ⓘ व्यक्ती आणि वल्ली - व्यक्ती आणि वल्ली, पुरुषोत्तम बेर्डे, वैभव मांगले, प्रभाकर निलेगावकर, उपक्रम, संकेतस्थळ, जयंत सावरकर, सागर देशमुख, पु.ल. देशपांडे, शिक्षक ..

व्यक्ती आणि वल्ली

व्यक्ती आणि वल्ली हे पु.ल. देशपांडे ह्यांच्या काल्पनिक व्यक्तिरेखांच्या संग्रहाचे नाव आहे. इ.स. १९४४ मध्ये अभिरुची नावाच्या मासिकात पु.लं. नी अण्णा वडगावकर नावाचे काल्पनिक व्यक्तिचित्र लिहिले. तेव्हापासून इ.स. १९६१ पर्यंत लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा या संग्रहात समावेश केला गेला आहे. पहिल्या ४ आवृत्यांत १८ व्यक्तिचित्रांचा समावेश होता. नंतर "तो" आणि "हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका" ही दोन व्यक्तिचित्रे पुस्तकात घालण्यात आली.

पुरुषोत्तम बेर्डे

क्लोज एनकाउंटर्स हे पुरुषोत्तम गजानन बेर्डे यांचे प्रसिद्ध पुस्तक. व्यक्तिचित्रणे असलेली मराठीतील दोन गाजलेली पुस्तके म्हणजे पु.ल. देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली आणि जयवंत दळवी यांचे सारे प्रवासी घडीचे. या दोन्ही पुस्तकांतील व्यक्तिचित्रणांना तोडीस तोड अशी व्यक्तिचित्रणे क्लोज एनकाउंटर्स हे पुस्तक आहे. विशेष म्हणजे या पुस्तकातील सर्व व्यक्ती बेर्डेंना मुंबईच्या कामाठीपुरातील सोळा गल्ल्यांमध्ये भेटल्या आहेत. पुरुषोत्तम बेर्डे हे मराठी अभिनेते कै. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे वडील बंधू होत. बेर्डे मुंबईजवळच्या (ठाणे|ठाण्यात" राहतात. पुरुषोत्तम बेर्डे हे जेजेमध्ये असताना संस्थेच्या नोटीस बोर्डा ...

वैभव मांगले

वैभव मांगले हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. बी.एस्सी‌., बी.एड., डी.एड. झाल्यावर ते काकांच्या आग्रहाने मुंबईला आले. तेथे दहा-बारा जणांबरोबर मित्राच्या खोलीत राहत असताना त्यांचा आविष्कार या नाट्यसंस्थेशी संबंध आला. त्यांनी नाटकांमध्ये त्यांनी स्त्री-भूमिकाही केल्या आहेत. ग्रामीण नाटकांमध्येही काम करणारे वैभव मांगले हे कोकणी, मालवणी, वऱ्हाडी भाषा या बोलीभाषा सफाईने बोलतात. मांगले यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख असून त्यांचे वडील आणि आजोबाही अभिनय करीत असत. झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवर मराठी नाटकांतील स्त्री भूमिकांची स्थित्यंतरे दाखवणारा ’नांदी’ हा कार्यक्रम झाला होता. ...

प्रभाकर निलेगावकर

प्रभाकर निलेगावकर हे मराठीतले एकपात्री कार्यक्रम करणारे एक कलावंत आहेत. इ.स. १९९१ सालापासून त्यांचे कार्यक्रम रंगमंचावर येत असतात. त्यांना २०१३ सालापर्यंत ४८ व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. स्वतिश्री निर्मित ’अस्सल माणसं इरसाल नमुने’ ह्या त्यांच्या एकपात्री कार्यक्रमाची वाटचाल २००० प्रयोगांकडे चालली आहे. २०१८ साली त्यांचा ’पुलं’च्या व्यक्ती, वल्ली आणि गणगोत’ हा एकपात्री नाट्यप्रयोग गाजतो आहे. प्रभाकर निलेगावकर यांना महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार, रोटरी क्लबचे मिलेनियम अवॉर्ड, कर्नाटकाचा सरस्वती पुरस्कार, आणि अखिल मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार इ.इ. प्रदान झाले आहेत. पहा - नाटक: एकपात्री ना ...

उपक्रम (संकेतस्थळ)

उपक्रम हे एक मराठी संकेतस्थळ होते. हे संकेतस्थळ आता फक्त वाचनासाठी खुले आहे, त्यांच्यामधील लेखांत आता भर टाकता येत नाही. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, इतिहास या व यासारख्या इतर विषयांवर मराठीतून लेखन आणि चर्चा व्हावी, या विषयांशी निगडीत समुदाय बनावेत, उपक्रम चालावेत या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी असा या संकेतस्थळाच्या चालकांचा स्थापनेच्यावेळी मानस होता.

जयंत सावरकर

जयंत सावरकर जन्म: गुहागर, ३ मे. १९३६ हे एक मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी, इ.स. १९५४पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली, ती पुढे ७३ वर्षे चालूच राहिली दर दोन तीन दिवसांनी कुठल्या न कुठल्या नाटकात ते रंगभूमीवर दिसतातच. सावरकर मूळ गुहागरचे. वडील लहानमोठा व्यवसाय करायचे. सकाळी चार वाजता उठून रोज चरकातून उसाचा हंडाभर रस काढून ते चालत चालत आरे गावापर्यंत जाऊन विकायचे. त्यांना २१ मुले होती. जयंत सावरकर सर्वात धाकटे. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता, त्याच्याकडे जयंत सावरकरांना पाठवले. ते त्याच्याबरोबर गिरगावात राहू लागले, व नोकरी करू लागले. नोकरी सोडून ज ...

सागर देशमुख

सागर देशमुख हे मराठी नट, चित्रपट अभिनेता व वकील आहेत. त्यांचे वडीलही वकील होते. सागर देशमुख हे पुण्याच्या लॉ कॉलेजचे विद्यार्थी होते. २००३ मध्ये ते वकिलीची परीक्षा पास झाले. वकिलीच्या परीक्षेनंतर मुंबईत त्यांनी चार व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर पुन्हा पुण्यात येऊन त्यांनी वकिली सुरू केली. ६-७ वर्ष त्यांनी न्यायालयात जाऊन वकिलीचा व्यवसाय केला. त्यानंतर ते सोडून लेखन आणि अभिनयाकडे वळले. वायझेड हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. सागर देशमुख यांनी भाई: व्यक्ती की वल्ली चित्रपटात पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकारली. सध्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा या दूरचित्रवा ...

पु.ल. देशपांडे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत. गुळाचा गणपती, या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवाद ...

शिक्षक

शिक्षकांची कर्तव्ये 1. नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे. 2. निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन CCE द्वारे बालकांची प्रगती सुनिश्चित करणे. 3. गरजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाखेर सर्व बालकांची प्रगती साध्य करणे. 4. व्यापक सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून मुलांचे प्रगती पत्रक तयार करणे. 5. पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची उपस्थिती, क्षमता व प्रगती यावर चर्चा करणे. 6. विविध प्रशिक्षणात सहभागी होणे. 7. परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे. 8. शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून क ...