ⓘ पाककला - पाककला, साल्व्हादोर दा बाईया, अस्तेक, चटणी, लखनौ, उमेश वीरसेन कदम, बारीपाडा, धुळे जिल्हा, रणवीर ब्रार, सुमनताई बेहेरे, जेकब सहाय्य कुमार अरुणी, जाते ..

पाककला

पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. निरामिष व सामिष या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात चवीने खाल्ले जातात. महाराष्ट्रातसुद्धा कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा इत्यादि भागांप्रमाणे वेगळ्या पाकशैली आणि वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात. प्रत्येक भागात वापरले जाणारे विशिष्ट जिन्नस, तिखट-गोड चवींबद्दलची आवड निवड यातील बदल याचा त्या भागातील पाककलेवर परिणाम झालेला आहे. स्वयंपाक किंवा स्वयंपाकाचे भांडे म्हणजे कला, तंत्रज्ञान, विज्ञान आणि अग्नी किंवा उष्णता यांच्या वापरासह किंवा त्याव ...

साल्व्हादोर दा बाईया

साल्व्हादोर दा बाईया ही ब्राझील देशाच्या बाईया राज्याची राजधानी आहे. ब्राझीलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले साल्व्हादोर हे ब्राझीलमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १५४९ साली स्थापन झालेले साल्व्हादोर हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असून ते येथील पाककला, संगीत व वास्तूशास्त्रासाठी ओळखले जाते. येथील ऐतिहासिक पोर्तुगीजकालीन इमारतींसाठी साल्व्हादोरला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे. २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी साल्व्हादोर एक असून येथील अरेना फोंते नोव्हा स्टेडियममध्ये विश्वचषकातील ६ स ...

अस्तेक

अस्तेक लोक हे मेक्सिकोमधील ठरावीक वांशिक लोकांचा गट असून ते नाहुआत्ल भाषा बोलतात आणि मेसोअमेरिकन कालगणनाशास्त्रानुसार उत्तर-अभिजात-शेवट कालात - १४व्या, १५व्या आणि १६व्या शतकात त्यांनी मेसोअमेरिकेतील बराचचा भाग काबीज केला. अस्तेक साचा:भाषा-अना-आध्वव हा नाहुआत्ल शब्द अस्तेकात्ल साचा:भाषा-अना-आध्वव याचे स्पॅनिशकरण/इंग्लिशकरण असून त्याचा अर्थ "अस्तलानचे लोक" असा होतो. अस्तलान हे पूर्वीच्या नाहुआत्ल भाषिकांची पौराणिक स्थळ होते, नंतर ते मेशिका लोकांसाठी वापरले जाउ लागले. "अस्तेक" हा शब्द बर्‍याचदा तेक्सकोकोच्या तलावास्थित शहर तेनोचतित्लानातील मेशिका रहिवासांसाठी वापरला जातो, जे स्वतःस मेशिका-तेन ...

चटणी

चटणी हा एक भारतीय तिखट खाद्यपदार्थ आहे. चाटण या संस्कृत शब्दावरून चटणी हा शब्द भारतीय भाषांत आला. हा भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रांताप्रांतांनुसार चटण्यांमध्ये वैविध्य आले आहे. यामध्ये अनेक चटण्या घरामध्ये पिढ्यान्‌‍पिढ्या बनवल्या जातात. विविध चटण्या: कैरीची चटणी दोडक्यांच्या शिरांची चटणी दाण्याची चटणी लसणाची चटणी कढीलिंबाच्या पानांची चटणी कच्च्या टोमॅटोची चटणी चिंचेची चटणी खोबऱ्याची चटणी सुक्या बोंबलाची चटणी जवसाची चटणी

लखनौ

लखनौ ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्याची राजधानी व उत्तर भारतामधील एक प्रमुख शहर आहे. २०११ साली ४८ लाख लोकसंख्या असणारे लखनौ भारतामधील दहाव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. नवाबांचे शहर ह्या टोपणनावाने ओळखले जात असलेले लखनौ उत्तर प्रदेशच्या मध्य भागात गोमती नदीच्या काठावर वसले आहे. ऐतिहासिक काळापासून अवध भूभागाची राजधानी असलेले लखनौ मुघल साम्राज्याच्या दिल्ली सल्तनतीचा भाग होते. सध्या लखनौ उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र असून येथील शिवणकाम, पाककला भारतभर प्रसिद्ध आहेत. हिंदीसोबत अवधी व उर्दू ह्या भाषादेखील लखनौमध्ये वापरात आहेत. लखनौ येथे केंद्रीय ऊस संशोधन केंद्र आह ...

उमेश वीरसेन कदम

प्रा. डॉ. उमेश वीरसेन कदम हे एक कायदेतज्ज्ञ असलेले मराठी कथालेखक आणि कादंबरीकार आहेत. त्यांचे वडील बाबा कदम यांचेकडून उमेश कदम यांनी लेखनाची प्रेरणा घेतली. उमेश कदम यांचे शालेय शिक्षण बार्शी, जयसिंगपूर, गडहिंग्लज व कोल्हापूर येथे, तर आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण व प्रशिक्षण इंग्लंड लंडन विद्यापीठ, हॉलंड, स्वित्झर्लंड व ग्रीस या देशांत झाले. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कदम यांना राष्ट्रकुल शिष्यवृत्ती मिळाली होती. प्रा. उमेश कदम यांनी १९८० ते १९९८ पर्यंत कॉलेजांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा या विषयाचे अध्यापन केले. १९९८ पासून ते आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसमध्ये वरिष्ठ कायदा सल ...

बारीपाडा, धुळे जिल्हा

बारीपाडा हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात व साकरी तालुक्यात असणारे एक गाव आहे. हे आदिवासीबहुल गाव आहे. या गावानंतर गुजरात राज्याचा डोंगराळ असलेला डांग जिल्हा आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे ७०० इतकीच आहे व या गावात सुमारे १०० घरे आहेत. या गावात एकही दोन मजली ईमारत नाही. त्याशिवाय, गावातील ग्रामपंचायत सभागृह व शाळेची ईमारत सोडली तर एकही सिमेंटने बांधलेली इमारत नाही. या गावात चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय आहे व गावातील प्रत्येक विध्यार्थ्याला शिक्षणासाठी शाळेत जाणे अनिवार्य आहे. शाळेत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांना रु. ५०००/- दंड केल्या जातो.

रणवीर ब्रार

रणवीर ब्रार हे एक भारतीय सेलिब्रिटी शेफ, टीव्ही शोचा न्यायाधीश आणि फूड स्टायलिस्ट आहेत. त्यांच्या टेलिव्हिजन शोमध्ये ब्रेकफास्ट एक्सप्रेस, स्नॅक अटॅक, होममेड, द ग्रेट इंडियन रसोई, हेल्थ भी स्वाद भि, रणवीरचे कॅफे, फूड ट्रिपिंग, थँक्स गॉड इट फ्रायडे, ग्लोबल पाककृती, राजा रसोई और अंदाज अनोखा, स्टेशन मास्टर्स टिफिन आणि बर्‍याच गोष्टींचा समावेश होतो. मास्टर चेफ इंडियाच्या चौथ्या सत्रातील न्यायाधीशांपैकी ते एक होते, ब्रिटिश स्पर्धात्मक पाककला खेळ शो, मास्टर शेफ, सहकारी शेफसह विनीत भाटिया लंडन आणि विकास खन्ना यांच्यावर आधारित आहे आणि सध्या सहाव्या सत्रात न्यायाधीश आहेत.

सुमनताई बेहेरे

सुमनताई बेहेरे यांनी आपले पती पु.वि. बेहेरे ऊर्फ राजाभाऊ बेहेरे यांच्या समवेत मेनका प्रकाशन ही संस्था काढली. सुमनताई बेहेरे यांच्या प्रकाशन संस्थेने मेनका १९६०, माहेर १९६२ ही कौटुंबिक आणि जत्रा १९६३ हे विनोदी नियतकालिक सुरू केले. या तिन्ही नियतकालिकांना अल्पकाळातच वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. मेनका प्रकाशनच्या जाहिरात विभागाची धुरा सुमनताईंनी समर्थपणे सांभाळली. मुंबई-पुणे असा प्रवास करीत, अत्यंत कष्टाने व दांडग्या लोकसंचयाच्या जोरावर त्यांनी प्रकाशनाची आर्थिक बाजू भक्कम केली. मेनका आणि माहेर मासिकांच्या विशेषांकांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. आचार्य अत्रे ...

जेकब सहाय्य कुमार अरुणी

जेकब सहाय्य कुमार अरुणी हे "शेफ जेकब" म्हणून प्रसिद्ध असलेले एक भारतीय सेलिब्रिटी आचारी होते. ज्यांचा जन्म तामिळनाडूच्या उथमापलयममध्ये झाला होता. ते दक्षिण भारतीय खाद्यप्रकारांसाठी प्रसिद्ध होते. जेकब अनेक आघाडीच्या हॉटेल्समध्ये भेट देणारे शेफ आणि भारत आणि परदेशातील काही उत्कृष्ट रेस्टॉरंट्समधील सल्लागार शेफ होते. ते एक समर्पित खाद्य इतिहासकार, मसाला संग्रहक आणि दक्षिण भारतीय पाककला प्रवर्तक देखील होते.

मंथन महिला साहित्य संमेलन

बेळगाव शहरात इ.स. १९८८पासून ‘मंथन कल्चरल अ‍ॅन्ड सोशल वेलफेअर सोसायटी’तर्फे होणाऱ्या मंथन महिला साहित्य संमेलन होते. या संमेलनाचे आयोजन करणाऱ्या मंथन संस्थेचा इतिहास ‘महिलांनी महिलांसाठी, महिलांकडून’ सुरू केलेल्या हिंदवाडी मंडळापर्यंत जातो. इसवी सन १९६६मध्ये श्री. व सौ. डॉ. पट्टण हिंदवाडीमध्ये राहावयास आले. त्यांनी त्यांचा व्यवसाय इथेच सुरू केला. व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्याची तळमळ असणाऱ्या के.डी. मंदाकिनीताईंनी हिंदवाडीतील महिलांना एकत्र करुन १५ ऑगस्ट १९६७ रोजी हिंदवाडी महिला मंडळाची स्थापना केली. सुरुवातीला या मंडळातर्फे शिवणकाम, भरतकाम, विणकाम, पाककला अशा विविध विषयांचे क्लासेस घेण्यात ...

खलबत्ता

हे एक पूर्वीपासून वापरले जाणारे साधन आहे. खलबत्ता हा साधारण दगडी, तर अनेकदा धातुचाही असतो. यात एक दगडाचे उभट आकाराचे भांडे असते. आणि एक दगडी दंडगोलाकार काठी असते.

जाते

सनपूर्व दोन हजार वर्षापासून जाते प्रचारात असावे, असे मानण्यास आधार आहे. सिंधुसंस्कृतीशी समकालीन आणि समान असलेल्या लोथलमधील उत्खननात जाते वरची तळी सापडली आहेत. तशाच तऱ्हेची तळी असलेली जाती नेवासे, तडकोड, वडगाव सिरपूर तेथील उत्खननात मिळाली आहेत. नागार्जुन आणि तक्षशिला येथील उत्खननात जाती सापडली आहेत.नेवासे येथील उत्खननात तर अनेक जाती सापडल्या आहेत. पिठाच्या गिरण्या सुरु होण्यापूर्वी आपल्या कुटुंब जीवनात जात्याला महत्त्वाचे स्थान होते. आजही खेड्यात पहाटेच्या प्रहरी जात्याची घरघर आवाज येतो, आणि त्या घरघरीबरोबरच दळणाऱ्या स्त्रीच्या मुखातून स्त्र्वणाऱ्या अमृतमधुर ओव्याही ऐकायला मिळतात. गाण्याने ...

पाटा वरवंटा

पाटा वरवंटा हे, स्वयंपाकासाठी बाह्य-साधन म्हणून, यांत्रिक साधने येण्यापूवीचे, एक चटणी वाटायचे दगडी साधन होते. यात एक पंचकोनी व एक दंडगोलाकार आकाराचे दगडी भाग असत.त्यांच्या साहाय्याने चटणी वा जेवणातील तत्सम पदार्थ तयार केले जात. आजही कित्येक खेडेगावांमध्ये पाटा वरवंटा वापरतात. व बेलदार लोक पाटा वरवंटा बनवतात. भारतात, पाटा वरवंटा हा बहुधा कठीण अशा दगडांपासून ब्लॅक बेसॉल्टपासून बनविला जातो. राजस्थानचा लाल दगडही यासाठी क्वचित वापरला जातो. हा दगड खरखरीत असतो.पाट्या-वरवंट्यात ठेचणे व रगडणे या क्रिया एकाचवेळी करता येतात. वापरून गुळगुळीत झालेल्या पाट्या-वरवंट्यास परत टाके/टाचे मारून घेतात त्यामुळे ...

पुरणपोळी

पुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा सणाच्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत. मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद ...

भोजनकुतूहल

भोजनकुतूहल हा रघुनाथ नवहस्ते लिखित ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना सतराव्या शतकात झाली. महाराष्ट्रात घरोघरी रोज होणाऱ्या पदार्थांचे मूळ येथे नोंदवलेले आढळते. तसेच सणावारी होणार्‍या पाककृती ग्रंथात दिसून येतात.

मोनोसोडियम ग्लुटामेट

अजिनोमोटो उर्फ मोनोसोडियम ग्लुटामेट, हा ग्लुटामिक आम्लाचा सोडियम क्षार आहे. याचे रासायनिक सूत्र C5H8NO4Na असे आहे. अजिनोमोटोला चिनी मीठ असे म्हणतात. ते खास करून चिनी पाककृतींमध्ये वापरते जाते. ग्लुटामेटचे दोन प्रकार असतात. एक प्रथिनांशी बद्ध आणि दुसरा मुक्त. या मुक्त ग्लुटामेटमुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. ग्लुटामेटमुळे येणाऱ्या चवीचा शोध इसवी सनाच्या नवव्या शतकात जपानमध्ये लागला. या चवीला उमामी असे नाव आहे. टोमॅटो, मशरूम आणि एका प्रकारचे चीज यामध्येही ही चव असते. आपल्या मूलभूत चवी म्हणजे गोड, कडू, खारट, आंबट, तुरट व तिखट. यांपेक्षा ही चव वेगळी असते. व्हिनेगार जसे आंबवण्याच्या प्रक्रिये ...

लक्ष्मीबाई वैद्य

१९२८ ते १९३५ या काळात या बनारस विद्यापीठाच्या मुलींच्या शाळेत शिक्षिका होत्या. तेव्हा त्या मध्य प्रदेशात कामासाठी फिराच्या. त्यानंतर त्या पुण्याच्या हुजूरपागा शाळेत गृहशास्त्र विषयाच्या मुख्य शिक्षिका झाल्या. त्यांनी शाळा-महाविद्यालयांतील परीक्षिका या नात्याने भारतातील अनेक ठिकाणांना भेट दिली. याशिवाय त्या इंग्लंड, अमेरिका, फ्रांस, इटली, इ. देशातही गेल्या.

स्वयंपाक

स्वयंपाक ही अग्नीचे/उष्णतेचे सहाय्याने खाण्यासाठी अन्नपदार्थ व खाद्यपदार्थ तयार करण्याची एक कला, तंत्रज्ञानव कारागिरी आहे. जगभर स्वयंपाकाचे घटक व पद्धतींमध्ये अनेकानेक बदल असतात.खुल्या अग्नीचा वापर करुन जाळीवर भाजणे,वेगवेगळ्या भट्ट्यांचा वापर,वाफेचा वापर, विद्युतचलित उष्णता निर्माणकांचा तसेच सौर ऊर्जेचा वापर इत्यादी प्रकार यात वेगवेगळे पर्यावरणिय, आर्थिक, सांस्कृतिक परंपरा व पद्धती दृक्गोचर होतात. स्वयंपाक हा तो करणाऱ्याचे कुशलतेवर व प्रकारावर अवलंबुन असतो तसेच,त्या व्यक्तिला मिळालेल्या त्याचे शिक्षणानुसार. व्यक्तिनुसार व प्रांतानुसार त्यात बदल घडतात. अग्नी किंवा उष्णतेचा वापर करून अन्न हे ...

                                     

निलेश लिमये

निलेश अरुण लिमये हा एक भारतीय सेलिब्रिटी आचारी आहे. हे दूरचित्रवाणी कार्यक्रम यजमान लेखक आणि विविध मासिके आणि एक रेस्टॉरंट सल्लागाराची कामेही करतात. ते सतत प्रवास करीत असल्याने त्यांना "सिंदबाद शेफ" म्हणून टोपणनाव देण्यात आले. सध्या ते "ऑल बाउट पाककला" हा उपक्रम सांभाळत आहेत. यातून होटेल व्यवसायातील नवीन प्रवेशकर्त्यांना, उद्योजकांना एफ अँड बी सोल्यूशन्स खुले केले आहे. झिकोमो पुणे, त्रिकया पुणे, जिप्सी चायनीज दुबई आणि टेन्झो टेम्पल ठाणे अशा विविध रेस्टॉरंट ब्रँड लिमयांशी संबंधित आहेत.

                                     

कणीक

कणीक ही गहू दळल्यावर तयार होणारे पीठ आहे. भिजवलेल्या पीठाला कणिक म्हंटले जाते. हे पीठ भट्टीमध्ये भाजून पाव बनवला जातो. तसेच हे वेगवेगळ्या प्रकारे तळून व उकडून त्याचे खाद्यप्रकार बनवले जातात.

                                     

भोजनालय

पत्ता - २२/बी, रेळे बिल्डिंग, गिरगाव, मुंबई - ४००००४. सुरवात - इ स इ.स. १९७२ मालक - कै रामचंद्र सहदेव प्रभू. मालवणी पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी भोजन मिळण्याचे हे एक ठिकाण आहे.

                                     

रवी (घुसळणी)

या साधनाद्वारे प्रामुख्याने ताक घुसळले जाते. रवी हे साधन लाकडापासून, प्लास्टिकपासून, लोखंडापासून, व काही इतर धातूंपासून बनवलेले असते. या साधनाचा वरचा भाग तळाहाताने घासत खालील भांड्यातील पदार्थ घुसळला जातो.