ⓘ साहित्य - संमेलने, महाराष्ट्र साहित्य परिषद, अकादमी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन, बालकुमार साहित्य संमेलन, ई-पुस्तक, बागुलबुवा ..

साहित्य संमेलने

बृहन्महाराष्ट्रात आणि अन्यत्रही अनेक मराठी साहित्य संमेलने विविध नावांनी भरतात; त्यांपैकी काही संमेलनाची ही यादी:- अनुष्का स्त्री-मंच साहित्य संमेलन अभंग साहित्य संमेलन गझल संमेलन ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन चतुरंग रंगसंमेलन प्रबोधन साहित्य संमेलन राज्यस्तरीय चक्रधरस्वामी साहित्यसंमेलन पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन स्त्री साहित्य संमेलन गुंफण सद्भावना साहित्य संमेलन प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन अस्मितादर्श साहित्य संमेलन विश्व मराठी साहित्य संमेलन आंबेडकरी युवा साहित्य संमेलन झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन महात्मा फुले साहित्य संमेलन अखिल भारतीय ...

महाराष्ट्र साहित्य परिषद

म.सा.प. अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषद या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.

साहित्य अकादमी

साहित्य अकादमी ही एक भारतीय भाषांचे संवर्धन करणारी भारतीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना मार्च १२ १९५४ रोजी झाली. या संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे. साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. या अंतर्गत संशोधन, तसेच लेखकांसाठी प्रवास अशा उपक्रमांसाठी अर्थपुरवठा करते. तसेच साहित्य अकादमी पुस्तके व समकालीन भारतीय साहित्य हे हिंदी भाषा भाषेतील नियतकालिक ही प्रकाशित करते. भारतीय साहित्याचा विश्वकोशही साहित्य अकादमी ने प्रकाशित केला आहे. साहित्य अकदामीचे बहुभाषिक व अतिशय समृद्ध असे भारतातील एक प्रमुख ग्रंथालय आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडेयांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश फेब्रुवारी ७ १८७८ मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११ १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद ...

ग्रामीण साहित्य संमेलन

ग्रामीण साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दलित आदिवासी ग्रामीण संमेलन, लोकसंवाद ग्रामीण संमेलन, कोळी ग्रामीण साहित्य संमेलन, विभागीय ग्रामीण साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन अशा विविध नावांनी अनेक संस्था ग्रामीण साहित्य संमेलने भरवतात. त्यांतल्या काही संस्था आणि त्यांनी भरवलेली संमेलने:-- असोदा जळगाव जिल्हा ग्रामीण साहित्य संमेलन.१९८०, संमेलनाध्यक्ष आनंद यादव कवि सुधांशु कै.हणमंत नरहर जोशी यांनी काढलेल्या सदानंद साहित्य संस्थेतर्फे औदुंबरजिल्हा सांगली या गावी दरवर्षी औदुंबर साहित्य संमेलन सदानंद साहित्य संमेलन भरते. १९३९ साली कृष्ण ...

बालकुमार साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन नावाची संस्था बालसाहित्यकार अमरेंद्र गाडगीळ यांनी इ,स, १९७६मध्ये स्थापन केली. पुढे २००० साली संस्थेच्या नावातील संमेलन हा शब्द काढून त्याजागी संस्था हा शब्द टाकण्याचाबदल संमत झाला. परंतु धर्मादाय आयुक्तांकडे पाठविलेल्या या बदलाची पूर्तता झाली आहे की नाही याची खातरजमा करून घेतल्याने हा बदल केवळ कागदोपत्रीच राहिला, आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या अनधिकृत नावानेच संस्था काम करीत राहिली. २०१६ सालीया नावातील ’अखिल भारतीय’ हे शब्द काढून टाकण्याचे ठरले आहे; संस्था त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्‍न करीत आहे. काही तांत्रिक कार ...

                                     

ई-पुस्तक

ई-पुस्तक म्हणजे एखाद्या पुस्तकाचे केलेले डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक रूपांतर होय. पुस्तकाची पाने पीडीएफ/किंवा चित्ररुपात न ठेवता ती वेगळ्या प्रकारच्या टंकात साठविली जातात. जेणेकरून वाचक वापरत असलेल्या साधनाच्या पडद्याच्या आकाराप्रमाणे मजकूर आपोआप बदलतो आणि सुलभतेने वाचता येतो. आंतजालाला जोडलेल्या संगणकाच्या, स्मार्टफोनच्या सहाय्याने हे पुस्तक डाउनलोड करता येते आणि मग तत्सम पडद्यावर वाचता येते. कधीकधी एखाद्या संकेतस्थळाने ते उतरवून घेतलेले असते, आणि तिथूनही ते वाचता येते.

                                     

बागुलबुवा

बागुलबुवा म्हणजे एक काल्पनिक पात्र ज्याचा वापर लहान मुलांना भिती दाखविण्यासाठी होतो.या पात्रास दाढी, मोठ्या मिश्या असतात असे कल्पिलेले असते व हे पात्र लहान मुलांना पकडुन नेते अशी भिती त्यांना दाखविण्यात येते. मराठी साहित्यात बागुलबुवा हा शब्द भिती दाखविणे अश्या अर्थाने योजिल्या जातो. याच नावाचे मराठी भयकथा साहित्य प्रसिद्ध करणारे युट्यूब चॅनल देखील आघाडीचे लोकप्रिय चॅनेल प्रगती पथावर आहे.

                                     

लाल किताब

लाल किताब हा फलज्योतिषविषयक पाच ग्रंथांचा संग्रह आहे. भारतातील पंजाब प्रदेशातील फरवाला गावातील रहिवासी "पंडित" रूपचंद जोशी यांनी इ.स. १९३९ साली हे पाच ग्रंथ लिहिले. मुळात उर्दू व फारसी भाषांत लिहिलेले हे ग्रंथ सामुद्रिक व समकालीन ज्योतिषीय पद्धतींवर आधारित आहे.

                                     

साहित्यातील नोबेल पारितोषिक

साहित्यातील नोबेल पारितोषिक हे दरवर्षी बहाल केल्या जाणाऱ्या ५ नोबेल पारितोषिकांपैकी एक आहे. साहित्यातील पहिले नोबेल पारितोषिक इ.स. १९०१ साली सली प्रुडहॉम ह्या फ्रेंच कवी व लेखकाला देण्यात आले. १९१३ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक रविंद्रनाथ टागोरांना देण्यात आले होते. आजतागायत भारतीय साहित्यिकाला मिळालेले हे एकमेव नोबेल आहे. ह्या पुरस्काराचे वितरण दरवर्षी १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम शहरात केले जाते.