ⓘ चित्रकथा - इ.स. १९३०, फिनिक्स, संजय कृष्णाजी पाटील, चिंटू, मे २७, ग.दि. माडगूळकर, जानेवारी १३, जानेवारी १०, टाटा उद्योगसमूह, अ‍ॅस्टेरिक्स, रमेश मुधोळकर, तँतँ ..

इ.स. १९३०

जुलै २८ - रिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाच्या पंतप्रधानपदी. मार्च १२ - महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेस सुरुवात. जानेवारी ३१ - ३एम या अमेरिकन कंपनीने स्कॉच टेप विकायला सुरुवात केली. एप्रिल २१ - कोलंबस, ओहायो येथील तुरुंगात आग. ३२० ठार. जानेवारी १३ - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित. मे ४ - ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले. जुलै ७ - अमेरिकेत हूवर धरणाचे काम सुरू. मे १ - सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.

फिनिक्स

फेनघ्वांग, एक आशियायी फिनिक्स पक्षी फिनिक्स, पॅनोपोलिसच्या नोन्नसच्या डायोनिसियाकामधील डायोनिझझचा मित्र. फिनिक्स अगेनोरपुत्र, ग्रीक पौराणिक नायक फिनिक्स इलियड, अम्यन्टोर आणि सेलोब्युलेंचा मुलगा, ग्रीक पौराणिक कथेतील ट्रोजन युद्धातील एक योद्धा

संजय कृष्णाजी पाटील

संजय कृष्णाजी पाटील ह्यांचा जन्म ८ ऑगस्ट, १९६६ रोजी मळगे खूर्द, ता. कागल, जि. कोल्हापूर येथे झाला असून ते मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे साहित्यिक आहेत. त्यांनी आतापर्यंत लेझीम खेळणारी पोरं कवितासंग्रह शून्य प्रहर एकांकिकासंग्रह आभाळ झेलण्याचे दिवस लेखसंग्रह हरवलेल्या कवितांची वही कवितासंग्रह दशक्रियेची चित्रकथा,फक्त लढ म्हणा नाटक मायलेकी नाटक इत्यादी साहित्यकृती निर्माण केल्या आहेत.

चिंटू

चिंटू ही सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक नोव्हेंबर २१, इ.स. १९९१ रोजी सकाळ वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला. तेव्हापासून आजवर चिंटू अनेक आबालवृद्धांचा लाडका बनला आहे. दोन वर्षे ही चित्रकथा लोकसत्ता वृत्तपत्रातून प्रकाशित होत होती. या चित्रकथेतील पात्रांवर आधारित असलेला एक मराठी चित्रपट चिंटू याच नावाने २०१२ मध्ये प्रदर्शित झाला.

मे २७

२००६ - जावाच्या योग्यकर्ता शहरात भूकंप. ६,६०० ठार.

ग.दि. माडगूळकर

माडगूळकर गजानन दिगंबर. हे विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक होते.त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले. त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकिर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्तान ...

जानेवारी १३

२००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. २००१ - एल साल्वाडोरमध्ये भूकंप. ८००हून अधिक ठार. २०११: भारतातील शेवटची पोलिओ रुग्ण सापडली. २००२ - घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.

जानेवारी १०

२००१ - विकिपिडीया न्यूपिडीयाचा एक भाग म्हणून सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण झाले.

टाटा उद्योगसमूह

टाटा उद्योगसमूह हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योगसमूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे. बाजार भांडवल आणि महसुलाचा विचार करता भारतातील हा आघाडीचा समूह आहे. रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सहा खंडांतील ८०हून अधिक देशांत टाटा समूहाचे कामकाज विस्तारले आहे.

अ‍ॅस्टेरिक्स

अ‍ॅस्टेरिक्सच्या साहसकथा ही फ्रेंच भाषेतील एक चित्रकथामाला आहे. तिचे इंग्रजीसह अनेक जागतिक भाषांत भाषांतर झाले असून ती युरोपात व भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. या चित्रकथामालेत ३०हून अधिक चित्रकथा आहेत. इ.स. २००९अखेरपर्यंत या मालिकेत ३४ साहसकथा आणि १ पुस्तिका प्रसिद्ध झाल्याची नोंद जालावर उपलब्ध आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या काही अंकांचे कथासूत्र आणि शब्दांकन श्री. रेने गॉसिनी यांनी व चित्रांकन श्री. आल्बेर उदेर्झो यांनी केले असून, श्री. रेने गॉसिनी यांच्या निधनानंतर त्यापुढील अंकांत श्री. आल्बेर उदेर्झो हे दोन्ही बाबी हाताळत आले आहेत.

रमेश मुधोळकर

रमेश मुधोळकर हे एक बालसाहित्यकार व चित्रकार होते. रमेश मुधोळकर यांचे प्राथमिक शिक्षण मलकापूर येथे आणि माध्यमिक शिक्षण मुंबईच्या छबिलदास हायस्कूलमध्ये झाले. मुंबईच्या जे.जे. कला महाविद्यालयातून त्यांनी कर्मिशयल आर्टचे शिक्षण घेतले होते. १९७२ मध्ये त्यांनी केलेले अनुवादित पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केले होते. दोनच वर्षांनी त्यांनी शालापत्रक हे शालेय मुलांसाठीचे मासिक सुरू केले. लेखनाबरोबरच पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील सजावट व चित्रे मुधोळकर यांचीच असत. बालकुमारांवर संस्कार करणारी सुमारे ३०० पुस्तके त्यांनी लिहिली. शिक्षण सुरू असतानाच मुधोळकारांनी जयको पॉकेट बुक्ससाठी चित्रांचे काम ...

प्रल्हाद केशव अत्रे

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. त्यांचे ठाकरे यांच्याशी असलेले वादही फार चर्चेत होते.

तँतँ

तॅंतॅं हा लेझावॉंत्यूर द तॅंतॅं या बेल्जियन काल्पनिक चित्रकथेचा नायक आहे. बेल्जियन चित्रकथाकार एर्जे याने ही व्यक्तिरेखा रेखाटली आहे. तॅंतॅं पेशाने पत्रकार आहे. मीलू नामक आपल्या पाळीव कुत्र्यास सोबत घेऊन तॅंतॅं जगभर फिरत असताना त्याने केलेल्या साहसी कामगिर्‍या या चित्रकथांमध्ये रंगवल्या आहेत.