन्टरटेन्मेंटच्या मालकीची एक भारतीय ओव्हर-द-टॉप स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या सेवेमध्ये दोन पेड सबस्क्रिप्शन टायर्स देण्यात आल्या आहेत- त्यामध्ये एक देशांतर्गत कार्यक्रम आणि क्रीडा सामग्रीवर लक्ष केंद्रित करते आणि प्रीमियम आंतरराष्ट्रीय चित्रपट व दूरदर्शन मालिका (एचबीओ व शोटाइम मूळ मालिकेसह असलेले दुसरे "प्रीमियम" स्तर. मार्च २०२० पर्यंत, हॉटस्टारचे कमीतकमी ३०० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत.