ⓘ दूरचित्रवाहिनी - भगवानबाबा, दूरचित्रवाहिनी मालिका, हितेन तेजवानी, कन्नड, निःसंदिग्धीकरण, रामायण, रजनी, झी बिझनेस ..

भगवानबाबा (दूरचित्रवाहिनी मालिका)

भगवानबाबा ही राजयोगी महंत श्री संत भगवानबाबा यांच्या चरित्रावर आधारीत साधना या आध्यात्मिक वाहिनीवरून प्रक्षेपित केली जाणारी दूरचित्रवाहिनी मालिका आहे. तिचे प्रक्षेपण दिनांक ३ ऑक्टोबर, इ.स. २०१२ पासून चालू केले जाणार आहे. या मालिकेचे पहिल्या २० भागांचे चित्रिकरण पूर्ण झाले असून डॉ.विलास उजवणे हे भगवानबाबांच्या भूमिकेत काम करत आहेत. सतीश परदेशी हे या मालिकेचे दिग्दर्शक असून पुणे येथील द टायगर फिल्म्स ॲन्ड एन्टरटेनमेंटतर्फे रमेश स्स्ते यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेमुळे संत भगवानबाबा यांचे आध्यात्मिक व सामाजिक जीवन प्रथमच छोट्या पडद्यावर येणार आहे.

हितेन तेजवानी

हितेन तेजवानी हा दूरचित्रवाहिनी माध्यमातील भारतीय अभिनेता आहे. "क्यूंकी सास भी कभी बहू थी", "कुटुंब", आणि "पवित्र रिश्ता" या दूरचित्रवाहिनी मालिकांत साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे तो प्रसिद्ध झाला.

कन्नड (निःसंदिग्धीकरण)

कन्नड या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत: कन्नड तालुका -भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका. दक्षिण कन्नड जिल्हा - कर्नाटक राज्यातील म्हैसूर प्रशासकीय विभागातील एक जिल्हा. झी कन्नड - ‘झी नेटवर्क’च्या मालकीची कानडीतून प्रसारण करणारी दूरचित्रवाहिनी कानडी भाषा - दक्षिण भारतात बोलली जाणारी एक भाषा. कन्नड विधानसभा मतदारसंघ - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेला एक विधानसभा मतदारसंघ. कन्नड माणसे - कानडी भाषा बोलणारी आणि मुख्यत्वेकरून कर्नाटक राज्यात राहणारी माणसे दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघ - कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ. उत्तर कन्नड जिल्हा - कर्नाटक राज्यातील ...

                                     

रामायण (दूरचित्रवाहिनी मालिका)

रामायण नावाच्या तीन दूरचित्रवाहिनी मालिका आहेत. रामायण १९८६ दूरचित्रवाहिनी मालिका रामायण २००८ दूरचित्रवाहिनी मालिका रामायण २०१२ दूरचित्रवाहिनी मालिका

                                     

रजनी (दूरचित्रवाहिनी मालिका)

रजनी ही १९८०च्या दशकातील भारतातील दूरचित्रवाहिनी मालिका होती. दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेत प्रिया तेंडुलकरने मुख्य भूमिका केली होती.

                                     

आम्ही सारे खवय्ये

आम्ही सारे खवय्ये ही झी मराठी दूरचित्रवाहिनी वरुन प्रसारित होणारी मराठी भाषेतील खाद्यसंस्कृती विषयक मालिका आहे. अभिनेता प्रशांत दामले, अभिनेत्री राणी गुणाजी, अभिनेत्री मृणाल दुसानीस, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हे चौघे या मालिकेचे सूत्रसंचालन करत होते. प्रशांत नाईक व समीर जोशी हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. आम्ही सारे खवय्ये आयएमडीबीवर

                                     

सीएनबीसी टीव्ही १८

सीएनबीसी टीव्ही १८ ही भारतातील इंग्लिश व्यवसायिक बातम्यांची दूरचित्रवाहिनी आहे. ही वाहिनी सीएनबीसी आणि टेलिव्हिजन एटीन इंडिया लिमिटेड यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.

                                     

झी बिझनेस

झी बिझनेस ही भारतातील व्यापारविषयक बातम्यांची दूरचित्रवाहिनी आहे. नोएडामध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी झी मीडियाच्या मालकीची आहे. याची सुरुवात नोव्हेंबर २००४ मध्ये झाली.