ⓘ पर्यटन - पर्यटन, महाराष्ट्रातील पर्यटन, कोइंबतूर शहरातील पर्यटन, मालदीवमधील पर्यटन, जागतिक पर्यटन दिन, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन, निसर्ग पर्यटन, जत्रा, यात्रा ..

पर्यटन

पर्यटनशास्त्र:-पर्यटन ही संज्ञा प्रवास या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास हा शब्द लॅटिन भाषेतील Tornos या शब्दापासून आलेला आहे. Tornos शब्दाचा मूळ अर्थ वर्तुळ किंवा वर्तुळाकार असा आहे. याच शब्दापासून पुढे वर्तुळाकार प्रवास किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला. एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था World Tourism Organization ही जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इ ...

महाराष्ट्रातील पर्यटन

महाराष्ट्र राज्यात दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक येतात. त्यापैकी दीड कोटी पर्यटक हे अजिंठा,वेरूळ व मुंबईला भेट देतात. परदेशी पर्यटकांपैकी तीन ते साडेतीन लाख पर्यटक राज्याच्या इतर भागांना जसे पंढरपूर,शिर्डी,पैठण, शनि शिंगणापूर आदी ठिकाणी भेटी देतात. हे पर्यटक मुख्यत्वे ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी आणि व्यावसायिक कारणाने महाराष्ट्रातील शहरांना भेटी देतात. परदेशी पर्यटकांत १९९०पासून शैक्षणिक कारणासाठी आणि २००० पासून वैद्यकीय उपचारांसाठी येणारांचे प्रमाण वाढीस लागले. देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणाऱ्या पर्यटनाचे प्रम ...

कोइंबतूर शहरातील पर्यटन

बोटॅनिकल उद्यान १९२५ मध्ये स्थापित करण्यात आले असून तामिळनाडू कृषिविद्यापीठ टीएनएयू यांनी प्रशासित केले आहे. बोटॅनिकल उद्यान ३०० हेक्टर क्षेत्रावर पसरलेले असून येथे विविध प्रकारच्या वनस्पती आहेत.

मालदीवमधील पर्यटन

मालदीवमध्ये पर्यटन हा सर्वात मोठा व्यवसाय म्हणून ओळखला जातो, परकीय चलन महसूल कमावण्यासाठी तसेच देशामध्ये रोजगाराची निर्मिती करण्यासाठी मालदीवमध्ये पर्यटन व्यवसाय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मालदीव द्वीपसमूह हा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो.

जागतिक पर्यटन दिन

आज २७ सप्टेंबर हा दिवस" जागतिक पर्यटन दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. गतवर्षी२०१८‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन हे मुख्य उद्दिष्ट ठेवून पर्यटन दिन साजरा केला गेला. पूर्ण वर्षभर जगभरातील सर्व देशांनी त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, योजना, सुविधा यांचे नियोजन केले. तर या वर्षभरासाठी २०१९ पर्यटनदिनासाठीचा विषय आहे तो म्हणजे – पर्यटन आणि नोकऱ्या: सर्वांसाठी चांगले भविष्य Tourism and Jobs:A better Future for all. *पर्यटन क्षेत्रातील करिअर* ज्य ...

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन

आचरा, कुणकेश्वर, केळूस, खवणे, गिर्ये, चिवला, तारकर्ली, तोंडवली, देवबाग, निवती, पडवणे, पुरळकोठार, भोगवे, मिठमुंबरी, मुणगे, मोचेमोड, रेडी, वायरीबांध, विजयदुर्ग, वेळागर, शिरोडा, सागरतीर्थ, सागरेश्वर.

निसर्ग पर्यटन

निसर्ग पर्यटन झुक झुक, झुक झुक आगिनगाडी! धुरांच्या रेषा हवेत काढी!पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया.! हे गाणं लहानपणी माझ अगदी आवडीच होतं. परीक्षा जवळ आली कि अभ्यासापेक्षाही सुट्टीमध्ये काय काय धमाल करायची याचाच विचार डोक्यात चालू असायचा. त्यावेळी मामाच्या किंवा इतर नातेवाईकांच्या गावी भेटायला जाणे हाच सुट्टीतला ठरलेला कार्यक्रम असायचा. पण गेल्या १५ – २० वर्षांमध्ये हे चित्र बदललेलं दिसतंय. मामाच्या गावाच्या जागी आता एखादा समुद्र किनारा, थंड हवेच ठिकाण, पावसाळी धबधबा किंवा घनदाट जंगल आलेलं आहे. सुट्टीमध्ये भेट द्यायची ठिकाणं आता बदलली आहेत आणि त्याचबरोबर बदलतंय त्या ठिकाणच स्थानिक पर ...

जत्रा

एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा किंवा मेळा असे म्हणतात. लोक संपर्क वाढविणे हा जत्रेचा मुख्य उद्देश असतो. बऱ्याच ठिकाणी जत्रेमध्ये अन्नदान केले जाते. एखाद्या देवाच्या नावाने लोकांना आमंत्रित करून त्यांना देवाचा प्रसाद म्हणून अन्न वाटले जाते. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये अशी प्रथा आढळते. एका ठरविलेल्या दिवशी गावातील प्रत्येक कुटुंब आपापल्या पाहुण्यांना, मित्र मंडळींना आमंत्रित करून जेवू घालतात. त्या दिवशी गावामध्ये मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तमाशा हा त्यापैकीच एक असा मनोरंजनाचा प्रकार ग्रामीण भा ...

यात्रा

यात्रा ही एखाद्या व्यक्ती किंवा गटाने केलेला प्रवास. हा सहसा धार्मिक कारणांसाठी केला जातो. महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रा: पंढरपूर यात्रा कित्येक वेळेस यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ / भारतीय रेल्वे यांचेकडून जादा गाड्यांची व्यवस्था केली जाते.

ईच्छादेवी मंदिर

इच्छादेवी मंदिर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्य सीमेवर असलेल्या इच्छापुर या गावात आहेहे मंदिर इच्छा देवीचे आहे आणि ईच्छापुर गावाच्या दक्षिणेस असलेल्या ३०० मिटर उंच पर्वतावर स्तित आहे

ऑस्ट्रेलिया पर्यटन

नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ दक्षिण भागात फिरायला उत्तम असतो. नंतर जरा थंडी पडते. उत्तर भागात मात्र पावसाळा सोडून सगळाच काळ बरा असतो फिरायला. वेगवेगळ्या प्रकारच्या माशा मात्र खूप असतात उन्हाळ्यात. फिरायला येणे - ऑस्ट्रेलियाला फिरायला येण्यासाठी अर्जानुसार ३ महिने ते १ वर्ष पर्यंतचा व्हिसा मिळतो. हा व्हिसा साधारणपणे एका आठवड्याच्या कालावधीत मिळून जातो. मात्र या व्हिसावर परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया हा व्हिसा मिळेलच असे नाही. व्यवसाय व्हिसा - हा ५ वर्षांसाठी मिळतो. मात्र या व्हिसावर परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया हा व्हिसा मिळेलच असे नाही. शैक्षणिक व्हिसा - या व्हिसावर शिक्षणासाठी येण्याचा व्हिसा ...

पंचमढी

पंचमढी हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील हुशंगाबाद जिल्ह्यातील एक पर्वतावरील थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणाहूनच गुप्त महादेव, छोटा महादेव, नागद्वार या स्थळांस जाता येते. हे ठिकाण सातपुडा पर्वतश्रेणीतील असून पूर्वी इंग्रजांची येथे छावणी होती. पंचमढी हे समुद्रसपाटीपासून १,०६७ मीटर उंचीवर आहे. येथे घनदाट जंगल, खळखळाट करणारे जलप्रपात आणि तलाव आहेत. येथील जंगलात सिंह, बिबट्या, चितळ, सांबर, गवा, चिंकारा, अस्वल, रानरेडा असे अनेक जंगली प्राणी आहेत. येथील एक गुंफा ही पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाची आहे, तिच्यात शैलचित्र मिळाले आहे.

पर्यटक

आपल्या नेहमीच्या ठिकाणांव्यतिरिक्त वेगवेगळ्या भागांस भेट देणारा व काही काळ तेथे वास्तव्य करणारा प्रवासी हा पर्यटक होय. पर्यटकाची प्रवास करण्याची कारणे: मनोरंजन किंवा विरंगुळा, शिक्षण, वैद्यकीय उपचार, धार्मिक विधी इत्यादी.

पांडुरंग पाटणकर

पांडुरंग पाटणकर हे पर्यटनावर लिहिणारे मराठी लेखक आहेत. पाटणकर यांनी दुर्गभ्रमंतीपासून ते विदेशीभ्रमंतीपर्यंत मार्गदर्शन करणारी १८ पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. याशिवाय त्यांनी अनेक दैनिकांतून पर्यटनावर एक हजारांपेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. पाटणकरांच्या वाङ्मयात सह्याद्री आणि हिमालय यांपासून गल्फ प्रदेश, युरोप, आल्प्स, इ.च्या पर्यटनविषयक पुस्तके आणि लेख आहेत. त्यांच्या वडिलांची पोस्टातील फिरतीची नोकरी होती. यानिमित्ताने अनेक ठिकाणी राहिलेल्या पाटणकरांनी त्या प्रत्येक ठिकाणाची ऐतिहासिक माहिती तसेच गड, कोट, किल्ले यांची निरीक्षणे करुन लेखन सुरू केले. पाट ...

महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे

अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहरापासून जवळपास ९० कि.मी.अंतरावर आहेत. अजिंठा लेणी विशेषतः चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहेत. बौद्ध धर्मातील हीनयान व महायान पंथीयांची लेणी या ठिकाणी आहेत. बौद्ध जातक कथेवरील चित्रे पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक अजिंठ्याला येतात. सन १९८३ साली युनेस्कोने या वारसास्थळास नैसर्गिक वारसास्थळ म्हणुन मान्यता दिली आहे.

                                     

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. महाराष्ट्रामधील पर्यटन उद्योगाचा विकास करण्याचे कार्य ही संस्था करते. या संस्थेची स्थापना १९५६च्या कंपनी कायद्यातह करण्यात आली असून याचे भागभांडवल २५ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे.या महामंडळाच्या माध्यमातून सरकारने महाराष्ट्रात पर्यटन विकासासाठी विषेश प्रयत्न केले आहेत.विदभ,मराठवाडा,कोकण या भागाचा विकास करण्यासाठी गुंतवणूक केली आहे.

                                     

२०११ मध्ये विविध देशांना मिळालेल्या जागतिक पर्यटन मानांकनांची यादी

जागतिक पर्यटन मानांकने ही वर्षातून तीनदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यटन संघटनेतर्फे प्रसिद्ध केली जातात. हि मानांकने देशांना भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या, पर्यटकांनी पर्यटनावर केलेला खर्च व पर्यटनातून स्थानिक देशाच्या उत्पनात झालेली वाढ यावर ठरतात.

                                     

पर्यटन भूगोल

पर्यटन भूगोल हा उद्योग आणि एक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम म्हणून प्रवास आणि पर्यटनाचा अभ्यास आहे. पर्यटनाच्या भूगोलमध्ये पर्यटनाच्या पर्यावरणीय प्रभावांसह, पर्यटन आणि अवकाश अर्थव्यवस्थांच्या भौगोलिक गोष्टींचा समावेश आहे, पर्यटन उद्योगास उत्तर देण्यासाठी आणि व्यवस्थापन समस्यांबद्दल आणि पर्यटनाचे समाजशास्त्र आणि पर्यटनस्थळाच्या स्थानांसह विविध प्रकारच्या स्वारस्यांचा समावेश आहे.पर्यटन भूगोल म्हणजे शास्त्रीय शाखा ज्यामध्ये प्रवासाचा अभ्यास आणि स्थानांवर त्याचा प्रभाव पडतो.