ⓘ पर्यावरण - नैसर्गिक पर्यावरण, पर्यावरण, पुस्तक, साहित्य संमेलन, इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र, निरंजन घाटे, आय.यू.सी.एन. लाल यादी, ऊर्जा सुरक्षितता ..

नैसर्गिक पर्यावरण

मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो. मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणाऱ्या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय. मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव त्यांच्या भोवतीचे पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात. सजीवांना त्यांच्या जीव ...

पर्यावरण (पुस्तक)

ओळख पर्यावरणाची बालसाहित्य, जोसेफ तुस्कानो हसरे पर्यावरण बालसाहित्य, दिलीप कुलकर्णी डायमंड क्विझ सीरिज: पर्यावरण जॉन्सन बोर्जेस आरोग्यदायी पर्यावरण भूषण पटवर्धन पर्यावरण समस्या निराकरण व क्षेत्र अभ्यास डॉ. श्रीकांत कार्लेकर डायमंड पर्यावरणशास्त्र शब्दकोश: इंग्लिश-> मराठी जॉन्सन बोर्जेस वेध पर्यावरणाचा रविराज गंधे साधनसंपदा व पर्यावरण अरुण राजाराम कुंभारे पर्यावरण बालसाहित्य, भीमा कदम पर्यावरण: जाणीव विकास वसंतराव ठाकरे वेध पर्यावरणाचा नंदकुमार रोपळेकर व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता कडवेकर, प्रा. रवींद्र कोठावदे Environmental Awareness: Environmental Studiea इंग्रजी आणि मराठी, अरुण रा ...

पर्यावरण साहित्य संमेलन

१३ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स.प.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हे संमेलन शनिवार दिनांक ५ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे पार पडले. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षा होत्या. जळगाव येथे १० डिसेंबर २०१७ रोजी पर्यावरण साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष वीणा गवाणकर होत्या. या संमेलनाचे आयोजन समर्थन संस्था संचालित पर्यावरण शाळा यांच्या वतीने आणि जैन उद्योग समूह आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती ...

इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र

पुणे म.न.पा. च्या इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र, राजेंद्र नगर, पुणे ३० येथे पर्यावरण जनजागृती विषयक कार्यक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यात येते. पर्यावरण कक्षामार्फत पुण्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षण विषयक इंद्रधनु इको क्लब सुरु केला आहे. इंद्रधनू इको क्लब हे पुणे महानगरपालिकेने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण व्हावे आणि या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व्हावे, त्याच सोबत विद्यार्थ्यांना व नागरिकांना पर्यावरण विषयक जागतिक व स्थानिक पातळीवरील पर्यावरणीय घडामोडींचे आकलन व्हावे यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांना शहरातील तसेच देशा ...

निरंजन घाटे

अल्ट=निरंजन घाटे|इवलेसे|निरंजन घाटे निरंजन घाटे जन्म: १० जानेवारी, इ.स. १९४६ हे विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. ते पुण्यात राहतात. भूशास्त्रामध्ये एम.एस्‌सी.पर्यंत शिक्षण घेतलेल्या घाट्यांनी सुरुवातीला काही काळ प्राध्यापकी केली, नंतर ते आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून दाखल झाले. त्यावेळी त्यांनी आकाशवाणीवर विज्ञानाशी संबंधित असे ६०० कार्यक्रम सादर केले. दै. तरुण भारत, पुण्यनगरी, लोकमत, लोकसत्ता, मार्मिक, स.पुण्यनगरी यांसारख्या विविध वृत्तपत्र आणि साप्तहिकांतून त्यांनी देवेन कौशिक, सुखदेव साळुंखे, प्रद्युन यादव, बाळ मुळ्ये, जी.एन.सिन्हा, गुरनाम सिंग, बाळ गुर्लहोसूर ...

आय.यू.सी.एन. लाल यादी

असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. लाल यादी ज्याला आय.यू.सी.एन. लाल यादी किंवा लाल डेटा यादी म्हणतात, १९६४ मध्ये स्थापन केलेली सर्व जैविक प्रजातींच्या जागतिक संवर्धन स्थितीची सर्वात व्यापक यादी आहे. इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर हा जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रजातींच्या संरक्षण स्थितीवर लक्ष ठेवणारा सर्वोच्च संघ आहे. विविध देश आणि संस्था राजकीय व्यवस्थापन एककामध्ये एखादी प्रजात नामशेष होण्याच्या धोक्याचे मूल्यांकन करून प्रादेशिक लाल याद्यांच्या शृंखला तयार करतात.

ऊर्जा सुरक्षितता

उर्जा सुरक्षितता चा अर्थ ऊर्जेच्या स्रोतांच्या दीर्घकालीन उपलब्धतेची हमी किंवा सर्वांना परवडण्यायोग्य दराने दीर्घकालीन विनाअडथळा ऊर्जा सेवांच्या उपलब्धतेची हमी होय.

ऑस्ट्रेलियामधील पर्यावरणीय समस्या

ऑस्ट्रेलियामध्ये, पर्यावरणसंबधीत अनेक मुद्दे आहेत. पर्यावरण समस्याचे परिणाम ऑस्ट्रेलियावर होत आहेत. त्याचप्रमाणे,अनेक मुद्दे ऑस्ट्रेलियामधील संवर्धनाशी संबंधित आहेत.उदाहरणार्थ, मरे-डार्लिंग बेसिनची ढासळणारी स्थिती, याचा मानवी भूमी वापरावर आणि अर्थव्यवस्थेवर थेट आणि गंभीर परिणाम होतो. नैसर्गिक स्त्रोतांच्या वापरासह अनेक मानवी क्रियाकलापांचा ऑस्ट्रेलियन वातावरणावर थेट परिणाम होतो.

कर्बभार

कर्बभार किंवा कार्बन फूटप्रिंट म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा घटनेमध्ये, किंवा दर वर्षी एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा इमारतीद्वारे होणारे एकूण हरितगृह वायूंचे उत्सर्जन. अतिशीत प्रदेशांत हिवाळ्यातही काचेच्या बनवलेल्या हरितगृहांमध्ये वातावरण उबदार रहात असल्याने शेती करणे शक्य होते. काचेतून प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश आरपार जाऊ शकतो, पण हरितगृहात तयार झालेली उष्णता आरपार जाऊ शकत नाही. यामुळे आतली हवा उबदार रहाते, व वनस्पती वाढू शकतात. पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायॉक्साइड व इतर काही वायू हीच भूमिका बजावतात. त्यामुळे पृथ्वी उबदार आहे, आणि तिच्यावर जीवसृष्टी अस्तित्वात आल ...

क्योटो प्रोटोकॉल

जपान देशातील क्योटो शहरात जगातील प्रमुख देशांची जागतिक वातावरण बदलाच्या नियंत्रणासाठी १९९७ साली बैठक झाली, त्या बैठकीत झालेल्या कराराला क्योटो प्रोटोकॉल असे संबोधले जाते. ११ डिसेंबर १९९७ रोजी क्योटो प्रोटोकॉल स्वीकारण्यात आला.

घनकचरा

शहरांमधील कचरा हा गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्‍न बनत चालला आहे. आपल्या भोगवादी समाजाकडून रोज प्रचंड प्रमाणात घनकचरा टाकला जातो. संपूर्ण जगात प्रतिवर्षी सुमारे १०० कोटी टन कचरा निर्माण होत असावा असा अंदाज आहे. हा सगळा कचरा एके ठिकाणी रचला तर माऊंट एव्हरेस्ट इतक्या उंचीचा पर्वत उभा राहिल. जगातील सर्वाधिक भोगवादी देश म्हणजे अमेरिका. तिथे निर्माण झालेली घनकचर्‍याची समस्या सर्वात गंभीर आहे. अमेरिकेतला रोजचा घरगुती कचरा, व्यापारी कचरा, औद्योगिक टाकाऊ पदार्थ यांचा एकत्रित विचार केला तर तो ७,००,००० मेट्रिक टनाहून अधिक भरेल. घन कचरा ढिगार्‍यात फेकण्यामुळे शहर आणि गावं यांचं सौदर्य तर नष्ट होतंच पण त् ...

घूर्णवात

जमिनीवर कमी दाबाच्या जागेभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे चक्रीवादळसदृश संरचनेस घूर्णवात किंवा टोरनॅडो म्हणतात. घूर्णवातात एका नरसाळ्याच्या आकाराच्या आकाशातून सुरुवात झालेल्या ढगाचे टोक जमिनीला लागलेले असते. हे टोक वेगाने एका ठिकाणापासून दुसरीकडे पळत असते. त्याच्या तडाख्यात आलेल्या घरांचा, झाडांचा आणि इतर वस्तूंचा नाश होतो. घूर्णवात लहान किंवा मोठे असले, तरी त्यांचा जमिनीवरून सरकण्याचा वेग बव्हंशी ताशी १७५ किलोमीटरपेक्षा कमी असतो व जमिनीवरील आकारमान सुमारे २५० फूट असते. अनेक बलाढ्य घूर्णवात ताशी ४५० किलोमीटरपेक्षा वेगाने जाताना आढळलेली आहेत. असे घूर्णवात अंटार्क्टिका वगळता इतर सर्व खंडांत हो ...

चक्रीवादळ

चक्रीवादळ हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्याला हरिकेन, आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून ह्या नावाने ओळखले जाते. सर्वसाधारणपणे, चक्रीवादळाचा पुढे सरकण्याचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा बराच कमी असतो.

चोरटी शिकार

अनाधिकृतपणे कायदे धाब्यावर बसवून बंदी असलेल्या प्राण्यांची शिकार करणे म्हणजे चोरटी शिकार. चोरटी शिकार ही मुख्यत्वे आर्थिक लाभासाठी केली जाते. हे शिकारी वन्य प्राण्यांचे उपयुक्त अवयव या संबधित तस्करांना विकतात व पैसा कमवतात. जितका प्राणी दुर्मिळ व शिकार करायला अवघड तितका भाव जास्त मिळतो. चोरट्या शिकरीमुळे अनेक वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिकारीमुळे पर्यावरणातील अन्नासाखाखाळीचा र्हास होत चालाल आहे. प्राणी व चोरट्या शिकारींचे कारण हत्ती- सुळे वाघ- सुळे, हाडे, नखे कातडी व बहुतेक सर्व अवयव हिमबिबट्या - कातडी साळिंदर - काटे व मांस व्हेल मासे - तेल व मांस साप- कातडी विविध प्रकारची बदके ...

जलयुक्त शिवार आणि नदी व नाले खोलीकरण

जलयुक्त शिवार म्हणजे शिवारात पडलेले पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये मुरवणे किंवा जमिनीवर वर्षभर साठवून ठेवणे. जलयुक्त शिवार योजनेमुळे नाल्यामध्ये पाणी जास्तीत जास्त दिवस नदी साचून राहील व विहिरी कोरड्या पडणार नाहीत. त्याअंतर्गत गावाच्या पाणलोट क्षेत्रावर जल व मृद् संधारणाची कामे करावी लागतात. महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१४ मध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान सुरू केले. २०१९ पर्यंत महाराष्ट्रातील या योजनेची व्याप्ती १८ हजार गावांपर्यंत न्यायचे ठरले.

जागतिक जल दिन

जागतिक जल दिन हा एक आंतरराष्टीय दिवस आहे.प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.

जागतिक महासागर दिन

जागतिक महासागर दिन जगभर ८ जून रोजी पाळला जातो. २००८ सालापासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. त्यापूर्वी १९८२ सालापासून कॅनडामध्ये तो साजरा होत असे. केनडा स्थित आंतरराष्ट्रीय संस्था महासागरांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे, या संस्थेच्या पुढाकाराने सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात झाली. वर्ल्ड ओशन नेटवर्क सारख्या विविध संस्था,मत्सयालये, प्राणिशास्त्र विषयात काम करीत असलेल्या संस्था ; अशा महत्त्वाच्या संस्था यासाठी एकत्रितपणे योगदान देतात.

पर्यावरणशास्त्र

निसर्गामधील सजीव आणि निर्जीव घटकांचा परस्पर संबंध म्हणजे इकॉलॉजी होय. आणि ज्या विषयांतर्गत याचा अभ्यास केला जातो तो म्हणजे पर्यावरणशास्त्र होय. पर्यावरणशास्त्र हा अनेक विषयांना स्वतः मध्ये सामावुन घेणारा विषय आहे, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल,तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, नीतिशास्त्र, इतिहास, कला यां सारख्या अनेक विषयांचा समावेश पर्यावरण शास्त्रामध्ये होतो. दिवसेंदिवस वाढत चाललेली मानवी लोकसंख्या व मानवाच्या वाढत जाणाऱ्या गरजा आणि त्यातुन होणारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतोनात नुकसान यामुळे पर्यावरणाची न भरून येण्याजोगी हानी होत आहे, आपली जीवन ...

पॅरिस करार

पॅरिस करार, पॅरिस एकमत तथा पॅरिस पर्यावरण करार हा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक वातावरण बदलाच्या सभेतील एक करार आहे. हा करार हरितगृह वायूच्या उत्सर्जन, उपशमन व त्यासाठीच्या आर्थिक तरतुदींबद्दल आहे. १९५ देशांच्या प्रतिनिधींनी वातावरण बदलाच्या सभेच्या पॅरिस येथे झालेल्या २१व्या संमेलनात वाटाघाटी करून या कराराचा मसुदा निश्चित केला व १२ डिसेंबर २०१५ रोजी या कराराला एकमताने मान्यता दिली. सर्व देशांनी आपापल्या संसदेची मान्यता मिळवून करारावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यासाठी २२ एप्रिल २०१६ पृथ्वी दिवस पासून पुढे एक वर्ष कालावधी देण्यात आलेला होता. सध्या जगभरातून होणाऱ्या एकूण हरितगृह वायू उत्सर्जनापैक ...

भूदृश्य

कोणताही भूभाग संपूर्णतया एकसुरी नसतो, वेगवेगळ्या अधिवासांनी बनलेला असतो. अशा अधिवासांच्या साधारण हेक्टर अथवा जास्त क्षेत्रफळाच्या तुकड्यांना भूदृश्य म्हटले जाते.

माघ पौर्णिमा

माघ पौर्णिमा हा एक बौद्ध सण आहे. या दिवशी तथागत बुद्धांनी वैशाली नगरीमध्ये इ.स.पू. ४८३ ला ४५ वा वर्षावास केला होता. तथागतांनी माघ पौर्णिमेलाच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा व माघ पौर्णिमा एवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी बौद्ध राष्ट्रात आणि जम्बुद्विप भारतातील बौद्ध धम्मीय लोक हा माघ पौर्णिमेचा सोहळा साजरा करतात. या पौर्णिमेला बुद्ध मुर्तींची मिरवणूक काढली जाते आणि धम्माची शिकवण घेऊन अष्ठशीलाचे व्रत केले जाते.

मृणालिनी वनारसे

मृणालिनी वनारसे या पर्यावरणाधारित तत्वज्ञानच्या अभ्यासक, संशोधक व लेखक आहेत. त्या गेली दहाहून अधिक वर्षे Natural Resource Management and Environmental Education या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचे वास्तव्य पुणयात असते. त्यांची राहणी त्याच्या पर्यावरणविषयक धोरणांना धरूनच असते.

वृक्षारोपण

वृक्षारोपण ही विविध प्रकारच्या झाडांची जाणीवपूर्वक केलेली लागवड होय. शासकीय banyan जंगलाखाली असणारे भूक्षेत्र वाढावे या साठी मोठ्या पातळीवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. पूर्वी या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सुबाभूळ, गुलमोहोर, निलगिरी अशी परदेशी झाडे भारतात लावली गेली. या झाडांची आपल्या स्थानिक पक्ष्यांना सवय नसल्याने या झाडांचा अथवा या झाडांची पाने फुले फळे यांचा वापर भारतीय पक्षी करत नाहीत. कालांतराने शासकीय यंत्रणेला या वृक्षारोपण कार्यक्रमातील त्रुटी लक्षात आल्या. सध्या भारतातील स्थानिक प्रजातींची लागवड करण्याकडे सर्व शासकीय यंत्रणा तसेच गैर सरकारी संस्थांचा कल आहे.

वेळ अमावास्या

वेळ अमावास्या हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद,लातूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो.भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.

सह्याद्री

सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. ही अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. या डोंगररांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो. या डोंगररांगेचे क्षेत्रफळ ६०,००० चौरस कि.मी. असून या रांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे. अनेक उंच शिखरे ही डोंगररांग सामावून घेते, त्यामध्ये डोंगररांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर उंची १६४६ मी,साल्हेर १५६७ मीमहाबळेश्वर उंची १४३८ म ...

सालुमरद थिम्माक्का

सालुमरद थिम्माक्का या कर्नाटक राज्यातील बेंगळूरूपासून ८० किमी अंतरावर असणाऱ्या हुलिकल या गावातील पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत व्यक्ती आहे. त्यांचे वय १०५ वर्षे असून अलीकडेच भारत सरकारणे त्यांना २०१९ चा पद्मश्री पुुुरस्कारा तसेच त्यांना नुकताच BBC तील १०० प्रभावी पर्यावरणवादी महिलांच्या यादीत समावेश केला आहे. त्यांनी ८००० पेक्षा जास्त झाडे लावून त्यांचे उत्तम संगोपन केले आहे.या कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय नागरी सन्मान नॅशनल सिटीझन अवार्ड देण्यात आला.

सीआरझेड

कोस्टल रेग्युलेशन झोन सागरतटीय नियमन क्षेत्र, सागर किनाऱ्यांचे पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून संरक्षण व संवर्धन होण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या अंतर्गत फेब्रुवारी, १९९१ मध्ये केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयातर्फे अधिसूचना काढण्यात आली. समुद्र किनाऱ्यांवर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली. या अधिसूचने प्रमाणे समुद्राच्या भरतीच्या रेषेपासून ५०० मी. व खाड्यांच्या तीरापासून १०० मी. चा किनारी भूभाग सागरतटीय नियमन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. २०११ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या नवीन सीआरझेड नियमावलीनुसार अणुउर्जा विभागाच्या प्रकल्पांना यातू ...

                                     

पर्यावरण अभियांत्रिकी

पर्यावरण अभियांत्रिकी म्हणजे विज्ञान व अभियांत्रिकी तत्वांचा वापर करून पर्यावरण सुधारणे हवा, पाणी व जमीनीचे स्रोत, मानवास व इतर प्राणिमात्रांस राहण्यायोग्य असे पाणी,हवा व जमीन उपलब्ध करून देणे आहे. यात, पाणी व हवेचे प्रदुषण नियंत्रित करणे, पुनर्प्रक्रिया, कचऱ्याची विल्हेवाट व लोक-आरोग्याच्या बाबी व पर्यावरण अभियांत्रिकीच्या कायद्यांचे ज्ञान याचा समावेश आहे.तसेच, भविष्यातील बांधकाम प्रकल्पांमुळे, पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यासही यात समाविष्ट आहे.

                                     

पुणे महानगरपालिका

पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे महानगरपालिकेची स्थापना इ.स. १९५० साली झाली. वरं जनहितं ध्येयम्‌ असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे. इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र हे महानगरपालिकेचे पर्यावरण संबंधी जनजागृती केंद्र आहे. हे केंद्र नवी पेठ, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ स्थित आहे.

                                     

विनीता आपटे

विनीता आपटे या मराठी भाषेतील लेखिका आहेत. विनीता आपटे या मराठी निवेदिका,ले़खिका,अभिनेत्री आहेत. सध्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागात पॅरिस येथे सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत.

                                     

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था" ही संस्था नीरी या नावाने ओळखली जाते. "वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद" यांचे अखत्यारित असलेली ही संस्था महाराष्ट्रातील नागपूर शहरातील नेहरु मार्गालगत स्थित आहे. १९५८ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली.

                                     

इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर

इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर आययुसीएन ही नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षणाच्या प्रसाराला वाहिलेली एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आययुसीएन ने जगातील जैवविविधता संरक्षणासाठी संरक्षित क्षेत्रांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे This is a NGO वर्ग Ia वर्ग Ib वर्ग II वर्ग III वर्ग VI वर्ग V वर्ग IV