ⓘ रेडियो - अरेसीबो वेधशाळा, आकाशवाणी, आझाद हिंद रेडियो, मिर्ची, नोकिया २६०० क्लासिक, विवेक पाटील, रडार यंत्रणा, विविध भारती, ट्रान्सिल्व्हेनिया, रेड एफएम, रेडियो ..

अरेसीबो वेधशाळा

अरेसीबो वेधशाळा ही अटलांटिक महासागरातील पोर्तो रिको देशामध्ये अरेकिबो शहराच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर असलेली एक वेधशाळा आहे. अरेसीबो वेधशाळेचे प्रमुख साधन रेडियो दुर्बीण हे आहे. अमेरिकेचे संरक्षण खाते आणि कॉर्नेल विद्यापीठाच्या संयुक्त प्रकल्पान्वये ही वेधशाळा १ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी बांधून पूर्ण झाली. हिच्या उभारणीसाठी ८३ लक्ष डॉलर्स खर्च आला होता.

आकाशवाणी

आकाशवाणी हे मनोरंजनाचे व माहितीसाठीचे श्राव्य माध्यम आहे. हे ग्रामीण लोकाचे आवडते माध्यम आहे ऑल इंडिया रेडिओ संक्षिप्तपणे AIR, अथवा आकाशवाणी असे म्हणतात, ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे व ही प्रसार भारती Broadcasting Corporation of India या संस्थेची उपशाखा आहे. ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे. आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवन येथे आहे.

                                     

आझाद हिंद रेडियो

आझाद हिंद रेडियो सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी मध्ये प्रथम १९४२ साली भारतीयांना स्वतंत्र संग्रामासाठी प्रवृत्त करण्यासाठी सुरु केला. हे आकाशवाणी केंद्र जर्मनी मधील जरी असली तरी सुरवातीचे मुख्यालय हे सिंगापूर येथे होते.परंतु दक्षिण पूर्व आशियातील युद्धामुळे त्याचे मुख्यालय सिंगापूर वरून रंगून ला हलवण्यात आले. ह्या रेडियो स्टेशन वरून हिन्दी, मराठी, इंग्लिश, जर्मन व इतर भारतीय भाषामधून दर आठवड्यातून बातम्या दिल्या जायच्या.ह्या रेडियो चा वापर ते आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी करत असत.

                                     

रेडियो मिर्ची

रेडियो मिर्ची एक भारतीय एफ.एम. चॅनल आहे. याचे काम ९८.३ मेगाहर्ट्झ या वारंवारीतेवर चालते. २६ शहरांमध्ये रेडिओ मिचीर्ची धून वाजत आहे. शिवाय २० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या सर्व शहरांमध्ये पोहोचणारी ही एकमेव रेडिओ वाहिनी आहे.

                                     

नोकिया २६०० क्लासिक

नोकिया २६०० क्लासिक हा जीएसएम भ्रमणध्वनी नोकिया या कंपनीचा असून त्यामध्ये ०.३ मेगापिक्सेल छायाचित्रक, एफएम रेडियो, ब्लूटूथ व आंतरजाल या सुविधा होत्या.

                                     

विवेक पाटील

रेडियो स्टार श्री.विवेक पाटील रेडियो: गुगल: यु ट्युब: विवेक पाटील पखवाज पखवाज शिक्षण: गुरुवर्य पंडित कै. विश्वनाथ पाटील, नेेरुळ, नवीमुंबई ‌ उच्च शिक्षण: HSC Science, जी.आर. पाटील कॉलेज, डोंबिवली. निवास: देसाईगाव, ठाणे मुंबई.

                                     

रडार यंत्रणा

रडार ही रेडियो लहरी वापरून आकाशातील वस्तूंचे चित्र तयार करण्यासाठीची यंत्रणा आहे. या रडारमधून पाठवलेल्या तरंग लहरी एखाद्या वस्तूवर आदळून परततात, तेव्हा त्यातल्या तरंगलांबीचा फरक मोजला जातो. त्यामुळे वस्तूचा वेग, आकार, घनता आदी अनेक बाबी अतिशय अचूक नोंदवता येतात.

                                     

विविध भारती

विविध भारती ही भारतीय आकाशवाणीची एक वाहिनी आहे. याची सुरुवात २ ऑक्टोबर, इ.स. १९५७ रोजी झाली. विविधभारती रेडियो वाहिनी ही भारत व जगभर प्रसिद्ध झाली ती बिनाका गीतमाला या कार्यक्रमामुळे, आजही ग्रामीण भागात मोठ्या संख्येने विविध भारतीचे श्रोते आहेत.

                                     

ट्रान्सिल्व्हेनिया

ट्रान्सिल्व्हेनिया हा मध्य युरोपामधील रोमेनिया देशाचा एक ऐतिहासिक प्रदेश आहे. युरोपाच्या इतिहासात आजवर ट्रान्सिल्व्हेनिया बरेच साम्राज्यांचा भाग राहिला आहे.

                                     

रेड एफएम (रेडियो)

रेड एफएम हे भारतातील एक खाजगी आकाशवाणी केंद्र आहे.या रेडीओ केंद्राची वारंवारता ९३.५ मेगा हर्ट्झ आहे.या रेडीओ चैनल मध्ये ४८.९% भागीदारी कलानिधि मारन यांची आहे.

                                     

रेडिओ जय भिम

रेडीओ जय भिम ही आंतरजालीय खाजगी रेडिओ वाहिनी आहे. या वाहिनीचे प्रसारण २४ तास होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा व भिमगीते, तसेच शासकीय नोकरीच्या जाहिराती, नोकरी मार्गदर्शने, स्थानिक बातम्या, आरोग्य, देशभक्ती गीते, चर्चा, चालू घडामोडी इत्यांदींचे प्रसारण करण्यात येते. या वाहिनीचे मोबाइल ॲप देखील आहे.